Virgo Yearly Horoscope In Marathi: कन्या राशीचा स्वामी बुध आहे. बुध हा बुद्धीचा कारक ग्रह आहे. कन्या राशीच्या व्यक्ती उच्च वैचारीक शक्ती असलेल्या, चांगली आकलनशक्ती असलेल्या आणि बुद्धीवादी असतात. त्यांचे परीक्षण व निरीक्षण अतिशय उत्तम असते. लहानात लहान बारकावे त्या बरोबर टिपतात. संशोधक वृत्तीच्या आणि हास्यविनोदात पारंगत असणाऱ्या कन्या राशीच्या व्यक्ती अत्यंत चतुर असतात. त्यांची स्मरणशक्ती वाखाणण्यासारखी असते. काही वेळा कन्या रास खोचक प्रश्नांनी भंडावून सोडते. अशा या कन्या राशीच्या मंडळींना २०२४ हे वर्ष कसे जाईल ते पाहूया.

यंदा एप्रिलअखेर पर्यंत गुरू अष्टम स्थानातील मेष राशीत भ्रमण करेल. तोपर्यंत अनेक अडचणींवर मात करत पुढे जावे लागेल. पैसे, वेळ आणि ऊर्जा अधिक प्रमाणात खर्ची पडेल. १ मे ला गुरू आपल्या भाग्य स्थानातील वृषभ राशीत प्रवेश करेल. अनेक समस्या सुटतील, प्रयत्नांना यश मिळेल. पूर्ण वर्षभर शनी षष्ठ स्थानातील कुंभ राशीतून भ्रमण करेल. स्पर्धात्मक परीक्षांमध्ये यश मिळेल. हितशत्रूंवर मात कराल. पूर्ण वर्ष राहू आणि नेपच्यून आपल्या सप्तम स्थानातील मीन राशीतून भ्रमण करतील. वैवाहिक जीवनात समजगैरसमज निर्माण होण्याची शक्यता आहे. आपल्या राशीतील केतू वर्षभर कन्येतच असेल. तसेच प्लुटो पंचम स्थानातील मकरेतून भ्रमण करेल. मे अखेरीपर्यंत हर्षल अष्टमातील मेष राशीत असेल तर १ जूनला हर्षल भाग्य स्थानातील वृषभ राशीत भ्रमण करेल.

Shani Dev Margi 2024
१५ नोव्हेंबरपासून शनी होणार मार्गी; ‘या’ तीन राशीच्या व्यक्तींना मिळेल प्रत्येक कामात यश
Madhuri Dixit Refused Darr Offer Do You Know The Reason?
Madhuri Dixit : डर चित्रपट माधुरी दीक्षितने का…
Shani Margi 2024 shani gochar 2024 adtrology in marathi
Shani Margi : दिवाळीनंतर शनीदेव ‘या’ राशींच्या लोकांना करणार करोडपती? नोकरी, व्यवसायात मिळू शकतो बक्कळ पैसा अन् यश
Jupiter And Shani Vakri 2024
५०० वर्षांनी दिवाळीला शनि आणि गुरुचा होणार दुर्मिळ संयोग! या राशींचे सुरू होणार चांगले दिवस, करिअमध्ये प्रगतीसह मिळेल पैसाच पैसा
shani dev margi 2024 today horoscope
१५ नोव्हेंबरनंतर शनिदेव ‘या’ राशींवर करणार धन अन् सुखाची बरसात; शनी मार्गी होताच मिळेल बक्कळ पैसा अन् यश
4th November 2024 Rashi Bhavishya
४ नोव्हेंबर पंचांग : पूर्वाषाढा नक्षत्रात वृषभ,कर्कसह ‘या’ ३ राशींचा आनंदित जाईल दिवस; कामात यश ते गोड बातमी मिळणार; वाचा तुमचे राशिभविष्य
Diwali 2024 horoscope three zodiac signs
दिवाळी घेऊन येणार सुखाचे दिवस; ‘या’ तीन राशीच्या व्यक्तींना नोव्हेंबर महिन्यात मिळणार भरपूर पैसा, प्रेम अन् मानसन्मान
Monthly Numerology November 2024 horoscope
Numerology: नोव्हेंबर महिन्यात ‘या’ तारखेला जन्मलेल्या लोकांना मिळणार फायदा, जाणून घ्या मासिक अंक राशी भविष्य

बऱ्याच गोष्टी अचानक घडतील, परदेशासंबंधीत कामकाजाला पुष्टी मिळेल. या महत्त्वाच्या ग्रह बदलांसह इतर ग्रहांच्या भ्रमणाचा विचार आणि अभ्यास करता कन्या राशीला २०२४ हे वर्ष कसे जाईल ते पाहूया…

