जानेवारी महिन्यात ग्रह आणि नक्षत्रांच्या स्थितीत बराच बदल होत आहे. दोन ग्रहांचा राशी बदल आणि तीन ग्रहांता अस्त होत आहे. ग्रहांचा राजा सूर्य १४ जानेवारीला राशी बदलणार असून १६ जानेवारीला मंगळही राशी बदलणार आहे. तसेच बुध, शुक्र आणि शनि या तीन ग्रहांचा अस्त होणार आहे. वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार शुभ मानले जात नाही. ग्रह नक्षत्रांच्या अशा स्थितीमुळे खराब हवामान आणि नैसर्गिक आपत्तीसह रोगांचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता आहे. राहू ग्रह मीन राशीत असल्यामुळे कोरोनाचा प्रसार झपाट्याने होत आहे. राहू हा ग्रहही परदेश प्रवास, महामारी, राजकारणाचा कारक मानला जातो. तसेच ज्योतिष शास्त्रानुसार संसर्ग आणखी वाढू शकतो असे संकेतही ग्रहांनी दिले आहेत. ग्रहांमधील अशा बदलांचा परिणाम सर्व राशींवरही होईल. त्यामुळे काही लोकांच्या कामात अडथळे निर्माण होऊन धनहानी होण्याची चिन्हे आहेत.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा