प्रत्येक ग्रह विशिष्ट कालावधीनंतर आपली स्थिती बदलतो. ग्रहांच्या स्थितीतील हा बदल सर्व राशीच्या लोकांच्या जीवनावर परिणाम करतो. काही दिवसांपूर्वी १२ वर्षांच्या प्रदीर्घ कालावधीनंतर गुरू ग्रह स्वतःच्या राशीत गोचर करत आहेत. २४ नोव्हेंबरपर्यंत तो या राशीत राहील. ज्योतिषशास्त्रानुसार, गुरूच्या वक्री हालचालीचा सर्व राशीच्या लोकांच्या जीवनावर परिणाम होईल, परंतु तीन राशीच्या लोकांच्या जीवनावर त्याचा विशेष प्रभाव दिसून येईल. तीन राशीच्या लोकांना या काळात त्यांच्या व्यवसाय आणि व्यावसायिक जीवनात मोठे यश मिळण्याची शक्यता आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

वृषभ: गुरूचे वृषभ राशीच्या ११ व्या भावात गोचर केले आहे. ज्योतिषशास्त्रानुसार हे उत्पन्न आणि लाभाचे घर मानले जाते. गुरूच्या प्रतिगामी स्थितीमुळे वृषभ राशीच्या लोकांच्या उत्पन्नात वाढ होण्याची शक्यता आहे. नवीन स्त्रोतांकडून उत्पन्न मिळेल. या काळात तुम्हाला व्यवसायात चांगला नफा मिळण्याची शक्यता आहे. अनेक महत्त्वाचे व्यवहार होण्याची शक्यता आहे. वाहन आणि मालमत्ता खरेदीसाठी हा काळ चांगला राहील. गुरू तुमच्या कुंडलीचा आठवा स्वामी आहे. त्यामुळे संशोधनाशी संबंधित लोकांसाठी हा काळ चांगला राहील. जुन्या आजारांपासून मुक्ती मिळण्याचे योग आहेत. मिल्की क्रिस्टल जेमस्टोन धारण केल्याने तुम्हाला खूप फायदा होईल.

आणखी वाचा : Chanakya Niti: घर स्वर्गासारखं होईल! चाणक्यांच्या या ४ गोष्टी लक्षात ठेवा!

मिथुन: या राशीच्या लोकांना गुरूच्या वक्री काळात नोकरी आणि व्यवसायात अपेक्षित यश मिळू शकते. गुरू तुमच्या कुंडलीच्या दहाव्या भावातून गोचर करत आहे. हे घर नोकरी, व्यवसाय आणि कामाचे ठिकाण मानले जाते. या काळात नवीन नोकरीची ऑफर येण्याची शक्यता आहे. पदोन्नती आणि पगारवाढीची शक्यता दिसत आहे. व्यवसायात नवीन उपक्रम नफा मिळवून देऊ शकतात. व्यवसायात विस्तार होण्याची शक्यता आहे. चांगले पैसे मिळण्याची शक्यता आहे. कोर्ट-कचेरीच्या कामात यश मिळेल. या राशीच्या लोकांना पन्ना धारण केल्याने लाभ होईल.

आणखी वाचा : Dussehra 2022 : यावर्षी दसरा ४ की ५ ऑक्टोबरला? जाणून घ्या शुभ मुहूर्त आणि महत्त्व

कर्क : वक्री गुरूमुळे अचानक आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे. तुमच्या कुंडलीच्या नवव्या घरात गुरूची दृष्टी आहे. त्यामुळे या काळात तुम्हाला नशिबाची पूर्ण साथ मिळेल. दीर्घकाळ दुर्लक्षित राहिलेल्या कामात यश मिळेल. कामामुळे छोटे प्रवास होण्याची शक्यता आहे आणि या प्रवासामुळे तुम्हाला फायदा होईल. परदेशाशी संबंधित व्यवसाय करणाऱ्यांसाठीही हा काळ अनुकूल राहील.

(टीप-येथे दिलेली माहिती सामान्य गृहीतके आणि माहितीवर आधारित आहे..)

मराठीतील सर्व राशी वृत्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Jupiter retrograde after 12 years before november 24 these people may suddenly gain money prp