ज्योतिषशास्त्रात प्रत्येक ग्रहाच्या स्थितीबद्दल माहिती आणि त्याचे विशेष महत्त्वही सांगण्यात आले आहे. ग्रहाच्या संक्रमणाचा किंवा राशी परिवर्तनाचा सर्व राशींवर शुभ किंवा अशुभ प्रभाव पडतो. गुरु ग्रहाने २९ जुलैला मीन राशीमध्ये प्रवेश केला होता. यावेळी गुरु विक्री अवस्थेत होता. आता २६ ऑक्टोबरला गुरु मीन राशीत मार्गी होणार असून तो २४ नोव्हेंबरपर्यंत याच राशीत राहील. यानंतर काही राशींचे नशीब चमकू शकते. या राशी कोणत्या आहेत ते जाणून घेऊया.
कर्क: या काळात कर्क राशीच्या लोकांना नशिबाची पूर्ण साथ मिळेल. त्यांची रखडलेली कामे पूर्ण होतील, तसेच त्यांना व्यवसायात चांगला फायदा होऊ शकतो. जे लोक परदेशी व्यापारात गुंतलेले आहेत. त्यांना अधिक फायदा होईल. तसेच, व्यवसायाशी संबंधित बाबींसाठी तुम्ही परदेशात जाऊ शकता.
कुंभ: मीन राशीत गुरू स्थित असल्यामुळे या राशींच्या लोकांची आर्थिक स्थिती मजबूत होईल. तसेच, या काळात विद्यार्थ्यांना अपेक्षित यश मिळू शकते. कामाच्या ठिकाणी तुमचे कौतुक होईल. व्यवसायात नफा होऊन उत्पन्नाचे स्रोतही वाढू शकतात.
मंगळ देव बदलणार आपली रास; ‘या’ राशींच्या लोकांसाठी तयार होत आहेत विदेश यात्रेसह धनलाभाचे प्रबळ योग
वृषभ: वृषभ राशीच्या लोकांसाठी हा काळ चांगला सिद्ध होऊ शकतो. या काळात वृषभ राशीच्या लोकांना उत्पन्नात यश मिळेल, तसेच त्यांच्या उत्पन्नाचे नवीन स्त्रोत वाढतील. वाहन आणि मालमत्ता खरेदीची शक्यता आहे. दरम्यान, या कालावधीत नात्यात गोडवा येईल आणि नवीन लोकांच्या भेटीगाठी वाढतील.
मिथुन: मीन राशीत गुरू स्थित असल्याने या राशीच्या लोकांना नवीन नोकरीची ऑफर मिळू शकते. मिथुन राशीचे लोक या काळात प्रगती करू शकतात. त्यांना व्यवसायात मोठे सौदे मिळू शकतात. या काळात त्यांना नशिबाची पूर्ण साथ मिळेल. तसेच जुनाट आजारांपासून मुक्ती मिळू शकते.
(येथे देण्यात आलेली माहिती गृहीतके आणि सामान्य माहितीवर आधारित आहे.)