Jupiter Retrograde 2024: गुरु हा ग्रह देवतांचा गुरू मानला जातो. गुरु म्हणजे बृहस्पति हा समृद्धी, मान, प्रतिष्ठा, वैभव, ज्ञान आणि गुरु यांचा कारक मानला जातो. ज्योतिषशास्त्रानुसार, ग्रह विशिष्ट अंतराने त्यांच्या राशीमध्ये बदल करतात. ग्रह गोचर प्रमाणे वक्री आणि मार्गी देखील होतात. ग्रहांच्या या स्थिती बदलाचा प्रत्येक राशींच्या व्यक्तींवर परिणाम होताना दिसतो. जेव्हा कुंडलीमध्ये गुरूची स्थिती मजबूत असते तेव्हा व्यक्तीला प्रत्येक कार्यात अपार यश मिळतं, असं म्हणतात. यावेळी मान-प्रतिष्ठेचा कारक असलेला बृहस्पति ऑक्टोबर महिन्यात वक्री होणार आहे. ज्योतिषशास्त्रानुसार, गुरू ०९ ऑक्टोबर रोजी सकाळी १०:०१ वाजता वृषभ राशीमध्ये वक्री होणार आहेत आणि २०२५ मध्ये ०४ फेब्रुवारी २०२५ रोजी दुपारी ०१:४६ वाजता मार्गी होतील. बृहस्पतिच्या अशा हालचालीमुळे काही राशींना विशेष लाभ मिळण्याची शक्यता आहे. कोणत्या राशीच्या व्यक्तींना लाभ मिळणार ते पाहुया…
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा