Libra Zodiac Sign Yearly Horoscope 2023: ज्योतिषशास्त्रानुसार तूळ राशीवर शुक्र ग्रहाचे राज्य आहे. शुक्र हा वैभव आणि ऐश्वर्य देणारा ग्रह मानला जातो. ज्या लोकांच्या कुंडलीत शुक्र ग्रह सकारात्मक स्थितीत असतो त्यांना विलासी जीवन जगायला आवडते. १ जानेवारी २०२३ रोजी तूळ राशीच्या गोचर कुंडलीतील ग्रहांची स्थिती पाहिली, तर तुमच्या गोचर कुंडलीच्या लग्न घरामध्ये केतू ग्रह स्थिर असून बुधादित्य राजयोग तृतीय स्थानी तयार होत आहे. चौथ्या स्थानी शनि आणि शुक्राचा संयोग होत आहे तर गुरु सहाव्या स्थानी राहील.
तूळ राशीच्या भाग्यात राहू ग्रह सातव्या स्थानी आणि मंगळ आठव्या स्थानी स्थिर असणार आहे. १७ जानेवारीला शनिदेवाचे गोचर होताच तुम्हाला शनिच्या ढैय्यातून मुक्तता मिळू शकते. २२ एप्रिल रोजी गुरु ग्रह सहाव्या स्थानाहून सातव्या स्थानी मार्गक्रमण करेल. तर ऑक्टोबरमध्ये केतू आणि राहूच्या राशीत बदल होणार आहे. तूळ राशीसाठी २०२३ हे वर्ष कसे असेल याबाबत सविस्तर जाणून घेऊया.
२०२३ मध्ये तूळ राशीसाठी व्यवसाय (Business Of Libra Zodiac In 2023)
नोकरी-व्यवसायाच्या दृष्टीने वर्षाच्या सुरुवातीला तुमची सुरुवात संथ असू शकते. जानेवारीमध्ये कोणतेही नवीन काम सुरू करू नका. मात्र, त्यानंतर तुमची चांगली सुरुवात होऊ शकते. तसेच ज्या लोकांचे वय ३० वर्षांपेक्षा जास्त आहे, त्यांना नोकरी आणि व्यवसायात चांगले यश मिळण्याची शक्यता आहे. दुसरीकडे, जे कपडे, हॉटेल, आयात संबंधित काम करतात त्यांच्यासाठी हे वर्ष चांगले असू शकते.
(हे ही वाचा : Yearly Horoscope 2023 : जानेवारी ते डिसेंबर या १२ महिन्याचं वार्षिक राशीभविष्य; जाणून घ्या, तुमच्या राशीसाठी कसं असणार आगामी वर्ष )
तूळ राशीची आर्थिक स्थिती (Finance Of Libra Zodiac In 2023)
२०२३ या वर्षात १५ मार्चनंतर तूळ राशीतील लोकांना आर्थिक लाभाची स्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे. त्यानंतर तुमची आर्थिक स्थिती मजबूत होऊ शकते. १६ ऑक्टोबर ते १५ नोव्हेंबर या कालावधीत काळजी घ्यावी लागेल या कालावधीत नवीन गुंतवणूक करणं शक्यतो टाळा, अन्यथा नुकसान होण्याची शक्यता आहे. नवीन वाहन आणि मालमत्ता खरेदीसाठी १५ एप्रिलनंतर योग आहे.
२०२३ मध्ये तुळ राशीतील लोकांचे आरोग्य
वैदिक ज्योतिषानुसार १७ जानेवारीला शनिदेव तुमची राशी बदलणार आहेत. ज्यामुळे तुम्हाला शनिच्या ढैय्यातून मुक्ती मिळू शकते. कारण शनिदेवाची दृष्टी तुमच्या कुंडलीच्या सहाव्या स्थानी पडत होती, ज्यामुळे तुमच्या आरोग्यावर वाईट परिणाम होत होते. त्यामुळे शनिदेवाचे गोचर होताच तुमच्याआरोग्यात सुधारणा होण्याची शक्यता आहे. परंतु मंगल देव आठव्या स्थानात भ्रमण करत असल्याने वर्षाच्या सुरुवातीला विशेषत: जानेवारी महिन्यात तुम्हाला आरोग्याची विशेष काळजी घ्यावी लागेल. जुलै आणि ऑक्टोबर महिन्यातही आरोग्याची काळजी घ्यावी लागेल. २२ एप्रिलपर्यंत गुरू सहाव्या स्थानी असल्यामुळे पोटाशी संबंधित समस्या उद्भण्याची शक्यता आहे.
(हे ही वाचा : कन्या राशीसाठी २०२३ हे वर्ष कसे असणार? शनिदेवाच्या कृपेने आर्थिक भरभराटीची संधी, प्रेम साथ देणार का? )
तूळ राशीचे करिअर आणि शिक्षण (Career Of Libra Zodiac In 2023)
वैदिक ज्योतिष शास्त्रानुसार २०२३ हे वर्ष तूळ राशीच्या विद्यार्थ्यांसाठी चांगले ठरू शकते. कारण शनिदेव पाचव्या स्थानी राहणार आणि गुरु एप्रिलमध्ये केंद्रस्थानी येणार आहे. त्यामुळे जे वैद्यकीय, अभियांत्रिकी, हॉटेल मॅनेजमेंट आणि कम्युनिकेशन कोर्स करणाऱ्यांसाठी हा काळ चांगला असू शकतो. परीक्षेत चांगलं यश मिळू शकतं शिवाय नवीन नोकरीची संधी उपलब्ध होण्याची शक्यता आहे. तसंच ज्यांना परदेशात जाऊन काही शिकायचं असेल त्यांची इच्छा पूर्ण होऊ शकते. मात्र, त्यासाठी कष्ट करावे लागणार आहेत.
(हे ही वाचा : मिथुन राशीसाठी २०२३ वर्ष कसे जाणार? शनि साडेसातीतून मुक्ती मिळताच प्रचंड धनलाभाची संधी )
वैवाहिक जीवन आणि नातेसंबंध
वैवाहिक जीवन आणि नातेसंबंधासाठी २०२३ हे वर्ष चांगले ठरू शकते. पण जानेवारी-फेब्रुवारीमध्ये वादविवाद टाळायला हवे, अन्यथा नात्यामध्ये दुरावा येण्याची शक्यता आहे. कारण केतू तुमच्या राशीत असल्यामुळे गैरसमज निर्माण होऊ शकतात. मात्र, मार्चपासून काळ तुमच्यासाठी चांगला असू शकतो. दुसरीकडे, एप्रिलमध्ये, गुरु गोचर सातव्या स्थानी मार्गक्रमण करत आहे. त्यामुळे अविवाहित लोकांना यावेळी लग्नाचा प्रस्ताव येऊ शकतात. प्रेमविवाह होण्याची शक्यताही आहे.
(टीप- वरील लेख हा गृहीतके व प्राप्त माहितीवर आधारित आहे)