आपण देवी देवतांच्या अनेक कथा ऐकतो. परंतु सर्व हिंदू देवता परिवारात एक प्रेमळ जोडपे म्ह्णून ओळखले जाते ते म्हणजे शिव पार्वती यांचे. किंबहुना पौराणिक संदर्भानुसार शिव आणि पार्वती यांचा विवाह हा पृथ्वीवरील सर्वात पवित्र विवाह सोहळा मानला जातो. या दैवी जोडप्यातील शिव हा संहारक देव आहे, शिवाची ख्याती योग्यांचा देव म्हणून आहे. तो स्मशानात बसणारा आणि भस्मधारी आहे. या शिवाय शिवाची ओळख आत्मसंयमी आणि ब्रह्मचारी देव म्हणून देखील आहे, असे असले तरी त्याच वेळी तो एक प्रेमळ प्रियकर देखील आहे. आपल्या प्रेमासाठी समस्त जगाला भस्म करू शकणारा प्रियकर!
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
शिवाची लाडकी प्रिया पार्वती ही जगत जननी आहे, ही आदिशक्ती आपल्या नानाविध रूपांसाठी प्रसिद्ध आहे. ती कधी असुरसंहारक आहे तर कधी अंबा आहे. दुर्गा, काली, लक्ष्मी, सरस्वती ही सारी तिचीच रूपे आहेत. असे असले तरी ‘शिवशक्ती’ हे अभिन्न आहे. त्यांच्याच प्रेमाचे दाखले पौराणिक कथा देतात. म्हणूनच कुमारिका शिवासारखा पती मिळावा म्हणून उपासतापास करण्याची परंपरा आहे.
शिव-शक्तीचे एकत्रित रूपाचे का महत्त्व?
शिव-शक्तीचे एकत्रित रूप हे प्रेम, शक्ती आणि भक्तीचे प्रतीक आहे. शिव-शक्तीची एकत्रित उपासना सजीवातील खोट्या अहंकाराचा नाश करून जीवाची परमेश्वराशी खरी ओळख करून देते. शिव हा भोळा सांब आहे तर शक्ती माता आहे, उत्पत्तीची देवता आहे. शिव आणि शक्ती यांच्या एकत्रित मिलनातून या सृष्टीचा जन्म होतो. जगाची उत्पत्ती शिवलिंगातून झाल्याचे मानले जाते. शिवशंकर हे मूलतः संहारक म्हणून गणले गेले तरी पौराणिक कथांमधून त्यांचे भक्तांप्रती प्रेमचं व्यक्त होते.
शिव उपासनेचे प्राचीनत्त्व
शिवाचे सर्वसाधारण रूप हे चर्मधारी, हातात त्रिशूळ, गळ्यात सर्प आणि मुंडमाळा असे असते. शिवाचे हे रूप अगदी प्राचीन काळापासून अस्तित्त्वात असल्याचे मानले जाते. असे असले तरी त्या पूर्वीपासूनच शिवाची लिंग स्वरूपात पूजा करण्याची परंपरा असल्याचे दिसते. अगदी हडप्पा संस्कृतीत उत्खननात सापडलेली लिंग ही शिव पूजनाचे प्राचीनत्त्व सिद्ध करतात.
देवीच्या उपासनेचे प्राचीनत्त्व
शक्तीची उपासना अनादी काळापासून सुरु आहे. उत्क्रांतीच्या प्राथमिक टप्प्यात मानवाने ज्या मातृशक्तीला साकडे घातले, तीच आदी अनंत काळची माता आहे. पौराणिक कथेनुसार पार्वतीच्या अनेक शैली आहेत. अनेकदा तिला कौटुंबिक स्त्री म्हणून दर्शविले जाते, तिच्या बाजूला शिव आणि तिच्या मांडीवर बाळ गणेश असे तिचे रूप असते. इतर वेळी ती दुर्गेच्या रूपात असते. लाल वस्त्र परिधान केलेली, सिंहावर स्वार, हातात शस्त्र असे तिचे उग्र रूप वाईटाला आव्हान देणारे असते. लाल रंग हा शक्तीचे प्रतीक आहे. तिची शस्त्रे अज्ञान, वाईटपणा आणि अहंकार नष्ट करणारी आहेत. काही वेळा ती शिवासारखीच त्रिशूळ धारण करताना दर्शवली जाते. त्रिशूळ हे शिव शक्तीच्या तमस, राजस आणि सत्व या तीन गुणांचे प्रतिनिधित्त्व करतात.
माझ्यासाठी प्रेमाची व्याख्या तूच आहेस.
शक्ती ही केवळ शिवाची पत्नीच नाही, तर त्याची विद्यार्थिनीही होती, ती त्याला प्रश्न विचारत असे, त्याच्याशी चर्चा करत असे आणि विचारविनिमयही करत असे. एके दिवशी तिने त्याला विचारले, “प्रेम म्हणजे काय?” तो तिच्याकडे बघून केवळ हसला. तिने पुन्हा एकदा गालात हसून विचारले. तेंव्हा शिवशंकर म्हणाले; “देवी तू अन्नपूर्णा आहेस, असे असतानाही तू माझ्याकडे आलीस, मला प्रेमाने आणि काळजीने खावू, पिवू घातलेस तेच माझ्यासाठी प्रेम आहे. कारण तू माझी क्षुधा तृप्त केली आहेस, तू कामाख्या, सुखाची देवी आहेस, हे माझ्यासाठी प्रेम आहे.
