आज बदलत्या काळानुसार आणि गरजांनुसार प्रत्येकाला सहज आणि लवकर पैसे कमवायचे आहेत. तसेच लोक त्यांच्या व्यवसायाव्यतिरिक्त वेगवेगळ्या माध्यमातून पैसे कमवण्याचा प्रयत्न करतात. शेअर बाजार हे देखील एक असे माध्यम आहे. काही वेळा थोडीशी रक्कम गुंतवल्याने माणूस होऊ कोटी रुपये देखील कमवू शकतो आणि काही लोकांना त्यात मोठे नुकसानही सहन करावे लागू शकते. अशा स्थितीत ज्योतिष शास्त्रानुसार शेअर बाजारातील गुंतवणुकीत नुकसान होण्याची शक्यता कमी करायची असेल तर राशीनुसार एखाद्या शुभ दिवशी शेअर्स खरेदी करणे फायदेशीर ठरू शकते. चला तर मग जाणून घेऊया कोणत्या राशीच्या लोकांनी कोणत्या दिवशी शेअर्समध्ये गुंतवणूक करणे शुभ मानले जाते.
आणखी वाचा : स्वप्नात ‘या’ जवळच्या व्यक्तींना पाहणे मानले जाते शुभ संकेत
मेष आणि वृश्चिक (Aries and Scorpio) : मेष आणि वृश्चिक राशीच्या लोकांनी मंगळवार किंवा गुरुवारी शेअर बाजारात गुंतवणूक केली तर ते त्यांच्यासाठी फायदेशीर मानले जाते.
वृषभ आणि तूळ (Taurus and Libra) : ज्योतिषशास्त्रानुसार या राशीचे लोक शनिवारी शेअर्स खरेदी करू शकतात.
आणखी वाचा : ‘या’ कारणामुळे करिश्मा कपूर सोबत मोडले लग्न, अक्षय खन्ना आजही आहे अविवाहित
मिथुन आणि कन्या (Gemini and Virgo) : मिथुन आणि कन्या राशीच्या लोकांसाठी बुधवार आणि शनिवार शेअर्स खरेदीसाठी शुभ मानले जातात.
कर्क आणि सिंह (Cancer and Leo) : कर्क आणि सिंह राशीच्या लोकांसाठी सोमवारचा दिवस लाभदायक मानला जातो.
आणखी वाचा : “अचानक कोणी तरी कारची खिडकी ठोठावली अन्…”, बिग बींना ‘या’ बॉलिवूड कलाकाराने दिला सुखद धक्का
धनु आणि मीन (Sagittarius and Pisces) : ज्योतिष शास्त्रानुसार धनु आणि मीन राशीच्या लोकांनी गुरुवारी शेअर्स खरेदी केले तर धनलाभ होतो.
मकर आणि कुंभ (Capricorn and Aquarius) : मकर आणि कुंभ राशीसाठी ज्योतिषशास्त्रानुसार शनिवार आणि बुधवार शेअर्स खरेदी किंवा विक्रीसाठी फायदेशीर मानले जातात.
आणखी वाचा : आलिया प्रेग्नेंट! कंडोम कंपनीने भन्नाट पोस्ट शेअर करत दिल्या शुभेच्छा
(येथे दिलेली माहिती सामान्य गृहीतके आणि माहितीवर आधारित आहे.)