Guru Planet Vakri : ज्योतिषशास्त्रानुसार, प्रत्येक ग्रह एका विशीष्ट कालावधीत राशी परिवर्तन आणि वक्री चाल असते. याचा थेट परिणाम मानवी जीवनावर होतो. ज्ञान आणि वृद्धी देणारे देवगुरु २९ जुलै रोजी स्वतःच्या मीन राशीत पूर्ववत होणार आहेत. जिथे ते १०८ दिवस वक्री अवस्थेत राहणार आहे.
ज्योतिष शास्त्रामध्ये गुरूचा संबंध ज्ञान, वाढ, शिक्षक, संतती, शिक्षण, संपत्ती, दान आणि पुण्य यांच्याशी आहे. त्यामुळे गुरु देवाच्या वक्री प्रभावाचा परिणाम सर्व राशींवर होईल. पण ३ राशी आहेत, ज्यांना गुरूच्या वक्री चालीमुळे चांगले पैसे मिळू शकतात. चला जाणून घेऊया कोणत्या आहेत या ३ राशी…
आणखी वाचा : ३० वर्षांनंतर मूळ त्रिकोण राशीत शनी देईल शुभ परिणाम, ‘या’ राशींच्या व्यक्तीचे भाग्य एका रात्रीत उजळू शकतं
वृषभ : तुमच्या राशीतून गुरू ग्रह अकराव्या भावात वक्री होईल. ज्याला ज्योतिषशास्त्रात उत्पन्न आणि लाभाचे घर मानले जाते. त्यामुळे या काळात तुमचे उत्पन्न चांगले वाढू शकते. यासोबतच या काळात उत्पन्नाचे नवीन स्रोतही निर्माण होऊ शकतात. व्यवसायात चांगला फायदा होण्याचे संकेत आहेत. तसेच कोणताही व्यवसाय करार अंतिम होण्याची शक्यता आहे. ज्यामुळे तुम्ही चांगले पैसे कमवू शकता. या काळात तुमची कार्यशैली देखील सुधारेल, ज्यामुळे तुमच्या ऑफिसमध्ये कौतुक होऊ शकतं. नवीन व्यवसाय सुरू करू इच्छिणाऱ्यांसाठी वेळ लाभदायक असणार आहे. तसेच गुरु हा तुमच्या ८ व्या घराचा स्वामी आहे. त्यामुळे या वेळी संशोधन क्षेत्राशी निगडीत असलेल्यांना हा काळ यशाने परिपूर्ण असणार आहे. तसेच कोणत्याही जुनाट आजारापासून मुक्ती मिळू शकते.
आणखी वाचा : पुढील २० दिवस या राशींच्या व्यक्तींसाठी शुभ असतील, उत्पन्नासह करिअरमध्ये प्रगतीची शक्यता!
मिथुन : देवगुरुच्या वक्री होताच तुमच्या जीवनात महत्त्वपूर्ण बदल घडू शकतात. कारण गुरु ग्रह तुमच्या दशम भावात वक्री असेल. ज्याला नोकरी, व्यवसाय आणि कामाची जागा म्हणतात. त्यामुळे यावेळी तुम्हाला नवीन नोकरीची ऑफर मिळण्याची शक्यता आहे. तसेच यावेळी तुम्हाला प्रमोशन मिळू शकते. यावेळी तुम्हाला व्यवसायात चांगला फायदा होऊ शकतो. यासोबतच या काळात नवीन व्यावसायिक संबंधही निर्माण होऊ शकतात आणि व्यवसाय विस्तारण्याची चिन्हे आहेत. त्याचबरोबर मार्केटिंग आणि मीडिया क्षेत्रात काम करणाऱ्यांसाठी हा काळ अनुकूल असणार आहे. दुसरीकडे, मिथुन बुध ग्रहाद्वारे शासित आहे आणि ज्योतिषशास्त्रानुसार, बुध आणि गुरु यांच्यात मैत्रीची भावना आहे. त्यामुळे गुरूची वक्री स्थिती तुमच्यासाठी फायदेशीर ठरू शकते. तुम्ही पन्ना किंवा गोमेद घालू शकता, जे तुमच्यासाठी भाग्यवान रत्न ठरू शकते.
आणखी वाचा : Nag Panchami 2022: कधी आहे यंदाची नागपंचमी? जाणून घ्या पूजेचा शुभमुहूर्त, पूजा विधी आणि महत्व
कर्क : तुमच्या राशीतून गुरू नवव्या भावात वक्री होईल. जे भाग्याचे घर आणि परदेश प्रवास मानले जाते. त्यामुळे या काळात तुम्हाला नशिबाची पूर्ण साथ मिळेल असे दिसते. तसेच देवगुरु वक्री होताच तुमची रखडलेली कामे होतील. तुम्ही व्यवसायाच्या संदर्भात प्रवास देखील करू शकता, जे तुमच्यासाठी फायदेशीर ठरू शकते. दुसरीकडे, ज्या लोकांचा व्यवसाय परदेशाशी संबंधित आहे त्यांना चांगला फायदा होऊ शकतो.
दुसरीकडे, ज्या लोकांचा व्यवसाय खाद्यपदार्थ, हॉटेल्स, रेस्टॉरंट्स, धान्यांशी संबंधित आहे, ते लोक यावेळी चांगले पैसे कमवू शकतात. दुसरीकडे, गुरु ग्रह हा तुमच्या सहाव्या घराचा स्वामी आहे, जे रोग, कोर्ट आणि शत्रूचे स्थान मानले जाते. त्यामुळे या काळात तुम्हाला शत्रूंवर विजय मिळेल आणि गुप्त शत्रूंचा नाश होईल. यावेळी तुम्ही चंद्र किंवा मोती स्टोन घालू शकता. जे तुमच्यासाठी फायदेशीर ठरेल. त्याचबरोबर तुमच्या राशीचा स्वामी चंद्र ग्रह आणि गुरू यांच्यात मैत्रीची भावना आहे आणि त्यामुळे हा बदल तुमच्यासाठी शुभ ठरू शकतो.