नऊ ग्रहांच्या स्थितीत एका ठराविक कालावधीनंतर निश्चितपणे बदल होत असतो. वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार, ग्रहांचा स्वामी गुरु नक्षत्र परिवर्तन करत असतात. २१ जून रोजी दुपारी १ वाजून १९ मिनिटांनी गुरूने मेष राशी भरणीच्या दुसऱ्या चरणात प्रवेश केला होता आणि आता २७ नोव्हेंबर २०२३ पर्यंत तो या नक्षत्रात राहणार आहे. यानंतर तो अश्विनी नक्षत्राच्या पहिल्या चरणात प्रवेश करेल. गुरू भरणी नक्षत्रात राहिल्याने अनेक राशींना फायदा होऊ शकतो, तर काही राशींनी काळजी घेणे आवश्यक आहे. गुरु भरणी नक्षत्रात राहिल्याने कोणत्या राशींना फायदा होऊ शकतो ते जाणून घेऊया.
मेष रास (Aries Zodiac Sign)
कुंडलीच्या नवव्या आणि बाराव्या स्थानाचा स्वामी गुरु आहे आणि सध्या तो पहिल्या स्थानी विराजमान आहे. यासोबतच भरणी नक्षत्रात प्रवेश केल्याने पाचव्या स्थानी त्यांची दृष्टी पडणार आहे, ज्याला भाग्याचे स्थान मानले जाते. त्यामुळे मेष राशीच्या लोकांना अचानक आर्थिक लाभासोबतच व्यवसायात मोठे यश मिळू शकते. तसेच वैवाहिक जीवनात आनंद राहू शकतो.
मिथुन रास (Gemini Zodiac Sign)
मिथुन राशीच्या कुंडलीतील सातव्या आणि दहाव्या स्थानी गुरुचे राज्य आहे. त्यामुळे गुरुने भरणी नक्षत्रात प्रवेश केल्याने या राशीच्या लोकांच्या अनेक इच्छा पूर्ण होऊ शकतात. अचानक आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे. सर्जनशील कार्यात तुमची आवड वाढू शकते.
कर्क रास (Cancer Zodiac Sign)
कर्क राशीसाठी गुरु सहाव्या आणि नवव्या घराचा स्वामी आहे. या राशीच्या लोकांसाठी देखील गुरूच्या नक्षत्रात होणारा बदल आनंद आणू शकतो. सरकारी नोकरीची तयारी करणाऱ्या लोकांना यश मिळू शकते. यासोबतच नोकरदार लोकांना प्रमोशन मिळू शकते. या काळात विचार करून व्यवसायात पैसे गुंतवू शकता.
तुळ रास (Libra Zodiac Sign)
गुरुचे गोचर तुळ राशीसाठी अद्भुत असणार आहे. नोव्हेंबर महिन्यापर्यंत या राशीच्या लोकांना व्यवसायातील प्रगतीसह आर्थिक लाभ मिळू शकतो. बरेच दिवस थांबलेले काम पुन्हा मार्गी लागू शकतात. नवीन नोकरीचा शोधही पूर्ण होऊ शकतो.
हेही वाचा- ५ दिवसांनी गजकेसरी राजयोग बनल्याने ‘या’ राशींची स्वप्न होणार पूर्ण? पैसाच पैसा मिळवायची हीच वेळ
धनु रास (Sagittarius Zodiac Sign)
गुरुने भरणी नक्षत्रात प्रवेश केल्याने धनु राशीच्या लोकांना आर्थिक लाभासह शारीरिक आणि मानसिक त्रासांपासून मुक्ती मिळू शकते. नोकरदार लोकांना पगारवाढीसह प्रमोशन मिळण्याची दाट शक्यता आहे. वैवाहिक जीवनातही प्रेम वाढू शकते.
(टीप: वरील लेख हा प्राप्त माहितीवर आधारित आहे)