जानेवारी :

नव्या वर्षात नव्या योजना आखाल. थकवा , कमजोरी, मानसिक तणाव दूर करण्यासाठी लहानमोठा प्रवास कराल. मित्रमंडळींच्या सानिध्यात उत्साह वाढेल. विद्यार्थी वर्गाला गुरुबल कमजोर असल्याने वेळेचे नियोजन करून अधिकाधिक मेहनत घ्यावी लागेल. वर्षाच्या सुरुवातीपासूनच कंबर कसावी, म्हणजे ऐन परीक्षेच्या दिवसात अतिरिक्त ताण येणार नाही. नोकरी व्यवसायात कामे अगदी धीम्या गतीने पुढे सरकतील. इतरांशी बरोबरी अथवा तुलना न करता आपण सचोटीने आपल्या मार्गाने जावे हे उत्तम ! विवाहोत्सुक मंडळींनी धीर धरावा. विवाहितांनी एकमेकांच्या भावनांचा आदर केल्यास प्रश्न लगेच सुटतील. गुंतवणूकदारांना बऱ्यापैकी परतावा मिळेल, आहे त्यात समाधान मानावे.

फेब्रुवारी :

पंचमातील उच्चीचा मंगळ चांगली हिंमत देईल, लढायचे बळ देईल. याचे सातत्य राखणे मात्र केवळ आपल्या हाती असेल. विद्यार्थी वर्गाने शिक्षकांकडून स्वतंत्रपणे मार्गदर्शन घ्यावे. संकल्पना स्पष्ट करून घ्याव्यात, याचा पेपर लिहिताना खूप फायदा होईल. नोकरी व्यवसायात वरिष्ठांच्या मताप्रमाणेच पुढे जावे लागेल. काही वेळा हे आपल्या मनाविरुद्ध असेल. पण सध्या तरी आपला काही इलाज नाही. विवाहित मंडळींनी एकमेकांना पुरेसा वेळ देणे आवश्यक ठरेल. आपले नाजूक नाते वेळेवर सांभाळणे गरजेचे आहे. गुंतवणूकदारांच्या योग्य निर्णयाचा चांगला परतावा मिळेल. अनुभव आणि अभ्यास यातून आपणास खूप काही शिकता येते याचा प्रत्यय येईल. थंडीचा त्रास होऊन हाडे दुखणे, सांधे आखडणे या तक्रारी उदभवतील.

मार्च :

महिन्याचा पूर्वार्ध हा उत्तरार्धापेक्षा चांगला असेल. उत्तरार्धात एका पाठोपाठ एक प्रश्न उदभवतील. सप्तमतील रवी ,राहू, नेपच्यून आपल्या नातेसंबंधात गैरसमज निर्माण करतील. या काळात प्रेमाची खरी कसोटी असेल. विद्यार्थी वर्गाने प्रसार माध्यमाच्या प्रलोभनापासून दूर राहावे. अभ्यासावर पूर्णपणे लक्ष केंद्रित करावे. नोकरी व्यवसायात अत्यंत शिताफीने आणि चातुर्याने आपले मुद्दे मांडावेत. असे केल्यासच वरिष्ठांचे पाठबळ मिळवू शकाल. घर, मालमत्ता यासंदर्भात पुढचे पाऊल पडेल. गुंतवणूकदारांना मोठी झेप घेण्याची संधी मिळेल. येथे मोठी जोखीमही पत्करावी लागेल. पचन संस्था आणि रक्ताभिसरण संस्था यांचे आरोग्य जपावे.

Aries Yearly Horoscope 2024: मेष राशीच्या लोकांचे अच्छे दिन यंदा कोणत्या महिन्यात? धनलाभ ते आरोग्य, कसं असेल वर्ष?

एप्रिल :

पूर्व नियोजन किती महत्वाचे असते याचा अनुभव येईल. लोकांमध्ये आपले कौतुक होईल. लहानमोठ्या गोष्टीतून स्वतः आनंद मिळवाल आणि यात इतरांनाही सामील करून घ्याल. विद्यार्थी वर्गाला ऐन वेळच्या संकटांना तोंड द्यावे लागेल. पण आधीपासूनच त्यासाठी सज्ज राहिलात तर फारसा त्रास होणार नाही. नोकरी व्यवसायातील गोपनीय बाबींचा डोक्यावर ताण वाढेल. योगासने, प्राणायाम या शाश्वत उपायांचा अवलंब करावा. नाते संबंध, प्रेमसंबंध टिकवण्यासाठी आपण पुढाकार घेणे इष्ट ठरेल. आपला अहंभाव बाजूला सारावा. गुंतवणूकदारांसाठी महिन्याचा पूर्वार्ध विशेष लाभदायक ठरेल. हाडे कमजोर झाल्याने धडपड संभवते. हाड मोडणे, दुखणे लांबण्याची शक्यता.

