सहसा प्रत्येक व्यक्ती स्वप्न पाहतो आणि असे म्हटले जाते की भविष्यातील चिन्हे स्वप्नांमध्ये लपलेली असतात. २ एप्रिलपासून चैत्र नवरात्रीला सुरुवात झाली आहे. म्हणूनच आपल्या सर्वांच्या मनात देवी-देवतांची प्रतिमा असते, ही प्रतिमा आपण स्वप्नातही पाहतो. पण तुम्हाला माहित आहे का माँ दुर्गाला स्वप्नात पाहणे याचा अर्थ काय? जाणून घेऊया स्वप्न शास्त्रानुसार…

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

स्वप्नात माँ दुर्गेचे दर्शन

स्वप्न शास्त्रानुसार माँ दुर्गेचे स्वप्नात दर्शन होणे खूप शुभ मानले जाते. तुमच्या आयुष्यातील सर्व संकटे दूर होणार असल्याचे हे लक्षण आहे, परंतु तुम्ही माँ दुर्गाला कोणत्या आसनात पाहिले आहे याकडेही लक्ष देणे आवश्यक आहे.

(हे ही वाचा: ‘या’ राशीच्या लोकांसाठी एप्रिल महिना असेल खूप शुभ! कामात मिळेल यश)

लाल कपड्यात दुर्गा माँचे दर्शन

लाल कपड्यात माँ दुर्गा हसतमुख मुद्रेत दिसली तर ती खूप शुभ मानली जाते. याचा अर्थ तुम्हाला जीवनातील संकटांपासून मुक्ती मिळणार आहे. यासोबतच तुम्हाला काही शुभ माहिती मिळू शकते किंवा तुम्हाला पैसे मिळू शकतात.

(हे ही वाचा: शुक्राच्या संक्रमणामुळे ‘या’ ५ राशींचे भाग्य खुलणार! नोकरी-व्यवसायात होईल प्रचंड लाभ)

स्वप्नात सिंहावर स्वार झालेली माँ दुर्गेचे दर्शन

जर तुम्हाला स्वप्नात माँ दुर्गा सिंहावर स्वार झालेली दिसली तर याचा अर्थ असा होतो की तुमची समस्या दूर होणार आहे. तसेच, जर तुम्हाला माँ दुर्गेचा सिंह संतप्त मुद्रेत आणि गर्जना करताना दिसला तर तुमच्या जीवनात अडचणी येऊ शकतात.

(हे ही वाचा: Numerology: ‘या’ जन्म तारखेचे लोकांना नशिबाने नाही तर, कष्टाने कमाव)

माँ दुर्गेला रौद्र रूपात पाहणे

जर तुम्ही माँ दुर्गाला स्वप्नात क्रोधित किंवा रौद्र मुद्रेत पाहिले असेल तर हे स्वप्न शुभ मानले जात नाही. याचा अर्थ असा आहे की आपण असे काही कृत्य किंवा चूक करत आहात. तसेच असे स्वप्न दिसल्यास आपल्या वागणुकीकडे व कामाकडे लक्ष द्यावे आणि आपले काही चुकले आहे असे वाटल्यास ते सुधारण्याचा प्रयत्न करावा व माँ दुर्गा यांची माफीही मागावी.

(येथे दिलेली माहिती गृहीतके आणि सामान्य माहितीवर आधारित आहे.)