Amla Rajyog 2023: ज्योतिष शास्त्रानुसार, कुंडलीत उपस्थित असलेले सर्व ग्रह वेळोवेळी आपली राशी बदलत राहतात.  ज्योतिषशास्त्रामध्ये एका ठराविक काळानंतर ग्रह त्यांच्या राशीमध्ये बदल करतात. यामध्ये प्रत्येक ग्रहाचे स्वतःचे महत्त्व आहे. प्रत्येक ग्रहाच्या गोचरचा सर्व राशीच्या लोकांवर चांगला आणि वाईट प्रभाव पडत असतो. आता तब्बल बारा वर्षांनंतर देवगुरू बृहस्पति ०४ सप्टेंबर २०२३ रोजी दुपारी ०४.५८ वाजताच्या दरम्यान वक्री होणार आहेत. याचा काही राशींवर शुभ परिणाम पाहायला मिळू शकतो. सोबतच यावेळी ‘अमला योग’ तयार होत आहे. वैदिक ज्योतिषशास्त्रात हा योग शुभ मानला जातो. हा योग तीन राशींसाठी भाग्यवान ठरु शकतो. या काळात नशीब त्यांच्यासोबत असू शकतो. यासोबतच संपत्ती आणि पद ही मिळू शकतो. चला जाणून घेऊयात कोणत्या राशींचा यात समावेश आहे.

‘या’ राशींच्या लोकांचे भाग्य चमकणार?

मिथुन राशी

अमला योग मिथुन राशीतील मंडळींसाठी लाभदायक ठरु शकतो. व्यवसायात सुरू असलेले अडथळे दूर होऊ शकतात. बढतीचे जोरदार संकेत आहेत. जुन्या गुंतवणुकीमुळे आर्थिक स्थिती मजबूत होऊ शकते. उत्पनाचे नवे स्रोत मिळू शकतात. कंपन्यांमध्ये काम करणाऱ्यांना प्रमोशन मिळू शकते. वडिलोपार्जीत मालमत्तेतून लाभ मिळू शकतो.

Samsaptak Yog 2025
मिथुन राशीमध्ये निर्माण होतोय समसप्तक, ‘या’ ३ राशींच्या लोक जगतील सुख-समृद्धीचे जीवन, आयुष्यात होईल आनंदी आनंद
women naga sadhu life
कसे असते महिला नागा साधूंचे जीवन? त्यांचा पेहराव…
In 17 days, these three zodiac signs will live a life of luxury and comfort
१७ दिवसांनी ‘या’ तीन राशी जगतील ऐशो-आरामाचे आयुष्य! शुक्र करणार मीन राशीत प्रवेश, नवीन नोकरीमुळे प्रगतीचा योग
Shani rashi Parivartan 2025
येणारे ८० दिवस शनी करणार कल्याण; ‘या’ तीन राशीच्या व्यक्तींना सुख-समृद्धी अन् आकस्मिक धनलाभ होणार
The luck of these zodiac signs will shine on January 28th
२८ जानेवारीला चमकणार ‘या’ तीन राशींचे नशीब, शुक्र ग्रह निर्माण करणार मालव्य राजयोग!
Shani Pluto Ardhakedra yog
२२ जानेवारीपासून शनी घेऊन येणार गडगंज श्रीमंती; अर्धकेंद्र योग ‘या’ तीन राशीच्या व्यक्तींचे नशीब बदलणार
Shani and shukra made dhanadhya yoga
३० वर्षानंतर धनाढ्य योगामुळे ‘या’ राशींचे नशीब चमकणार! शनी आणि शुक्राची होईल असीम कृपा
From Makar Sankranti the locks of luck of these 5 zodiac signs
मकर संक्रातीपासून ‘या’ ५ राशींच्या नशीबाचे टाळे उघडणार! चांगले दिवस सुरू होणार, सूर्याच्या कृपेने भाग्य चमकणार

(हे ही वाचा : ‘विपरीत राजयोग’ बनल्याने ‘या’ राशी बनणार श्रीमंत? बुधदेवाच्या कृपेने मिळू शकतो बक्कळ पैसा )

सिंह राशी

अमला योग बनल्याने सिंह राशीतील लोकं ज्या कामात हात घालतील त्यात यश मिळू शकतो. या काळात उत्तम संधी मिळू शकतात. तुमच्या सुखसोयींमध्ये वाढ होऊ शकते. तुम्ही नवीन मालमत्ता किंवा नवीन वाहन खरेदी करू शकता. तुम्हाला तुमच्या आईच्या माध्यमातून पैसा मिळू शकेल. ज्या लोकांचा स्वतःचा व्यवसाय आहे, त्यांना भरपूर पैसा मिळू शकतो.

मीन राशी

मीन राशीच्या लोकांसाठी तयार होणारा अमला योग लाभदायक ठरु शकतो. या राशीतील लोकांना लोकांना अचानक आर्थिक लाभ होऊ शकतो. या दरम्यान तुमच्या नोकरीत बढती मिळण्याची शक्यता आहे. मान-सन्मानात वाढ होऊ शकते. तुमच्या कामाचे कौतुक होऊ शकते. मुलांकडून चांगली बातमी मिळू शकते. धार्मिक कार्यात रस वाढू शकतो.

(टीप: वरील लेख हा प्राप्त माहितीवर आधारित आहे)

Story img Loader