Vakri In Taurus 2024 : वैदिक ज्योतिष शास्त्रानुसार, गुरु हा सात्विक ग्रह मानला जातो. याशिवाय तो ऐश्वर्य, वैभव, अध्यात्म, ज्योतिष, गुरु, समृद्धी, ज्ञान आणि शिक्षणाचे प्रतीक मानला जातो, त्यामुळे जेव्हा गुरुची चाल बदल होते तेव्हा त्याचा थेट परिणाम १२ राशींच्या लोकांच्या जीवनावर होत असतो. ९ ऑक्टोबर रोजी गुरु ग्रह उलट चाल करणार आहे, तर दिवाळीत वक्री होईल; ज्यामुळे तीन राशीच्या लोकांचे नशीब पटलणार आहे. त्यांना आर्थिक लाभ मिळण्यासह करिअर आणि व्यवसायात प्रगती होऊ शकते. तसेच त्यांच्या सर्व मनोकामना पूर्ण होऊ शकतात. पण, या कोणत्या भाग्यशाली राशी आहेत जाणून घेऊ..
गुरुच्या वक्रीमुळे ‘या’ राशी होतील मालामाल
मेष
गुरुची वक्री चाल मेष राशीसाठी फायदेशीर ठरू शकते. या काळात तुमच्या बोलण्यात प्रभाव दिसून येईल, ज्यामुळे लोक प्रभावित होतील. त्याचबरोबर नोकरदार लोकांनाही अधिकाऱ्यांशी चांगल्या संबंधाचा फायदा होताना दिसेल. तुमच्या कामाचे सर्वत्र कौतुक होईल आणि तुम्हाला चांगले आर्थिक लाभही मिळू शकतील. तसेच या काळात तुमची कार्यशैली सुधारू शकते. व्यावसायिकांना कर्जाचे पैसे मिळू शकतात. तुमची आर्थिक स्थिती सुधारू शकते.
कन्या
कन्या राशीच्या लोकांसाठी गुरुची वक्री चाल फलदायी ठरू शकते. या काळात नशीब तुमच्या बाजूने असू शकते. कोणत्याही धार्मिक किंवा शुभ कार्यक्रमात सहभागी होऊ शकता. यावेळी तुमची रखडलेली कामे पूर्ण होऊ शकतात. तुम्ही या काळात दानधर्म कराल. तुमचे वैवाहिक जीवन चांगले राहील आणि पती-पत्नीमध्ये चांगला समन्वय राहील. तसेच यावेळी तुम्ही नोकरी किंवा व्यवसायासाठी प्रवास करू शकता. त्याच वेळी नोकरी करणाऱ्या व्यक्तीला या काळात चांगल्या संधी मिळू शकतात, ज्यामुळे ते त्यांच्या करिअरमध्ये समाधानी दिसतील.
वृषभ
गुरुची वक्री चाल वृषभ राशीसाठी शुभ सिद्ध होऊ शकते. या काळात तुमचा आत्मविश्वास वाढेल. तसेच कुटुंबातील सर्व सदस्यांमध्ये एकता दिसून येईल आणि तुमचे आरोग्यदेखील चांगले राहू शकते. तुम्हाला काम, मान-प्रतिष्ठा मिळेल. तसेच तुम्ही समाजात लोकप्रिय होऊ शकता. या कालावधीत तुम्हाला कोणत्याही सरकारी योजनेचा लाभ मिळू शकतो आणि अडकलेले पैसेही परत मिळू शकतात. तसेच विवाहित लोकांचे वैवाहिक जीवन चांगले राहील. अविवाहित लोकांना लग्नाचे प्रस्ताव येऊ शकतात.
© IE Online Media Services (P) Ltd