Guru Uday 2025: ज्योतिषशास्त्रानुसार ग्रह एका ठराविक अंतराने उदय होतात आणि मावळतात, ज्याचा परिणाम मानवी जीवनावर दिसून येतो. देवांचा गुरू बृहस्पति जुलै २०२५ मध्ये मिथुन राशीत उदयास येणार आहे. ज्याचा प्रभाव सर्व राशीच्या लोकांवर दिसेल. पण अशा ३ राशी आहेत ज्यांचे नशीब यावेळी चमकू शकते. तसेच, हे लोक पद आणि प्रतिष्ठा प्राप्त करू शकतात. चला जाणून घेऊया कोणत्या आहेत या भाग्यशाली राशी…
मिथुन राशी
गुरूचा उदय तुमच्यासाठी फायदेशीर ठरू शकतो. कारण लग्न भावातून बृहस्पति तुमच्या राशीत उदयास येणार आहे. त्यामुळे या काळात तुमचा आत्मविश्वास वाढू शकतो. तसेच, नोकरी शोधणाऱ्यांचे नवीन वर्षात अधिकारी आणि सहकाऱ्यांशी चांगले संबंध राहतील आणि करिअरच्या प्रगतीच्या सुवर्ण संधीही मिळतील. नवीन वर्षात शुभ योगाच्या प्रभावाखाली तुमचे सामाजिक वर्तुळ वाढेल. विवाहित लोकांचे वैवाहिक जीवन आनंदी राहील. तसेच जोडीदाराला यश मिळू शकते. त्याचबरोबर सिंगल लोक रिलेशनशिप प्रपोज करू शकतात. पार्टनरशीपच्या कामात फायदा मिळू शकतो.
हेही वाचा –२०२५मध्ये लक्ष्मी नारायण योग ठरेल या ५ राशींसाठी वरदान! नवीन वर्षात करणार मौज, होईल महालाभ
सिंह राशी
गुरूचा उदय आपल्या लोकांसाठी अनुकूल असू शकतो. कारण तुमच्या उत्पन्न आणि लाभाच्या घरात गुरुचा उदय होणार आहे. त्यामुळे या काळात तुमच्या उत्पनाच प्रंचड वाढ होऊ शकते. उत्पनाचे एक नवीन स्त्रोत बनू शकतो. त्याच वेळी, नोकरी शोधणाऱ्यांना नवीन वर्षात करिअर क्षेत्रात प्रगती तसेच इतर फायदे मिळू शकतात, ज्यामुळे तुम्ही तुमच्या नोकरीत खूप आनंदी दिसतील. तुम्हाला तुमच्या गुंतवणुकीचा फायदा होत आहे. यावेळी तुम्ही शेअर बाजार, बेटिंग आणि लॉटरीमधून पैसे कमवू शकता.
तूळ राशी
बृहस्पति ग्रहाचा उदय लोकांसाठी शुभ सिद्ध होऊ शकतो. कारण गुरु तुमच्या राशीतून नवव्या भावात उदयास येणार आहे. त्यामुळे या काळात तुम्हाला नशीब मिळू शकते. त्याबरोबर जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रात नशीब तुमची मदत करेल, ज्यामुळे वैयक्तिक आणि व्यावसायिक जीवनात सुरू असलेल्या समस्यांपासून मुक्तता मिळेल. तुम्ही परदेशातही प्रवास करू शकता. तसेच या काळात तुम्ही धार्मिक किंवा मांगलिक कार्यक्रमात सहभागी होऊ शकता. दुसरीकडे, जे स्पर्धात्मक विद्यार्थी आहेत ते कोणत्याही परीक्षेत यशस्वी होऊ शकतात.