Jupiter Transit Vrishabha 2024: गुरू ग्रह ठराविक काळानंतर राशी बदलतो. गुरुच्या राशीतील बदलाचा १२ राशींच्या जीवनावर नक्कीच सकारात्मक किंवा नकारात्मक प्रभाव पडतो. ज्योतिष शास्त्रानुसार, यावेळी गुरु स्वतःच्या मेष राशीमध्ये स्थित आहे. मे महिन्याच्या पहिल्या तारखेला गुरू मेष राशी सोडून वृषभ राशीत प्रवेश करेल. वृषभ राशीत गुरुचे संक्रमण काही राशीच्या लोकांच्या जीवनावर सकारात्मक परिणाम करू शकते. तुमच्या कुटुंबाबरोबर चांगला वेळ घालवण्याबरोबर तुम्हाला पद आणि प्रतिष्ठा मिळेल. गुरू वृषभ राशीत गेल्याने कोणत्या राशींना फायदा होईल ते जाणून घेऊया..
वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार, देवांचा स्वामी बृहस्पति १ मे २०२४ रोजी दुपारी १: ५० वाजता वृषभ राशीत प्रवेश करत आहे. १४ मे २०२५ पर्यंत येथेच राहणार आहे. गुरु ग्रह एका राशीत सुमारे १ वर्ष राहतो. अशा स्थितीत पुन्हा एका राशीत परत येण्यासाठी सुमारे १२ वर्षे लागतात.
वृषभ राशी
या राशीच्या चढत्या घरात गुरू प्रवेश करेल. अशा परिस्थितीत या राशीच्या लोकांच्या जीवनावर अनुकूल प्रभाव पडणार आहे. तुमचा तुमच्या कुटुंबाबरोबर चांगला वेळ जाईल आणि प्रदीर्घ प्रलंबित कामे पूर्ण होतील. आर्थिक स्थिती सुधारेल. याचबरोबर तुमचा अध्यात्माकडे अधिक कल असेल. अशा परिस्थितीत तुम्ही दानधर्मही करू शकता. अकराव्या घरातील स्वामी असल्यामुळे आर्थिक लाभ होण्याची दाट शक्यता आहे. याचसह बचत करण्यातही तुम्ही यशस्वी होऊ शकता. वैवाहिक जीवनात सुरू असलेल्या समस्यांपासून तुम्हाला आराम मिळेल. तुम्ही कुटुंब किंवा मित्रांसह कोणत्याही तीर्थक्षेत्री जाऊ शकता. तुम्हाला तुमच्या मुलांकडूनही काही चांगली बातमी मिळू शकते.
हेही वाचा – मीन राशीत तयार होतोय दुर्मीळ राजयोग, ‘या’ ३ राशींना मिळेल गडगंज पैसा? बुधदेवाच्या कृपेने होऊ शकतील लखपती
मकर राशी
गुरु वृषभ राशीत प्रवेश करेल आणि तुमच्या पाचव्या भावात राहील. अशा स्थितीत या राशीच्या लोकांना शुभ परिणाम मिळू शकतात. उच्च शिक्षण घेण्याचे स्वप्न पूर्ण होऊ शकते. त्याचबरोबर तुमचा धर्म, काम आणि अध्यात्माकडे अधिक कल असेल. तुमची एकाग्रता वाढू शकते. मुलांकडूनही आनंद मिळू शकतो. स्पर्धा परीक्षांची तयारी करणारे लोक यश मिळवू शकतात. देवगुरूंच्या आशीर्वादाने अविवाहितांना विवाहाचे प्रस्ताव येऊ शकतात. यामुळे दाम्पत्याची मूल होण्याची इच्छा पूर्ण होऊ शकते. लव्ह लाईफ सुद्धा चांगली जाणार आहे. तुमचे नाते अधिक घट्ट होईल. नोकरदार लोकांसाठी हे संक्रमण फायदेशीर ठरू शकते. तुमची मेहनत आणि समर्पण लक्षात घेता तुम्हाला एखादी मोठी जबाबदारी किंवा उच्च अधिकाऱ्यांकडून बढती मिळू शकते. याच नवीन नोकरीच्या शोधात असलेले लोकही यश मिळवू शकतात. तुमची निर्णय क्षमता सुधारू शकते.
हेही वाचा – घसा खवखवत असेल तर लिंबू आणि मधाचे सेवन करावे का? या घरगुती उपायाबाबत काय सांगतात डॉक्टर
कुंभ राशी
वृषभ राशीतील गुरुचे गोचर कुंभ राशीच्या लोकांसाठी देखील फायदेशीर ठरू शकते. बृहस्पति हा धनगृहाचा स्वामी आहे. अशा स्थितीत आर्थिक परिस्थिती बऱ्यापैकी मजबूत होऊ शकते. याबरोबर बचत करण्यातही तुम्ही यशस्वी होऊ शकता. चौथ्या भावात गुरूचे संक्रमण असल्यामुळे या राशीच्या लोकांना अचानक आर्थिक लाभही होऊ शकतो. वडिलोपार्जित मालमत्ता मिळवू शकता. अचानक आर्थिक लाभामुळे तुम्हाला आनंद वाटेल. धार्मिक कार्यात तुमची आवड वाढेल. यासोबतच तुम्ही तुमच्या कामात थोडे लक्ष दिले तर तुम्हाला यश मिळू शकते. मात्र आरोग्याबाबत थोडे सावध राहण्याची गरज आहे.