दिवसभराच्या थकव्यानंतर शांत झोप ही प्रत्येकाला हवी असते. अशा स्थितीत अनेक जण झोपताच स्वप्नांच्या दुनियेत पोहोचतात. जिथे त्यांना वेगवेगळ्या प्रकारची स्वप्ने पडतात. यातील काही स्वप्ने आनंददायी असतात, तर काही इतकी भयानक असतात की माणूस घाबरून जागा होतो. स्वप्न शास्त्रानुसार, व्यक्ती झोपेत असताना वेगवेगळ्या प्रकारची स्वप्ने पाहतो. अशा परिस्थितीत प्रत्येक स्वप्न योग्य असेलच असे नाही. अशा परिस्थितीत अनेकांना स्वप्नात मासे दिसतात. सहसा स्वप्नात मासे पाहणे कधीकधी आनंददायी असू शकते. चला जाणून घेऊया स्वप्नात मासे पाहण्याचा अर्थ काय आहे.
स्वप्नात मासे पाहण्याचा अर्थ
स्वप्नात मासे दिसले तर ते खूप शुभ मानले जाते, कारण मासे हे महालक्ष्मीचे प्रतीक मानले जाते. अशा परिस्थितीत, जर एखाद्या व्यक्तीला स्वप्नात मासे दिसले तर याचा अर्थ असा होतो की, भविष्यात त्याला अचानक आर्थिक लाभ मिळू शकतो. माता लक्ष्मीच्या कृपेने प्रत्येक क्षेत्रात यश मिळू शकते.
हेही वाचा – इतरांपेक्षा चार पावले पुढे राहायचे असेल तर आचार्य चाणक्यांनी सांगितलेले ‘हे’ चार श्लोक कायम लक्षात ठेवा
स्वप्नात मोठा मासा पाहण्याचा अर्थ
स्वप्न शास्त्रानुसार, जर तुम्हाला स्वप्नात मोठा मासा दिसला तर याचा अर्थ माता लक्ष्मीची तुमच्यावर खूप कृपा होणार आहे देणार आहे. व्यवसायात प्रचंड यशासह आर्थिक लाभ होऊ शकतो. जीवनात प्रत्येक सुख येईल. सकारात्मक उर्जा वेगाने वाढेल, ज्यामुळे तुम्ही विलासी जीवन जगू शकाल.
स्वप्नात रंगीबेरंगी मासे पाहण्याचा अर्थ
स्वप्न शास्त्रानुसार,जर तुम्हाला स्वप्नात वेगवेगळ्या रंगांचे मासे दिसले तर समजा तुमच्या आयुष्यातील प्रत्येक दुःख संपणार आहे. सुख आणि सौभाग्य घरामध्ये दार ठोठावणार आहे. यासोबतच दीर्घकाळ चालणाऱ्या आजारापासूनही सुटका मिळेल.
हेही वाचा – ‘अशा’ स्त्रीबरोबर लग्न कराल, तर उजळेल नशीब; कशी असावी पत्नी? जाणून घ्या काय सांगते चाणक्य नीती
पोहणारे मासे स्वप्नात दिसणे
स्वप्न शास्त्रानुसार, जर तुम्हाला स्वप्नात मासे पोहताना दिसले तर समजून घ्या तुमच्या आयुष्यातही चांगले दिवस येणार आहेत. सुख-समृद्धी, धन-संपत्ती मिळू शकते. व्यवसाय आणि नोकरीतही काही चांगली बातमी मिळू शकते. मुलांकडूनही आनंद मिळू शकतो.
स्वप्नात माशांना खायला देण्याचा अर्थ
स्वप्न शास्त्रानुसार, जर तुम्ही स्वत:ला नदी, तलाव किंवा समुद्राच्या काठावर बसून माशांना खाऊ घालताना दिसले तर सुख-समृद्धीसोबतच धार्मिक कार्यात तुमची रुची वाढेल, असा विश्वास ठेवा.