Jupiter Retrograde 2024: गुरु हा ग्रह देवतांचा गुरू मानला जातो. गुरु म्हणजे बृहस्पति हा समृद्धी, मान, प्रतिष्ठा, वैभव, ज्ञान आणि गुरु यांचा कारक मानला जातो. ज्योतिषशास्त्रानुसार, ग्रह विशिष्ट अंतराने त्यांच्या राशीमध्ये बदल करतात. ग्रह गोचर प्रमाणे वक्री आणि मार्गी देखील होतात. ग्रहांच्या या स्थिती बदलाचा प्रत्येक राशींच्या व्यक्तींवर परिणाम होताना दिसतो. जेव्हा कुंडलीमध्ये गुरूची स्थिती मजबूत असते तेव्हा व्यक्तीला प्रत्येक कार्यात अपार यश मिळतं, असं म्हणतात. यावेळी मान-प्रतिष्ठेचा कारक असलेला बृहस्पति ऑक्टोबर महिन्यात वक्री होणार आहे. ज्योतिषशास्त्रानुसार, गुरू ०९ ऑक्टोबर रोजी सकाळी १०:०१ वाजता वृषभ राशीमध्ये वक्री होणार आहेत आणि २०२५ मध्ये ०४ फेब्रुवारी २०२५ रोजी दुपारी ०१:४६ वाजता मार्गी होतील. बृहस्पतिच्या अशा हालचालीमुळे काही राशींना विशेष लाभ मिळण्याची शक्यता आहे. कोणत्या राशीच्या व्यक्तींना लाभ मिळणार ते पाहुया…

‘या’ राशींचं नशीब पालटण्याची शक्यता

मिथुन राशी (Gemini Zodiac)

मिथुन राशीच्या लोकांसाठी गुरूची वक्री हालचाल फायदेशीर ठरु शकते. तुमच्या इच्छा पूर्ण करण्यात तुम्ही यशस्वी होऊ शकता. तुम्हाला गुंतवणुकीचा फायदा होण्याची शक्यता आहे. कामाच्या ठिकाणी यश मिळण्याची शक्यता आहे. व्यवसायात सतत नफा मिळू शकतो. या काळात तुम्ही पैसा कमवण्यात आणि संपत्ती जमा करण्यात यशस्वी व्हाल. तुम्हाला गुंतवणुकीतून मोठा फायदा होऊ शकतो. तुम्हाला नशिबाची साथ मिळण्याची शक्यता आहे. कायदेशीर वादात अडकलेल्या लोकांना यावेळी दिलासा मिळण्याची शक्यता आहे. 

Diwali 2024 horoscope three zodiac signs
दिवाळी घेऊन येणार सुखाचे दिवस; ‘या’ तीन राशीच्या व्यक्तींना नोव्हेंबर महिन्यात मिळणार भरपूर पैसा, प्रेम अन् मानसन्मान
MNS Chief Raj Thackeray
महाराष्ट्राचा पुढचा मुख्यमंत्री कोण होईल? राज ठाकरेंनी थेट…
Saturn transit 2024 in Aquarius
येणारे १५३ दिवस शनीच्या कृपेने दारी नांदणार लक्ष्मी; ‘या’ चार राशींचे व्यक्ती कमावणार बक्कळ पैसा
Dhantrayodashi 2024 Shubh Muhurat to buy Gold| Dhanteras 2024 Gold Buying Time
Dhantrayodashi 2024 Shubh Muhurat : धनत्रयोदशीच्या दिवशी सोने-चांदी कोणत्या शुभ मुहूर्तावर खरेदी करावे? जाणून घ्या योग्य वेळ
Surya In Tula Rashi
पुढील काही तासांत सूर्याचा जबरदस्त प्रभाव; स्वाती नक्षत्रातील प्रवेशाने ‘या’ राशींचे चमकणार भाग्य
Sun God has entered the sign of Venus
सूर्य देवाने शुक्रच्या राशीमध्ये केला प्रवेश! ‘या’ ३ राशींच्या लोकांना मिळणार अपार धन और पद-प्रतिष्ठा
Budh Gochar 2024
५ वर्षांनंतर धनत्रयोदशीला निर्माण होईल लक्ष्मी नारायण राजयोग! ‘सोन्याचा हंडा घेऊन लक्ष्मी ठोठावेल ‘या’ राशींच्या मंडळींचे दार
Dhanteras 2024 Lucky Horoscope
धनत्रयोदशीपासून बक्कळ पैसा; त्रिग्रही योगाच्या प्रभावाने ‘या’ ५ राशीच्या व्यक्ती कमावणार पैसा, मानसन्मान अन् भौतिक सुख

(हे ही वाचा : बुधदेव करणार मालामाल! सप्टेंबरपासून ‘या’ राशीच्या व्यक्तींना मिळणार पैसा? १२ महिन्यांनी बुध स्वतःच्या राशीत येताच कुणाला होणार फायदा?)  

कर्क राशी (Cancer Zodiac)

गुरूची वक्री हालचाल कर्क राशीच्या लोकांसाठी लाभदायी ठरु शकते. या काळात आर्थिक स्थिती चांगली राहू शकते. बरेच दिवस अडकलेले पैसे परत मिळू शकतात. नौकरी करणाऱ्या लोकांच्या पगारात वाढ होण्याची दाट शक्यता आहे. गुंतवणुकीसाठी हा चांगला काळ ठरु शकतो. यावेळी तुमच्या सर्व मनोकामना पूर्ण होऊ शकतात. या काळात तुम्ही प्रभावशाली लोकांशी संबंध निर्माण करू शकता. व्यवसायातही तुम्हाला चांगला नफा मिळू शकतो. नोकरदार लोकांना करिअरच्या दृष्टीने अनेक सुवर्ण संधी मिळू शकतात. 

वृश्चिक राशी (Scorpio Zodiac)

देवगुरुच्या कृपेने वृश्चिक राशीच्या लोकांना सुखाचे दिवस अनुभवता येऊ शकतात. तुमच्या मेहनतीचे फळ तुम्हाला या काळात मिळण्याची शक्यता आहे. या कालावधीत तुम्हाला वेळोवेळी अनपेक्षित पैसे मिळू शकतात. करिअर आणि व्यवसायात तुमची प्रगती होऊ शकते. बेरोजगारांना नवीन नोकरी मिळू शकते. उत्पन्नाचे नवीन स्रोत निर्माण होऊ शकतात. यावेळी तुम्हाला तुमच्या मुलांकडून काही चांगली बातमी मिळू शकते. या कालावधीत देशांतर्गत आणि परदेशात प्रवास करण्याची शक्यता आहे.

(टीप: वरील लेख हा प्राप्त माहितीवर आधारित आहे)