आपल्या हिंदू धर्मात प्राण्यांचीही महत्त्व सांगण्यात आले आहे. आपल्याकडे गाय, कुत्रा, बैल, नाग अशा अनेक प्राण्यांची पूजा केली जाते. श्रावण सुरु झाल्यानंतर अनेक सण येतात. नागपंचमी हा श्रावण महिन्यातील एक महत्त्वाचा सण आहे. या दिवशी नागाची पूजा केली जाते. महादेवाच्या मानेतही नागाचे वास्तव्य आहे. त्यामुळेच नागाला आपल्या धर्मात एक विशेष स्थान देण्यात आले आहे. यावर्षी २ ऑगस्ट २०२२ रोजी मंगळवारी नागपंचमी साजरी केली जाणार आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

शास्त्रात असे म्हटले आहे की नागपंचमीच्या दिवशी नागाची पूजा केल्याने नाग देवता आणि शिव या दोघांचा आशीर्वाद मिळतो आणि जीवनातील अनेक संकटे दूर होतात. ज्यांच्या कुंडलीत काल सर्प दोष, अकाली मृत्यूचा योग आहे, अशा लोकांनी नागपंचमीच्या दिवशी नागाची पूजा करावी. याशिवाय ज्या लोकांच्या कुंडलीत काल सर्प दोष आहे, त्यांनी नागपंचमीच्या दिवशी यापासून बचाव करण्याचे उपाय अवश्य करावेत.

Zodiac Compatibility: ‘या’ राशींच्या जोड्या ठरतात सर्वोत्कृष्ट! जाणून घ्या, तुमच्यासाठी कोणत्या राशीचा जोडीदार असेल योग्य

यावर्षी नागपंचमीच्या दिवशी पूजेचा शुभ मुहूर्त मंगळवार, २ ऑगस्ट रोजी सकाळी सहा वाजून पाच मिनिटे ते ८ वाजून ४१ मिनिटांपर्यंत असेल. त्याच वेळी पंचमी तिथी २ ऑगस्ट रोजी पहाटे पाच वाजून १३ मिनिटांपासून सुरू होईल आणि ३ ऑगस्ट रोजी पहाटे पाच वाजून ४१ मिनिटांपर्यंत राहील.

नागपंचमीलाही उपवास ठेवला जातो. काल सर्प दोष निवारणाची पूजा करणाऱ्यांनी चतुर्थीपासूनच उपवास सुरू करावा. यासाठी चतुर्थीच्या दिवशी एक वेळ जेवण करा आणि उर्वरित दिवस उपवास ठेवा. तसेच पंचमीला दिवसभर उपवास करून संध्याकाळी भोजन करावे. नागदेवतेच्या पूजेसाठी नागदेवतेचे चित्र किंवा मूर्ती स्थापित करा. त्यांना हळद, कुंकू आणि तांदूळ घालून टीका लावावा. त्यांना फुले, कच्चे दूध आणि साखर अर्पण करा. यावेळी नाग देवतेची कथा वाचून शेवटी नागदेवतेची आरती करावी.

(येथे देण्यात आलेली माहिती गृहीतके आणि सामान्य माहितीवर आधारित आहे.)

मराठीतील सर्व राशी वृत्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Kalsarp dosha sufferers do this remedy on nag panchmi 2 august 2022 soon there will be relief from trouble pvp
Show comments