Jupiter and Moon Conjunction: वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार ग्रहांचे नक्षत्र व राशी परिवर्तन होत असते. याचा प्रभाव सर्व १२ राशींवर कमी- अधिक प्रमाणात दिसून येऊ शकतो. जेव्हा एखादा ग्रह दुसऱ्या ग्रहाच्या गोचर कक्षेत परिक्रमण करताना एकमेकांच्या समोर येतो तेव्हा त्यातून विशेष राजयोग तयार होत असतात. असाच एक शुभ व लाभदायी असा गजकेसरी राजयोग येत्या ४८ तासात तयार होणार आहे. १७ मे ला गुरु व चंद्राच्या युतीने गजकेसरी राजयोग जुळून येत आहे. संध्याकाळी ७ वाजून ३९ मिनिटांनी मीन राशीतून निघून चंद्रदेव मेष राशीत येणार आहे. तसेच त्यानंतरचे अडीच दिवस म्हणजेच १९ मे पर्यंत चंद्र इथेच गुरूच्या प्रभावासह विराजमान असणार आहेत. या राजयोगाने नक्की कोणत्या राशीला कितपत फायदा होऊ शकतो हे पाहूया…
गजकेसरी राजयोग बनल्याने ‘या’ राशींवर माता लक्ष्मीची कृपा होणार?
मेष रास (Aries Zodiac)
गजकेसरी राजयोग हा मेष राशीच्या मंडळींसाठी विशेष लाभदायक ठरू शकतो. अर्थात याचे मुख्य कारण ही युती व राजयोग दोन्ही मेष राशीतच निर्माण होत आहे. या काळात मेष राशीला धन- ऐश्वर्य प्राप्त होऊ शकते ज्याचे स्रोत तुमच्या विचारांपलीकडचे असू शकतात. प्रलंबित काळापासून अडकून पडलेल्या कामाला वेग मिळून तुम्हाला आर्थिक पाठबळ लाभू शकते. नोकरदार मंडळींना पदोन्नती व पगारवाढ मिळण्याचे योग आहेत मात्र यासाठी काही गोष्टी समजुतीने घेण्याची गरज आहे.
मिथुन रास (Gemini Zodiac)
गुरु व चंद्रमाचा गजकेसरी राजयोग मिथुन राशीच्या मंडळींना करिअरमध्ये गरुडभरारी घेण्याची संधी देऊ शकतो. या काळात समाजात मान- सन्मान, पद- प्रतिष्ठा व धनलाभ या तिन्ही बाजूंनी आपल्याला सुखाचा काळ अनुभवता येऊ शकतो. तुम्हाला गुंतवणुकीतून अचानक व अनपेक्षित धनलाभ मिळू शकतो.
तूळ रास (Libra Zodiac)
मेष राशींमधील गजकेसरी राजयोग हा गुरु व चंद्राच्या कृपेसह लक्ष्मीचाही आशीर्वाद देऊ शकतो. तूळ राशीसाठी हा राजयोग लाभदायक ठरू शकतो. याकाळात व्यवसाय व नोकरी दोन्हींमधून आर्थिक लाभ होऊ शकतो. कौटुंबिक सुखासाठी तुम्हाला काही पाऊले पुढे यावे लागेल व मुख्य म्हणजे मानसिक स्थैर्य राखावे लागेल. तुम्हाला धार्मिक कामांसाठी प्रवासाचे योग आहेत, धनलाभासाठी आईवडील व जोडीदार अशा दोघांचाही हातभार लागू शकतो.
हे ही वाचा<< बुध मार्गी होऊन आज रात्रीपासून ‘या’ 5 राशी होतील गडगंज श्रीमंत? महिनाभर ‘या’ मार्गे प्रचंड धनलाभ मिळू शकतो
गजकेसरी राजयोग केव्हा तयार होतो?
ज्योतिषशास्त्रानुसार, जेव्हा गुरु व चंद्रमा एकाच राशीत येतात तेव्हा यातून हा राजयोग निर्माण होतो. यासाठी कुंडलीमध्ये दोन्ही ग्रह पहिल्या, चौथ्या, सातव्या व दहाव्या स्थानी असणे गरजेचे आहे.
(टीप: वरील लेख हा प्राप्त माहितीवर आधारित आहे)