September Born People Personality: अंकशास्त्रानुसार, एखाद्या व्यक्तीची जन्मतारीख त्याचे व्यक्तिमत्व आणि भविष्य दर्शवते. त्याचप्रमाणे जन्माचा महिना एखाद्या व्यक्तीच्या वर्तन आणि स्वभावाविषयी रहस्य प्रकट करतो. इथे आम्ही सप्टेंबरमध्ये जन्मलेल्या लोकांबद्दल सांगत आहोत. अंकशास्त्रानुसार सप्टेंबर महिन्यात जन्मलेल्या लोकांवर मंगळाचा प्रभाव दिसून येतो. चला जाणून घेऊया सप्टेंबरमध्ये जन्मलेल्या व्यक्ती कशा असतात. त्यांचे गुण आणि तोटे काय असतात…?

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

महत्वाकांक्षी आणि दयाळू असतात
अंकशास्त्रानुसार सप्टेंबर महिन्यात जन्मलेले लोक खूप महत्त्वाकांक्षी आणि दयाळू असतात. त्यांना स्वातंत्र्य आवडते. हे लोक प्रामाणिक असतात आणि त्यांचा दृष्टिकोन मुक्तपणे ठेवतात. एकदा जे ठरवले ते पूर्ण करूनच ते निघून जातात. हे लोक किंचित विनोदी स्वभावाचे असतात, जरी त्यांच्यात प्रत्येक परिस्थितीनुसार स्वतःला साचेबद्ध करण्याची शक्ती असते. नात्यातील कोणत्याही प्रकारची फसवणूक त्यांना सहन होत नाही. त्यांना त्यांच्या आयुष्यात इतरांची ढवळाढवळ आवडत नाही.

आणखी वाचा : September Planet Gochar: सप्टेंबरमध्ये ३ ग्रहांच्या चालीमध्ये होणार बदल, या ४ राशींच्या व्यक्तींनी काळजी घ्या

स्वतःच्या हिमतीवर प्रगती करतात
सप्टेंबर महिन्यात जन्मलेले लोक मेहनती असतात. हे लोक नवीन लोकांशी फार लवकर जमत नाहीत. हे लोक नेहमी नवीन गोष्टी शिकण्याचा प्रयत्न करतात. त्यांचा जीवनात नेहमी व्यावहारिक विचार असतो. स्वतःच्या मेहनतीच्या जोरावर ते त्यांच्या करिअरमध्ये यशस्वी स्थान मिळवतात. त्यांना कोणत्याही समस्येचे समाधान लवकर मिळते. त्यांना प्रवासाची खूप आवड आहे. या लोकांना आयुष्यात काहीतरी मोठे करायचे असते. या महिन्यात जन्मलेले लोक वैवाहिक जीवनात चांगले मानले जातात. ते नेहमी त्यांच्या जबाबदाऱ्या पार पाडण्यासाठी पुढे येतात आणि त्यांच्या जोडीदाराला पूर्ण पाठिंबा देतात.

आणखी वाचा : Chanakya Niti: जर तुम्ही आर्थिक समस्येने त्रस्त असाल तर चाणक्यांच्या या धोरणांचा अवलंब करा, पैशांचा पाऊस पडेल

या क्षेत्रात करिअर करतात
या महिन्यात जन्मलेले लोक चांगले वैज्ञानिक, शिक्षक, सल्लागार, राजकारणी बनू शकतात. यासोबतच हे लोक इंजिनियर, डॉक्टर, पोलीस आणि आर्मीमध्येही आपले करिअर करू शकतात.

आणखी वाचा : Ganesh Chaturthi 2022: ज्योतिष शास्त्रानुसार ‘या’ राशींवर असते गणपतीची विशेष कृपा!

शुभ दिवस, शुभ रंग आणि संख्या जाणून घ्या
अंकशास्त्रानुसार, जर त्यांच्या भाग्यवान अंकांबद्दल बोलायचे झाले तर त्यांच्यासाठी ४, ५ आणि ६ हे अंक भाग्यवान मानले जातात. दुसरीकडे तपकिरी, निळा आणि हिरवा रंग त्यांच्यासाठी भाग्यवान मानला जातो. त्यांच्यासाठी बुधवार हा शुभ दिवस मानला जातो.

(टीप: येथे दिलेली सर्व माहिती सामान्य गृहीतके आणि माहितीवर आधारित आहे.)

मराठीतील सर्व राशी वृत्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Interesting and amazing facts about people who born in the month of september prp