Jadatva Yog In Pisces : वैदिक ज्योतिष शास्त्रानुसार प्रत्येक ग्रह विशिष्ट कालावधीनंतर राशी बदलतात. अशा स्थितीत ग्रहांचं गोचर अनेक शुभ आणि अशुभ योग तयार होतात, ज्यामुळे काही राशींसाठी अच्छे दिन येतात, तर काही राशींच्या लोकांना संकटांचा सामना करावा लागतो. यात आता पापी ग्रह राहू सध्या मीन राशीत आहे. बुधदेखील ७ मार्च रोजी सकाळी ९.४० वाजता मीन राशीत प्रवेश करणार आहे. अशा स्थितीत राहू आणि बुध यांच्या संयोगामुळे जडत्व नावाचा अशुभ राजयोग तयार होत आहे. हा अशुभ योग तयार झाल्यामुळे लोकांना प्रत्येक क्षेत्रात अपयशाला सामोरे जावे लागू शकते. याबरोबरच मानसिक, शारीरिक, कौटुंबिक तसेच आर्थिक समस्यांना सामोरे जावे लागू शकते. चला जाणून घेऊया विनाशकारी जडत्व योग तयार झाल्यामुळे कोणत्या राशीच्या लोकांना काळजी घ्यावी लागेल…

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

ज्योतिष शास्त्रानुसार अशुभ ग्रह राहू एका राशीत सुमारे १६ महिने राहतो. अशा परिस्थितीत, एका राशीत परत येण्यासाठी त्याला सुमारे १८ वर्षे लागतात. त्यामुळे राहू आणि बुध यांच्या संयोगाने तयार होणारा जडत्व योग तब्बल १८ वर्षांनी तयार होत आहे. ९ एप्रिल २०२४ पर्यंत बुध या राशीत राहील, यानंतर जडत्व योग संपेल.

मेष राशी

राहू आणि बुध यांच्या संयोगामुळे तयार होणाऱ्या विनाशकारी जडत्व योगाचा मेष राशीच्या लोकांवर विपरित परिणाम होऊ शकतो. या राशीच्या लोकांना काही अडचणींचा सामना करावा लागू शकतो. छोट्या-छोट्या कामांसाठीही तुम्हाला जास्त मेहनत करावी लागू शकते. एकाग्रता आणि संयमाचा अभाव दिसू शकतो. याचबरोबर मानसिक तणावाचाही सामना करावा लागू शकतो. नोकरीत पदोन्नती किंवा वेतनवाढीसाठी तुम्हाला आणखी थोडी प्रतीक्षा करावी लागू शकते. एकाग्रतेच्या कमतरतेमुळे अभ्यासात मन रमणार नाही. आरोग्याबाबतीत थोडे सावध राहण्याची गरज असेल. आपल्या जीवनशैलीत थोडासा बदल करणे खूप महत्त्वाचे आहे. तसेच कोणत्याही प्रकारची आर्थिक गुंतवणूक करण्यापूर्वी काळजीपूर्वक विचार करा, कारण आर्थिक नुकसान होण्याची शक्यता आहे.

मीन राशी

राहू आणि बुध यांच्या संयोगामुळे एप्रिलपर्यंत मीन राशीच्या लोकांच्या आयुष्यात काही समस्या येऊ शकतात. कोणताही निर्णय घेण्यापूर्वी थोडा विचार करा, कारण त्याचा तुमच्या आयुष्यावर परिणाम होऊ शकतो. नोकरदार लोकांनी थोडे सावध राहणे आवश्यक आहे, कारण तुमचे प्रतिस्पर्धी तुमच्यावर वर्चस्व गाजवू शकतात. तुमचे काही गुप्त शत्रू तुमचे काही काम बिघडवू शकतात, त्यामुळे थोडी काळजी घेण्याची गरज आहे.

तुळ राशी

मीन राशीत तयार होणारा विनाशकारी जडत्व योग तुळ राशीच्या लोकांच्या आयुष्यात अडचणी घेऊन येऊ शकतो.
या राशीच्या लोकांना प्रत्येक गोष्टीसाठी अधिक मेहनत करावी लागू शकते. पण, खूप प्रयत्न केल्यानंतरही यश मिळविण्यात अडचणी येऊ शकतात. अनावश्यक चिंतेने तुम्ही त्रस्त होऊ शकता. व्यावसायिक क्षेत्रातीत काम करणाऱ्यांना थोडे अधिक धोरण आणि नियोजन आवश्यक असू शकते. याचबरोबर अनेक आव्हानांनाही सामोरे जावे लागू शकते. अनावश्यक खर्चामुळे तुम्ही त्रस्त राहू शकता. त्यामुळे अनावश्यक खर्च कमी करण्याचा प्रयत्न करा. नातेसंबंधही बिघडू शकतात, अन्यथा तुमच्या नात्यात तेढ निर्माण होऊ शकते. कोणत्याही प्रकारचा गैरसमज टाळण्याचा प्रयत्न करा. आरोग्याबाबत थोडे सावध राहण्याची गरज आहे. आपल्या भावनांवर नियंत्रण ठेवण्याचा प्रयत्न करा.

(टीप: वरील लेख हा प्राप्त माहितीवर आधारित आहे)

मराठीतील सर्व राशी वृत्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Jadatva yog in pisces rahu budh yuti 2024 mercury and rahu conjunction jadatva yog after 18 years negative impact on these zodiac sign sjr