January 2025 Planet Transits : वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार जानेवारी २०२५ मध्ये अनेक ग्रह राशी परिवर्तन करणार आहेत; ज्याचा प्रत्यक्ष, अप्रत्यक्षरीत्या मानवी जीवनावर परिणाम होणार आहे. त्यात ४ जानेवारीला ग्रहांचा राजकुमार बुध धनू राशीत प्रवेश करीत बुधादित्य राजयोग तयार करी ल. त्यानंतर १४ जानेवारीला ग्रहांचा राजा सूर्य देव मकर राशीतून भ्रमण करील आणि मकर संक्रांती होईल. त्यानंतर २१ जानेवारी रोजी ग्रहांचा सेनापती मंगळ गोचर करीत मिथुन राशीत प्रवेश करील.
२०२५ मध्ये या राशींवर राहील बुध, सूर्य अन् मंगळाची कृपा; धनलाभासह प्रत्येक क्षेत्रात मिळेल यश (January 2025 Planet Transits)
त्यानंतर २४ जानेवारीला बुध आणि सूर्याचा मकर राशीत संयोग होईल, ज्याने पुन्हा बुधादित्य राजयोग तयार होईल. तर, महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात म्हणजे २८ जानेवारीला शुक्र राशिबदल करीत मीन राशीत प्रवेश करील. या ग्रहांच्या राशी परिवर्तनामुळे काही राशींचे भाग्य उजळवू शकते. या राशींना करिअर आणि व्यवसायात यश मिळू शकते.
मकर
जानेवारीत बुध, सूर्य मंगळासह दोन राशींच्य हालचालीत बदल झाल्याने मकर राशीसाठी सोन्याचे दिवस येऊ शकतात. या काळात तुम्हाला करिअर आणि व्यवसायात प्रगती साधता येऊ शकते. वैवाहिक जीवन सुखकर होऊ शकते. धार्मिक सहलीचे भाग्यही लाभू शकते. वडिलोपार्जित व्यवसायाशी संबंधित असलेल्यांना लाभ होऊ शकतो. या काळात नोकरदार लोकांना कामाच्या ठिकाणी काही नवीन जबाबदारी मिळू शकते. कौटुंबिक जीवन सुखकर आणि आनंददायी असेल. प्रत्येक कामात कुटुंबाकडून तुम्हाला सर्वतोपरी सहकार्य मिळत राहील. यावेळी व्यावसायिकांना चांगला फायदा होऊ शकतो, तसेच व्यवसायाचा विस्तार वाढू शकतो.
मेष
पाच ग्रहांचा राशिबदल मेष राशीच्या लोकांसाठी अनुकूल ठरू शकतो. या काळात तुमच्या उत्पन्नात प्रचंड वाढ होऊ शकते. तसेच उत्पन्नाचे नवीन स्रोत निर्माण होऊ शकतात. मेष राशीच्या लोकांना त्यांच्या करिअरमध्ये प्रगती साधता येऊ शकते. आर्थिक लाभही मिळतील. तसेच तुम्हाला गुंतवणुकीचा फायदा मिळू शकेल. वैवाहिक जीवनात आनंद राहील आणि तसेच स्थळ पाहणाऱ्यांना योग्य जोडीदार मिळून, लवकरच विवाह होऊ शकतो. पैशांचे प्रलंबित व्यवहार पूर्ण होऊ शकतात. व्यावसायिकांना नवीन ऑर्डर मिळू शकतात, ज्यामुळे नफ्याची चांगली संधी मिळू शकेल.
तूळ
पाच ग्रहांचा राशिबदल तूळ राशीसाठी शुभ ठरू शकतो. या काळात तुमच्या सुख-सुविधांमध्ये वाढ होईल. नोकरी किंवा व्यवसायानिमित्त प्रवासाच्या अनेक संधी मिळू शकतात. तसेच या कालावधीत विवाहेच्छुक लोकांना विवाहाच्या संधी उपलब्ध होतील. आर्थिक क्षेत्रात प्रगती होईल. या काळात नोकरी आणि व्यवसायात प्रगती होऊ शकते. तुम्हाला नशिबाची पूर्ण साथ लाभेल. दीर्घकाळ चाललेल्या समस्या आता संपतील. तसेच रखडलेले काम पुन्हा एकदा सुरू होऊ शकते. तसेच यावेळी तुमच्या नियोजित योजना यशस्वी होतील.