स्वप्न शास्त्रानुसार, प्रत्येक स्वप्नाचा काही विशेष अर्थ असतो. तसेच, एखादी व्यक्ती जी स्वप्न पाहते त्याचा वास्तविक जीवनाशी काही तरी अर्थ असतो असंही मानलं जातं. मात्र, तुम्ही जे स्वप्न पाहिलं त्याचा वास्तविक जीवनात देखील तोच अर्थ असेल असं नाही. अशा परिस्थितीत, स्वप्नात जर तुम्ही स्वतःला रडताना पाहिले तर त्याचा काय परिणाम होऊ शकतो, तसेच स्वप्नात तुमची एखादी परीक्षा चुकली तर स्वप्न शास्त्रानुसार त्याचा अर्थ काय जाणून घेऊया.

स्वप्नात स्वतःला रडताना पाहणे

hya goshtila navach nahi 3
नितांतसुंदर दृश्यानुभूती
sneha chavan marathi actress got married for second time
लोकप्रिय मराठी अभिनेत्री दुसऱ्यांदा अडकली लग्नबंधनात; साधेपणाने पार…
sharad pawar reaction on bjp batenge to katenge slogan
नाव घेतले तर न्यायाल्यात खेचीन ‘ कोणी ‘ पाठविली शरद पवार यांना नोटीस !
Book Self discovery in space Science
बुकरायण: अंतराळातला आत्मशोध
Fear Avoidant Personality Disorder Personality relationship Personality Loksatta Chaturang
स्वभाव, विभाव: भीती आणि न्यूनगंडाचा फास
Fear, man behaviour, courage,
‘भय’भूती : …तर भयमुक्ती होईल
Dev Diwali 2024
देव दिवाळीला गजकेसरी योगामुळे ‘या’ राशीच्या लोकांचे नशीब उजळणार! अचानक धनलाभाचा योग, मिळेल पैसाच पैसा
sharad pawar nagpur, Sharad Pawar visits Nagpur,
पवार यांचा नागपूर दौरा, भाजपला इशारा अन् कॉंग्रेस नेत्यांशी खलबते

स्वप्न शास्त्रानुसार, जर तुम्ही स्वप्नात स्वतःला रडताना पाहिलं तर ते तुमच्यासाठी शुभ ठरु शकते. याचा अर्थ आगामी काळात तुमची प्रतिष्ठा वाढू शकते. तसेच तुम्हाला एखादा पुरस्कार मिळू शकतो. तुमची कोणतीही योजना यशस्वी होऊ शकते आणि तुम्हाला काही चांगली बातमी मिळू शकते.

स्वप्नात दुसऱ्या कोणाला रडताना पाहणे

जर तुम्हाला स्वप्नात दुसऱ्या एखाद्या व्यक्तीला रडताना पाहिलं तर स्वप्न शास्त्रात ते अशुभ लक्षण मानले जाते. तसेच, याचा अर्थ असा आहे की येत्या काही दिवसांत तुमच्या जवळच्या लोकांना अडचणी येऊ शकतात. तसेच तुम्हाला काही अशुभ माहिती मिळू शकते. तुमची धनहानीही होऊ शकते.

दुसऱ्या व्यक्तीबरोबर स्वत:ला रडताना पाहणे –

स्वप्न शास्त्रानुसार जर एखाद्या व्यक्तीने स्वप्नात स्वतःला दुसऱ्या व्यक्तीबरोबर रडताना पाहिले तर ते शुभ चिन्ह असू शकते. शास्त्रानुसार याचा अर्थ तुम्हाला आर्थिक लाभ होऊ शकतो. तसेच तुम्हाला काही चांगली बातमी मिळू शकते. तेथे तुमची कोणतीही इच्छा पूर्ण होऊ शकण्याची दाट शक्यता असते.

परीक्षा चुकल्याचे स्वप्न

जर तुम्ही परीक्षा चुकल्याचं स्वप्न पाहिलं तर ते अशुभ लक्षण मानलं जातं. त्या स्वप्नाचा अर्थ आगामी काळात तुमचा आत्मविश्वास कमी होऊ शकतो. तर परीक्षेत उत्तीर्ण होण्याचे आणि परीक्षेत पहिले येण्याचे स्वप्न पाहणे हे नशिबाचे सूचक मानले जाते. दुसरीकडे, परीक्षेत पूर्ण गुण मिळणे शुभ मानले जाते. याचा अर्थ आगामी काळात तुमची लोकप्रियता वाढू शकते.

(टीप: वरील लेख हा प्राप्त माहितीवर आधारित आहे)