Jupiter Vakri 2024: ज्योतिषशास्त्रानुसार गुरू मान सन्मान, धन संपत्ती, राजकीय आणि अपत्य कारक ग्रह मानला जातो. कुंडलीत गुरू ग्रह असणे म्हणजे व्यक्ती नशीबवान, धनवान, आणि ज्ञानी आहे, असे मानतात. देवगुरु एका राशीमध्ये जवळपास एक वर्ष विराजमान राहतात. यावेळी गुरू ग्रहाने वृषभ राशीमध्ये प्रवेश केला आहे. १ मे २०२४ पासून गुरु वृषभ राशीत विराजमान आहेत आणि २०२५ पर्यंत याच राशीत विराजमान राहणार आहेत. तर ९ आॅक्टोबरला देवगुरु सकाळी १० वाजून १ मिनिटांनी वृषभ राशीमध्ये वक्री होणार आहेत आणि त्यानंतर ४ फेब्रुवारी २०२४ ला १ वाजून ४६ मिनिटांनी मार्गी होणार आहेत. गुरुच्या अशा स्थितीमुळे काही राशींना शुभ परिणाम मिळण्याची शक्यता आहे. गुरुच्या गोचरची कोणत्या राशींवर कृपा राहील, जाणून घेऊया.
‘या’ राशींचे नशीब पालटणार?
मिथुन राशी
देवगुरुच्या कृपेने मिथुन राशीच्या लोकांना शुभ परिणाम मिळण्याची शक्यता आहे. या लोकांना कामात यश मिळू शकतो. धनलाभाची संधी मिळू शकते याचबरोबर या लोकांना शुभ वार्ता मिळू शकते. या राशीच्या लोकांना चांगला फायदा दिसून येऊ शकतो. या राशीच्या लोकांना अनेक सकारात्मक बदल दिसून येऊ शकतो. करिअरमध्ये मनाप्रमाणे प्रगती होऊ शकते. कमाईचे नवीन स्त्रोत तयार होऊ शकतात. कामाच्या ठिकाणी नवीन संधी मिळू शकते आणि मान सन्मान वाढू शकतो. वैवाहिक जीवनात सुख-समृद्धी येण्याची शक्यता आहे.
(हे ही वाचा : दिवाळीनंतर शनिदेव बदलणार चाल! नोव्हेंबरपर्यंत हिऱ्यापेक्षाही जास्त चमकणार ‘या’ ५ राशींचे नशीब? मिळू शकतो अपार पैसा )
कर्क राशी
देवगुरुच्या कृपेने या राशींच्या लोकांना प्रत्येक कामात यश मिळण्याची शक्यता आहे. कर्क राशीच्या लोकांचे नशीब उजळू शकते. अडचणी दूर होऊ शकतात. सुख समृद्धी लाभू शकते. पगार वाढ होऊ शकते. या राशीच्या लोकांचा आत्मविश्वास वाढू शकतो. कुटुंबातील सदस्यांबरोबर वेळ घालवू शकाल. या लोकांना वैवाहिक सुख मिळून अनेक लाभदायी परिणाम मिळू शकतात. नोकरीत मोठा बदल होऊ शकतो. तुम्हाला पैसे कमवण्यासाठी अधिक संधी मिळू शकतात. या काळात व्यावसायिकांना चांगला नफा मिळू शकतो.
धनु राशी
देवगुरुच्या कृपेने धनु राशीच्या लोकांना मोठा फायदा मिळू शकतो. जुन्या गुंतवणुकीतून यावेळी फायदा होऊ शकतो. या काळात तुमचं उत्पन्न वाढण्याची शक्यता आहे. शेअर मार्केटमध्ये तुम्हाला आर्थिक लाभही मिळू शकतो. विद्यार्थ्यांना स्पर्धात्मक परीक्षेत यश मिळू शकतो. मोठा धनलाभ होऊ शकतो. व्यावसायिकांना अडकलेले पैसे मिळू शकतात. उत्पन्नाचे नवीन स्रोत निर्माण होऊ शकतात. यावेळी तुमच्या उत्पन्नात मोठी वाढ होऊ शकते. मालमत्ता खरेदी करण्याचा निर्णय घेऊ शकता.
(टीप: वरील लेख प्राप्त माहितीवर आधारीत आहे)