Kamika Ekadashi 2023: उत्तर भारतात अगोदरच श्रावणाला सुरुवात झाली आहे. त्यानुसार आज ‘सावन’ महिन्यातील कामिका एकादशीचा योग जुळून आला आहे. ही चातुर्मासातील प्रथम एकादशी मानली जात असल्याने याचे धार्मिक महत्त्व अधिक आहे. असं म्हणतात या काळात भगवान विष्णु क्षीर सागरात विश्रांती घेतात. चातुर्मासात लक्ष्मी नारायणाची पूजा केल्यास पुण्य लाभते असा भक्तांचा विश्वास आहे. यावेळी कामिका एकादशीच्या निमित्त एक विशेष शुभ योग सुद्धा जुळून आला आहे. ज्यामुळे काही राशींना लक्ष्मी नारायणाचा आशीर्वाद लाभण्याची चिन्हे आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

कामिका एकादशी तिथी प्रारंभ: १२ जुलै २०२३ संध्याकाळी ५ वाजून ५९ मिनिटांपासून
कामिका एकादशी तिथी समाप्ती: १३ जुलै २०२३ संध्याकाळी ६ वाजून २४ मिनिटापर्यंत.

आज म्हणजेच १३ जुलै २०२३ला (गुरुवारी) कामिका एकादशीचा शुभ योग जुळून आला आहे. देवगुरु बृहस्पती आणि एकादशी हा योगायोग लक्ष्मी नारायण यांना प्रिय असल्याचे मानले जाते. याशिवाय याच दिवशी बुधादित्य राजयोग शुद्दच जुळून आला आहे तसेच शूल राजयोग १३ तारखेला प्रभावी असणार आहे. वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार बुध ग्रहाचा ११ जुलैला कर्क राशीत उदय झाला आहे. ज्योतिषशास्त्रानुसार बुध ग्रह ज्या राशीत उच्च असतो त्यांना प्रगतीची व धन-वैभव प्राप्तीची संधी असते म्हणून आजपासूनच येत्या काही दिवसात तीन राशींचा भाग्योदयाचा कालावधी कायम असणार आहे. या राशी कोणत्या हे पाहूया …

मिथुन रास (Gemini Daily Horoscope)

बुध उदय झाल्याने मिथुन राशीच्या लोकांच्या आर्थिक अडचणी दूर होऊ शकतात. प्रलंबित कामे मार्गी लागल्याने तुमच्या प्रगतीला वेग येऊशकतो . तुमचे प्लॅन यशस्वी होत असल्याने आत्मविश्वास सुद्धा वाढू शकतो. कामामुळे आत्मविश्वास व आत्मविश्वासामुळे कामात यश असा ताळमेळ उत्तम बसेल शिवाय यामुळे तुम्हाला धनप्राप्तीचे सुद्धा योग आहेत.

कन्या रास (Virgo Daily Horoscope)

कन्या राशीसाठी सुद्धा बुध ग्रहाचा उदय हा लाभदायक सिद्ध होऊ शकतो. कामाच्या ठिकाणी तुमच्या संयमाची परीक्षा होईल. मनःशांतीसाठी काही गोष्टी सोडून देणे फायदेशीर ठरू शकते. नोकरदार मंडळींना कामाच्या स्वरूपात बदल करण्याची महत्त्वाची संधी मिळू शकते.

हे ही वाचा<< ‘या’ राशीचे लोक जोडीदाराला सतत त्रास देण्यात असतात हुशार; तुमचा ‘तो’ किंवा ‘ती’ आहे का यात?

मकर रास (Capricorn Daily Horoscope)

बुध उदय हा मकर राशीच्या लोकंचा धनसंचय वाढवण्यासाठी फायदेशीर ठरू शकतो. वाडवडिलांच्या संपत्तीचा लाभ तुम्हालाही होऊ शकतो. शिवाय वैवाहिक आयुष्यातील काही काळापासून सूर असलेली कडवट स्थिती दूर होऊ शकते. कोर्टाच्या किंवा कायदेशीर कामांमध्ये तुमच्या बाजूने सकारात्मक लाभ मिळू शकतात.

(टीप: वरील लेख हा प्राप्त माहितीवर आधारित आहे)