लक्ष्मीला संपत्तीची देवी म्हटले जाते. ती भगवान विष्णूची पत्नी आहे. जेव्हा जेव्हा भगवान विष्णूची पूजा केली जाते तेव्हा त्यांच्यासोबत लक्ष्मीचीही पूजा केली जाते. असे केल्याने घरात सुख-समृद्धी येते आणि कुटुंबात एकता राहते, असे मानले जाते. ज्योतिष शास्त्रानुसार ज्या घरात धनाचे आगमन होणार असते, तेथे काही शुभ चिन्हे आधीपासूनच दिसतात. तुम्हीही ही चिन्हे ओळखू शकता.
- ज्योतिष शास्त्रानुसार जर तुमच्या उजव्या हाताला अचानक खाज सुटू लागली तर समजून घ्या की लक्ष्मी तुमच्यावर प्रसन्न झाली आहे आणि लवकरच तुमच्या घरात धन येणार आहे. आर्थिक लाभासोबतच तुम्हाला काही चांगली बातमी देखील मिळू शकते.
- तुमच्या घराचा मुख्य गेट किंवा अंगणात काळ्या मुंग्या येताना दिसल्या तर ते शुभ मानले जाते. काळ्या मुंग्यांचे आगमन हे अचानक कुठून तरी धनप्राप्तीचे लक्षण असल्याचे मानले जाते. तुमचे आतापर्यंत रखडलेले कामही पूर्ण होऊ शकते.
२३ मे पासून ‘या’ पाच राशींच्या लोकांचे चमकणार नशीब; देवी लक्ष्मीची विशेष कृपा राहणार
- अशी धार्मिक मान्यता आहे की जर तुम्ही सकाळी लवकर कामासाठी बाहेर पडत असाल आणि वाटेत तुम्हाला एखादी व्यक्ती झाडू मारताना दिसली तर याचा अर्थ लवकरच तुमची सर्व संकटे दूर होणार आहेत आणि लक्ष्मी तुमच्या घरात प्रवेश करेल.
- पक्ष्यांसाठी झाडांवर घरटी बांधणे सामान्य आहे. मात्र, तुमच्या घराच्या कोणत्याही कोपऱ्यात पक्ष्याने घरटे बांधले तर ते खूप शुभ मानले जाते. असे मानले जाते की हे तुमच्या घरात लक्ष्मीचे आगमन दर्शवते, जी पक्ष्यांच्या घरट्यातून तुम्हाला आधीच सूचित करते.
- ज्योतिष शास्त्रानुसार घराच्या कोणत्याही भिंतीवर ३ पाली एकत्र दिसल्या तर ते कुटुंबासाठी शुभ लक्षण मानले जाते. असे मानले जाते की ३ पाली एकत्र दिसणे हे त्या घरातील आर्थिक संकट लवकरच दूर होणार असल्याचे चिन्ह आहे.
(येथे देण्यात आलेली माहिती गृहीतके आणि सामान्य माहितीवर आधारित आहे.)