Taurus Yearly Horoscope 2024 : वृषभ राशीच्या लोकांसाठी वर्षातला कोणता महिना असेल सर्वात चांगला? जाणून घ्या, बारा महिन्याचे भविष्य

मे :

१ मेला गुरू भाग्य स्थानातील वृषभ राशीत प्रवेश करेल. उत्तम गुरुबल प्राप्त होईल. अनेक गोष्टी सुरळीत पुढे जाण्यास मदत होईल. विद्यार्थी वर्गाला उच्च शिक्षणासाठी हा गुरू अत्यंत अनुकूल असेल. प्रयत्नांची पराकाष्ठा केल्याचे नक्कीच चीज होईल. नोकरी व्यवसायात आपले पारडे जड होईल. कोर्ट कचेरीच्या कामांना गती मिळेल. आवश्यक कागदपत्रांची जुळवणी करून ठेवावी. विवाहोत्सुक मंडळींनी आपल्या जोडीदाराचे संशोधन सुरू करावे. विवाहितांच्या वैवाहिक जीवनातील समस्या दूर होतील. गुंतवणूकदारांनी दीर्घकालीन शाश्वत योजनांमध्ये पैसे गुंतवावे. आरोग्यदृष्ट्या हा महिना चांगला जाईल अतिरिक्त उष्णतेचा त्रास होऊ नये याची सुरुवाती पासूनच खबरदारी घ्यावी.

मिथुन राशीच्या लोकांसाठी कसे जाईल वर्ष २०२४? विवाहोत्सुक मंडळींसाठी अच्छे दिन कोणत्या महिन्यात येणार?

जून :

१ जूनला मंगळ अष्टमातील मेष राशीत प्रवेश करेल. उष्माघात , फोड पुटकुळ्या यांचा त्रास सतावेल. तसेच पोटाचे विकार बळावतील. १ जूनला हर्षल वृषभ राशीत म्हणजेच आपल्या भाग्य स्थानात प्रवेश करेल. बुध, शुक्र याच्या सहयोगाने महत्वाचे निर्णय आत्मविश्वासाने घ्याल. याचा पुढील काळात खूप चांगला उपयोग होईल. विद्यार्थी वर्गाला उच्च शिक्षणाच्या नव्या वाटा खुल्या होतील. कष्टाचे चीज होईल. नोकरी व्ययसायात बुध, शुक्राच्या साथीने आर्थिक परिस्थिती उंचावेल. बदतीचे वारे वाहतील. नव्या जबाबदाऱ्या पेलाल. विवाहोत्सुक मुलामुलींनी वधुवर संशोधन कार्यात विशेष रस घ्यावा. विवाहित दाम्पत्यांनी एकमेकांच्या साहाय्याने वैयक्तिक उत्कर्ष साधावा. हवेतील प्रदूषणामुळे श्वासनास त्रास होईल.

कर्क राशीसाठी २०२४ वर्ष कसे असेल? आर्थिक स्थिती सुधारेल? जाणून घ्या १२ महिन्यांचे राशीभविष्य

जुलै :

ज्या प्रमाणात मेहनत घ्याल त्या प्रमाणात फळ मिळणार नाही; विलंब होईल, पण यश मिळेल, संयम बाळगावा लागेल. विद्यार्थी वर्गाला नवे विषय, नव्या संकल्पना चटकन आत्मसात होतील. उत्तम मार्गदर्शक मिळतील. अभ्यासातील रुची वाढेल. नोकरी व्यवसायात कामे तर चांगली होतीलच पण कामाव्यतिरिक्त इतर क्षेत्रातही आपले नाव चमकेल. आपल्यातील कलागुणांना वाव मिळेल. तंत्रज्ञानाच्या बळावर मोठी मजल माराल. विवाहोत्सुक मुलामुलींनी जोडीदाराचे शोधकार्य सुरू ठेवावे. यश मिळेल. विवाहित दाम्पत्यांनी वैचारिक देवाणघेवाण केल्याने सूर जुळण्यास मदत होईल. गुंतवणूकदारांच्या अभ्यासपूर्वक गुंतवणूकीत लाभ होईल. अपचन आणि पित्ताचा त्रास बळावेल.

