सकाळच्या वेळी काही गोष्टी पाहणे ज्योतिषशास्त्रात शुभ मानले गेले आहे. असे म्हटले जाते की सकाळच्या वेळी तुम्ही काही शुभ गोष्टी पाहिल्या, तर तुमचा संपूर्ण दिवस चांगला जातो. तसेच, या गोष्टी पाहिल्यावर लक्ष्मीची विशेष कृपा आपल्यावर राहते. ज्योतिषशास्त्रात अशा अनेक गोष्टींबद्दल सांगण्यात आले आहे, ज्या सकाळी उठल्यावर पाहिल्या तर आपला संपूर्ण दिवस चांगला जातो.
ज्योतिषशास्त्रात असे सांगण्यात आले आहे की, सकाळी उठल्यावर आपण आपले दोन्ही हात पाहावेत. अशी मान्यता आहे की आपल्या हातांमध्ये सरस्वती, ब्रम्हा आणि लक्ष्मी वास करतात. त्यामुळे सकाळी उठल्यावर आपले हात पाहिल्याने व्यक्तीला आपल्या जीवनात सुख-समृद्धी आणि सौभाग्य प्राप्त होते. यासोबतच, ज्योतिषशास्त्रात सकाळच्या वेळी दिसणाऱ्या काही संकेतांबद्दलही सांगण्यात आले आहे. सकाळी उठताच या गोष्टी पाहणे शुभ मानले गेले आहे. आज आपण जाणून घेऊया, सकाळच्या वेळी कोणत्या वस्तू पाहिल्याने आपला संपूर्ण दिवस चांगला जाऊ शकतो.
जून महिन्याची सुरुवात ‘या’ राशींच्या लोकांसाठी ठरणार लाभदायक; देवी लक्ष्मीची मिळणार साथ
- सकाळी उठल्यावर जर तुम्हाला चिमण्यांचा चिवचिवाट ऐकू आला, तर समजून जा की तुमच्या दिवसाची सुरुवात चांगली झाली आहे.
- सकाळच्या वेळी जर एखादी विवाहित महिला तयार होऊन, हातात पूजेचे ताट घेऊन तुम्हाला दिसली, तर हा शुभ संकेत आहे. तुम्हाला एखादे मोठे काम मिळू शकते.
- सकाळ-सकाळ पांढरे फुल, हत्ती, इत्यादी गोष्टी पाहणे देखील शुभ आहे. अशा गोष्टी पाहिल्यास आपल्यावर लक्ष्मीची कृपा राहते.
- ज्योतिषशास्त्रानुसार सकाळी दूध, दही यांसारख्या गोष्टी दिसणे देखील शुभ आहे. हे तुमचे भाग्य दर्शवते.
- तसेच, गाय दिसणे हा एक शुभ संकेत आहे. जर एखाद्याला सकाळी गायीचे दर्शन होते, तर त्याला धनलाभ होण्याची शक्यता असते.
- जर सकाळच्या वेळी घराबाहेर कोणी साफसफाई करताना दिसले, तर याला शुभ संकेत मानले जाते. अशी मान्यता आहे की हे दृश्य पाहिल्यानंतर व्यक्तीची मोठ्या संकटातून सुटका होते.
गायत्री मंत्राचा जप करताना ‘या’ नियमांचे पालन अवश्य करा; अन्यथा होतील उलट परिणाम
- सकाळच्या वेळी नारळ, शंख सुपारी इत्यादी वस्तू पाहणे देखील शुभ आहे. यामुळे धनलाभ होण्याची शक्यता वाढते.
- सकाळी जाग येताच मंदिरातील घंटांचा आवाज ऐकू येणे, हे फारच शुभ मानले जाते. यामुळे व्यक्तीला शुभ वार्ता मिळू शकते, तसेच त्याचे अडकलेले काम मार्गी लागू शकते.
(येथे देण्यात आलेली माहिती गृहीतके आणि सामान्य माहितीवर आधारित आहे.)