हे देवी, “हे गौरी जेव्हा तू माझ्याकडे नाजूक आणि संयमी म्हणून येतेस तेव्हा मला तुझ्यावर वर्चस्व गाजवण्याची परवानगी देतेस, तुझ्यावर कोणीही वर्चस्व गाजवू शकत नाही, हे मी जाणतो तेच माझ्यासाठी प्रेम आहे. जेव्हा दुर्गा म्हणून हातात शस्त्रे घेऊन माझ्याकडे येतेस आणि माझे रक्षण करतेस, तेव्हा मला सुरक्षित वाटते, ती सुरक्षतेची भावना माझ्यासाठी प्रेम आहे. हे देवी, तू शक्ती आहेस, तू मला सामर्थ्य देऊन माझे रक्षण करतेस, तू माझी शक्ती होतेस हेच माझ्यासाठी प्रेम आहे.
हे देवी “जेव्हा तू माझ्यावर तुझ्या मोकळ्या जटांनी कालीच्या रूपात नृत्य करतेस, तुझ्या शक्तिशाली रूपाने वाईटाचा नाश करण्यासाठी आणि पीडितांना न्याय देण्यासाठी तू मागे पुढे पाहत नाहीस ते माझ्यासाठी प्रेम आहे. जेव्हा मी माझे डोळे उघडतो तेंव्हा मला जाणवते की तू, ललिता सुंदर आहे, भैरवी आहेस. मला जाणवते की तू मंगला, शुभ, चंडिका देखील आहेस, हिंसकही आहे. तू सत्य आहेस, तू मला स्वः शोधण्यास मदत करते. तू पारदर्शक आहेस, तू माझी सरस्वती आहेस, तुझ्याचमुळे मी नटराज झालो आहे. तुझ्यामुळे मला आनंदाची प्राप्ती होते, मी माझा आनंद नृत्यातून प्रकट करतो.
शिवपार्वती संवादात पुढे शिव म्हणतात,“हे श्यामा, काली, शक्ती, तू मला प्रेम शिकवले आहेस. माझ्यासाठी प्रेमाची व्याख्या तूच आहेस”.
आणखी वाचा : विश्लेषण: म्यानमारच्या कोको बेटांवरून चीनची भारतावर नजर! नेमके काय घडते आहे?
शिव आणि पार्वतीचा विवाह
सतीच्या मृत्यूनंतर, सती शक्ती राजा हिमावत आणि राणी मेना यांच्या कन्येच्या रूपात पुन्हा पृथ्वीवर अवतरली. पार्वतीच्या रूपात तिचा जन्म झाल्यावर, नारद मुनी ऋषींनी घोषित केले की या नवजात राजकन्येचा विवाह शिवाशी होणार आहे. पार्वती मोठी होत असताना शिवाबद्दल आणि ती त्याची पत्नी कशी असणार याबद्दल कल्पना करत असे. पार्वती विवाह योग्य झाल्यावर तिने शिवाला प्रसन्न करून घेण्यासाठी तपश्चर्या केली. हिमालयात शिवाच्या दिशेने प्रवास केला. परंतु शीव अजूनही आपल्या गत पत्नीसाठी, सतीसाठी शोक करीत होते आणि त्यांचे ध्यान सुटत नव्हते. पार्वतीच सतीचा अवतार होती. शिवाला परत पती म्हणून प्राप्त करण्यासाठी तिने उग्र तपश्चर्या केली. हिमालयातील अतिथंड वातावरणात आपले तप तिने सुरूच ठेवले, केवळ झाडाची पाने खावून तीने आपले तप सुरूच ठेवले, म्हणून ती अपर्णा म्हणून ओळखली जावू लागली. त्याच दरम्यान, असूर तारकांमुळे देव आणि मानवांना दहशत बसली होती. देव ब्रह्मदेवाकडे मदतीसाठी गेले आणि त्यांनी प्रतिसाद दिला की, फक्त शिवाचा पुत्र तारकाचा पराभव करू शकतो. यामुळे देवतांनी शिवाला त्याच्या ध्यानातून बाहेर येण्यासाठी पार्वतीला मदत केली. कामदेवाला शंकरावर श्रृंगारबाण चालविण्यास भाग पाडले. परंतु यामुळे शिवाने क्रोधित होत आपला तिसरा डोळा उघडला आणि कामदेवाला भस्मसात केले. तरीही, पार्वतीने तप सुरूच ठेवले. शेवटी शिवाला तिच्या तपश्चर्येवर प्रसन्न होवून मूळ रूपात तिला दर्शन द्यावे लागले. आणि पुढे दोघेही लग्नबंधनात अडकले. अशी आहे ही भारतीय संस्कृतीतील अजरामर प्रेमगाथा!