Jyotish Vidya Techniques: ज्योतिषशास्त्र किंवा हाताच्या रेषा वाचून भविष्य सांगणे याविषयी अनेकांना भारी कुतुहूल असते. उद्या काय घडणार हे जाणून घेण्यात अनेकजण उत्सुक असतात. अनेक तज्ज्ञांनी वेळोवेळी सांगितल्याप्रमाणे ज्योतिषशास्त्र हे भविष्याहूनही अधिक तुमच्या स्वभावावर भाष्य करते, यामुळे तुम्ही आवश्यक ते बदल करून तुमच्या वागणुकीत सकारात्मकता व कामात वेग आणू शकता, ज्यामुळे साहजिकच तुमचा ‘उद्या’ अधिक यशस्वी होण्यास हातभार लागतो. ज्योतिषशास्त्रात हस्तरेखा वाचण्यासोबतच शरीरावरील खास चिन्ह सुद्धा संकेत देत असतात. याचे सोपे उदाहरण म्हणजे तीळ. आपल्या शरीरावरील व विशेषतः हाताच्या तळव्यावरील तीळ शुभ- अशुभ संकेत देत असतात. कुठल्या तिळाचे काय महत्त्व आहे जाणून घेऊया.. (Samudrik Shastra: पाय बघून ठेवा विश्वास; उंच अंगठा म्हणजे बोलबच्चन, तर चौरस पाय असल्यास..)

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

डाव्या हातावर तीळ

डाव्या तळहातामध्ये तीळ असेल तर ती व्यक्ती खूप खर्चिक असते. यांच्याकडे पैसे टिकत नाहीत. मात्र चांगली बाब अशी की या व्यक्ती आयुष्यात खूप आनंदी असतात. आपल्या आवडी निवडी जपताना त्या खर्चाचा विचार करत नाहीत. यामुळे अमुक गोष्ट आपल्याला करता आली नाही असा खेद त्यांना फार क्वचित होतो.

बोटावरील तीळ

जर हाताच्या पहिल्या बोटावर तीळ असेल तर अशा लोकांना चारचौघात आपली जागा तयार करण्यासाठी थोडा वेळ लागतो. अनेकदा कामाच्या ठिकाणी अशा व्यक्ती विनाकारण दोषी ठरवल्या जातात.

करंगळीवर तीळ

करंगळीवर तीळ असणे खूप शुभ आहे, अशा लोकांना पैशांची कधीच कमतरता नसते. मात्र यातही जर तुम्ही हाताची मूठ आवळून धरली तर हा करंगळीचा तीळ त्यात सामावून जायला हवा. अन्यथा यामुळे फायदा होत नाही असे म्हणतात.

मधल्या बोटावर तीळ

सर्वात मोठ्या म्हणजेच मधल्या बोटावर तीळ असल्यास, या व्यक्ती धन-संपत्तीचे मालक असतात. बोटाच्या टोकाला जर तीळ असेल तर अधिक शुभ मानले जाते. (Samudrik Shastra: झोपण्याची पद्धत सांगते तुमचा स्वभाव; पोटावर झोपणारे बिनधास्त तर पाय दुमडून..)

अंगठ्यावर तीळ असणे

असे लोक प्रामाणिक, खरे आणि मेहनती असतात. या व्यक्ती मनाने अगदी हळव्या असतात पण स्वतःवर तसेच इतरांवर अन्याय झालेले यांना सहन होत नाही.

बोटाखाली तीळ असणे

जर मोठ्या बोटाखाली शनिच्या पर्वतावर तीळ असेल तर त्या व्यक्तीला अपयशाला सामोरे जावे लागते.

चंद्रपर्वतावर तीळ असणे

करंगळीच्या खाली चंद्र पर्वताजवळ तीळ असेल तर त्या व्यक्तीच्या लग्नाला विलंब होतो किंवा त्याला प्रेमात अपयश येते. या व्यक्ती बहुतांश वेळा निराश व नाराज असतात. चंद्राची स्थिती योग्य नसल्याने त्यांच्यात नकारात्मक भावना अधिक असते.

(टीप- सदर लेख प्राप्त माहितीवर आधारित आहे, यातून अंधश्रद्धा पसरवण्याचा हेतू नाही)