Kamada ekadashi Date and Time : कामदा एकादशी हा हिंदू धर्मातील एक महत्त्वाचा दिवस मानला जातो. ही एकादशी चैत्र महिन्याच्या शुक्ल पक्षातील एकादशी तिथीला साजरी केली जाते. या दिवशी उपवास केल्याने व्यक्तीचे सर्व पाप दूर होतात, दु:ख दूर होते,असं म्हणतात. या दिवशी विशेष करून भगवान विष्णूची पूजा केली जाते. जाणून घेऊ या कामदा एकादशी कधी आहे? या एकादशीचे धार्मिक महत्त्व काय? पूजा विधीचा काय आहे?

कामदा एकादशी कधी आहे?

वैदिक पंचांग नुसार, कामदा एकादशी ८ एप्रिल रोजी आहे. चैत्र महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या एकादशी तिथीला म्हणजेच 7 एप्रिलला रात्री ८ वाजल्यापासून कामदा एकादशी सुरू होणार. ही तिथि दुसऱ्या दिवशी ८ एप्रिल रात्री ९ वाजून १२ मिनिटांनी संपणार. सनातन धर्मामध्ये उदय तिथीला अधिक महत्त्व आहे. त्यामुळे कामदा एकादशी ही ८ एप्रिल रोजी आहे.

कामदा एकादशीचे महत्त्व

कामदा एकादशी अत्यंत खास मानली जाते. मान्यतेनुसार, या दिवशी उपवास केल्याने व्यक्तीचे पाप दूर होतात तसेच सर्व इच्छा पूर्ण होतात. जीवनात सुख समृद्धी येते. या दिवशी भगवान विष्णुची पूजा आराधना करणे शुभ मानले जाते. या दिवशी विष्णूच्या काही मंत्राचा जप केल्याने मनाप्रमाणे फळ मिळते. कामदा एकादशीच्या दिवशी दान करणे पुण्याचे कार्य मानले जाते. असं म्हणतात, या दिवशी जर कोणतीही व्यक्ती अगदी मनापासून काही गोष्टी दान करतात, भगवान विष्णू त्यांची सर्व इच्छा पूर्ण करतात.

कामदा एकादशीची पूजा विधी

कामदा एकादशीच्या दिवशी भगवान विष्णूची पूजा केली जाते. या दिवळी सकाळी उठून स्नान करावे. लाकडी पाटावर पिवळा कापड टाकून विष्णूची प्रतिमा स्थापन करावी. त्यानंतर फळ, फूल आणि पंचामृत अर्पित करावे. तुपाचा दिवा लावावा. त्यानंतर फळ, फूल आणि पंचामृत अर्पित करावे. तुपाचा दिवा लावून उपवासाचा संकल्प करावा आणि कथा वाचावी. उपवासानंतर ब्राम्हण किंवा गरीबाला अन्नदान करावे. त्यानंतर दुसऱ्या दिवशी द्वादशी तिथीला उपवास सोडावा.

कामदा एकादशी – पारण विधी

कामदा एकादशीचा उपवास करणारे लोक ९ एप्रिल रोजी उपवासाचे पारण करतील. सकाळी ६ वाजून दोन मिनिटांपासून ८ वाजून ३४ मिनिटांपर्यंत उपवास सोडण्याचा शुभ वेळ आहे उपवास सोडल्यानंतर अन्न किंवा पैसा दान करणे खूप चांगले मानले जाते.