Jupiter Transit 2024 in Taurus: ज्योतिषशास्त्रात गुरू ग्रहाला ज्ञान, विद्या, सुख-समृद्धीचा कारक ग्रह मानले जाते. कुंडलीत गुरू शुभ स्थितीत असल्यास त्या व्यक्तीच्या आयुष्यात कधीही सुख-समृद्धीचा अभाव राहत नाही. सध्या गुरू वृषभ राशीत असून, १ मे रोजी त्याचे या राशीत परिवर्तन झाले होते. गुरू एका राशीत जवळपास १३ महिने असतो. वृषभ राशीनंतर गुरू मिथुन राशीत प्रवेश करणार असून, हे राशी परिवर्तन पुढच्या वर्षी होईल. दरम्यान, हा ३०० दिवसांचा काळ काही राशीच्या व्यक्तींसाठी खूप लाभदायी सिद्ध होईल. गुरूच्या वृषभ राशीतील उपस्थितीमुळे काही राशींना अनेक सकारात्मक परिणाम पाहायला मिळतील.
गुरूचा वृषभ राशीतील प्रवेश अनेकांसाठी लाभप्रद (Jupiter Transit 2024 in Taurus)
वृषभ
गुरू वृषभ राशीमध्येच उपस्थित असून, या राशीच्या व्यक्तींसाठी हा काळ खूप अनुकूल असेल. या काळात तुमची अनेक दिवसांपासून अडकलेली कामे पूर्ण होतील. प्रेमसंबंध अधिक मजबूत होतील, आर्थिक चणचण दूर होईल आणि उत्पन्नाचे नवे मार्ग मोकळे होतील. कुटुंबीयांसोबतचे संबंध अधिक घट्ट होतील. नोकरी करणाऱ्यांना कामात सकारात्मक बदल दिसून येतील. प्रेमसंबंध सुखमय होतील.
कन्या
गुरूच्या वृषभ राशीतील प्रवेशामुळे कन्या राशीच्या व्यक्तींना आयुष्यात अनेक बदल पाहायला मिळतील. नोकरी, व्यवसायात प्रगती होईल. गुंतवणूक करणे फायदेशीर ठरेल. स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्यांनाही यशाचे गोड फळ लाभेल. अविवाहितांसाठी लग्नाचे अनेक प्रस्ताव येतील. नव्या वस्तू खरेदी करू शकाल. विद्यार्थ्यांसाठीदेखील हा उत्तम काळ आहे. या काळात करिअरमध्ये यश मिळेल; तसेच पदोन्नतीही मिळेल.
सिंह
गुरूच्या वृषभ राशीतील प्रवेशाने सिंह राशीच्या व्यक्तींना कामामुळे दूरचे प्रवास करावे लागतील. मित्रांसोबत चांगला वेळ घालवाल. कुटुंबातही आनंदी आनंद असेल. वैवाहिक आयुष्यात आनंदाचे क्षण व्यतीत कराल. या काळात करिअरमध्ये नवीन गोष्टी शिकण्याची संधी मिळेल. वरिष्ठांची मदत मिळेल. कुटुंबीयांचे संबंध चांगले होतील. तीर्थक्षेत्रांना भेट द्याल. नवीन वाहन, प्रॉपर्टी विकत घेऊ शकता.
(टीप : वरील लेख हा प्राप्त माहितीवर आधारित आहे.)