Mesh To Meen Horoscope : ८ एप्रिल २०२५ रोजी चैत्र महिन्याच्या शुक्ल पक्षातील एकादशी तिथी आहे. एकादशी तिथी रात्री ९ वाजून १४ मिनिटांपर्यंत राहील. शूल योग ६ वाजून ९ मिनिटांपर्यंत जुळून येईल. सकाळी आश्लेषा नक्षत्र सकाळी ७ वाजून ५५ मिनिटांपर्यंत राहील, त्यानंतर मघा नक्षत्र दिसेल. तसेच राहू काळ ३ वाजता सुरु होईल ते ४ वाजून ३० मिनिटांपर्यंत असणार आहे. याशिवाय आज कामदा एकादशी सुद्धा असणार आहे. तर आजचा दिवस तुमच्या राशीसाठी कसा जाणार जाणून घेऊया…
८ एप्रिल पंचांग व राशिभविष्य (Aries To Pisces Horoscope In Marathi ) :
मेष राशिभविष्य (Aries Horoscope Today)
अती श्रमाचा थकवा जाणवेल. खोट्याचा आधार घेऊ नका. व्यावसायिक बदलांकडे लक्ष ठेवा. आपल्या अधिकाराचा योग्य वापर कराल. नवीन कामांना गती येईल.
वृषभ राशिभविष्य (Taurus Horoscope Today)
सामाजिक कार्यात मदत नोंदवाल. दिवस घरी गडबडीत जाईल. घरगुती कामासाठी प्रवास कराल. आत्मविश्वासाने निर्णय घ्याल. कष्टाला पर्याय नाही.
मिथुन राशिभविष्य (Gemini Horoscope Today)
गुंतवणुकीसाठी सल्ला घ्यावा. इतरांना मदत करण्यात आनंद मानाल. पत्नीची प्रेमळ साथ लाभेल. क्षणिक सौख्याने खुश व्हाल. सामाजिक कामात सहभाग नोंदवाल.
कर्क राशिभविष्य (Cancer Horoscope Today)
अडचणीतून मार्ग काढता येईल. मानसिक चंचलता जाणवेल. मनात नवीन इच्छा जागृत होईल. वरिष्ठांकडून कौतुक केले जाईल. लेखन कार्य चांगल्या प्रकारे करता येईल.
सिंह राशिभविष्य (Leo Horoscope Today)
कामानिमित्त प्रवास घडेल. सहकार्यांवर तुमचा दबदबा राहील. मान सन्मानास पात्र व्हाल. कलेला भरभरून दाद मिळेल. जोडीदाराची उत्तम साथ मिळेल.
कन्या राशिभविष्य (Virgo Horoscope Today)
क्षुल्लक गोष्टींचा ताण घेऊ नका. आपले मानसिक स्वास्थ्य आपणच जपावे. कामात द्विधावस्था आड आणू नये. जोडीदाराचे मत विचारात घ्या. परोपकाराची जाणीव ठेवावी.
तूळ राशिभविष्य (Libra Horoscope Today)
जुगारातून फायदा संभवतो. लॉटरीचे तिकीट काढाल. नातेवाईकांकडून शुभ वार्ता मिळतील. करमणुकीच्या कार्यक्रमांचे बेत आखाल. जोडीदाराचा वरचष्मा राहील.
वृश्चिक राशिभविष्य (Scorpio Horoscope Today)
घरगुती वातावरण प्रसन्न असेल. पत्नीचा लाडिक हट्ट पुरवाल. कामाचा व्याप वाढता राहील. नवीन व्यावसायिक योजना अमलात आणाव्यात. घरगुती वस्तूंची खरेदी कराल.
धनू राशिभविष्य (Sagittarius Horoscope Today)
ताण मुक्तीसाठी ध्यानधारणा करावी. तुमच्यातील प्रेमळपणा दिसून येईल. जवळचा प्रवास मजेत पार पडेल. मुलांचे भरभरून कौतुक कराल. कामातून उत्तम समाधान लाभेल.
मकर राशिभविष्य (Capricorn Horoscope Today)
धार्मिक गोष्टींकडे ओढ वाढेल. कौटुंबिक विचारास प्राधान्य द्याल. योग्य अंदाज बांधता येईल. सर्व गोष्टी चौकसपणे विचारात घ्याल. जवळच्या ठिकाणी भेट द्याल.
कुंभ राशिभविष्य (Aquarius Horoscope Today)
दिवस आपल्या मर्जीप्रमाणे घालवाल. आपले मत उत्तम रित्या मांडाल. आरोग्यात सुधारणा होईल. धाडसाने नवीन कामे हाती घ्याल. वरिष्ठांकडून कौतुक केले जाईल.
मीन राशिभविष्य (Pisces Horoscope Today)
नवीन गोष्टींमध्ये उत्सुकतेने रस घ्याल. कामात तत्परता दिसून येईल. कौटुंबिक जबाबदारी यशस्वी रित्या पार पडाल. हातून एखादे सत्कार्य घडून येईल. विचारांना योग्य दिशा द्यावी.
ज्योतिषी विद्याधर करंदीकर