ऑगस्ट :


इतर ग्रहांचे पाठबळ फारसे चांगले नसले तरी गुरुबल उत्तम असल्याने अनेक बाबतीत सरस ठराल. परीक्षण आणि निरीक्षण कामी येईल. विद्यार्थी वर्गाने विषय पूर्ण समजेपर्यंत कास सोडू नये. चिकित्सक वृत्ती इथे उपयोगाची ठरेल. नोकरी व्यवसायात परदेशाशी संबंधीत कामे झटपट मार्गी लागतील. प्रवासयोग चांगला आहे. विवाहोत्सुक मुलामुलींचे विवाह ठरतील. कौटुंबिक वातावरण आनंदी, उत्साही असेल. गुंतवणूक करताना शाश्वत मार्गाने पैसे गुंतवावेत. मित्रांना मदत करताना मानसिक समाधान वाटेल. घर, प्रॉपर्टीच्या संबंधीत व्यक्तींकडून अपेक्षित सहकार्य मिळेल. दमट , कुबट वातावरणात त्वचेला इन्फेक्शन होण्याची शक्यता आहे.

सिंह राशीच्या लोकांसाठी कसे असेल २०२४ हे नवीन वर्ष? धनलाभ की नुकसान; जाणून घ्या, बारा महिन्यांचे भविष्य

सप्टेंबर :

सगळे दिवस सारखे नसतात. ग्रहगतीनुसार प्रयनांना यश मिळणे, न मिळणे अवलंबून असते. आपल्याकडून मेहनतीत सातत्य राखणे मात्र गरजेचे आहे. विद्यार्थी वर्गाला संशोधनात्मक अभ्यासात रस निर्माण होईल. मनाजोगता अभ्यासक्रम शिकण्याची संधी उपलब्ध होईल. परदेशातील कामे मार्गी लागतील. नोकरी व्यवसायात आपल्या कामाची वाखाणणी होईल. हितशत्रूंना याचा त्रास होईल. विवाहोत्सुक मुलामुलींना आपल्या जीवनाचा जोडीदार मिळेल. वैचारिक बंध जुळतील. घराच्या, मालमत्तेच्या संबंधात मोठा खर्च करावा लागेल. डोळे आणि मणका यांच्यावर कामाचा अतिरिक्त ताण येईल.

ऑक्टोबर :

आपण ठरवलेली कामे जशीच्या तशी होतीलच असे नसते. त्यामुळे परिस्थितीनुसार आपल्या आखणीत बदल करावा लागेल. विद्यार्थी वर्गाला शैक्षणिक वर्षाच्या सुरुवातीपासून घेतलेल्या मेहनतीचा उत्तम लाभ होईल. नोकरी व्यवसायात ज्येष्ठ वरिष्ठ मंडळींच्या मार्गदर्शनाखाली महत्त्वाचे निर्णय योग्य प्रकारे घेऊ शकाल. बौद्धिकदृष्टीने प्रगती कराल. विवाहोत्सुक मंडळींनी जोडीदार शोधण्याचे कार्य चालू ठेवावे. लवकरच यश मिळेल. गुंतवणूकदारांचे अंदाज खरे ठरतील. आर्थिक- शेअर बाजारातील चढ- उताराचा मागोवा घ्याल. कौटुंबिक वातावरणातील ताण तणाव कमी करण्याचा प्रयत्न करावा. विचार, निर्णय, कृती या साऱ्यांचा एकत्रित परिणाम आपल्या ऊर्जाशक्तीवर होईल. खूप दमणूक होईल.

नोव्हेंबर :

मित्रमंडळींच्या साथीने उत्साह वाढेल. कामाची उमेद वाढेल. सर्वगुणसंपन्न कोणीच नसते. त्यामुळे आपले अंदाज नेहमीच खरे ठरतील असे नाही. विद्यार्थी वर्गाची वेळेची गणिते आत्ता चुकली तरी सरावाने वेळेचे उत्तम नियोजन कराल. आपल्या यशाचे हे एक महत्वाचे रहस्य असेल. नोकरी व्यवसायात जुन्या ओळखीतून नव्या संधी उपलब्ध होतील. कामकाजाच्या पद्धतीत आवश्यक बदल कराल. नव्याने वरवधू संशोधन करण्यांसाठी ग्रहबल चांगले आहे. प्रॉपर्टी, मालमत्ता यांच्या संबंधीत वाद, चर्चा यातून कोणताच अंतिम निर्णय घेतला जाणार नाही. संमिश्र हवामानाचा आरोग्यावर विपरीत परिणाम होईल.

डिसेंबर

आर्थिकदृष्ट्या कोणताही निर्णय घेताना तज्ज्ञांच्या सल्ल्यानुसार पुढे जावे. जोडीदाराला आपला मानसिक आधार महत्वाचा वाटेल. अशा वेळी वाद, रुसवा विसरून जावे. गुरुबल चांगले असल्याने विद्यार्थी वर्गाचा आत्मविश्वास वाढेल. नेटाने आगेकूच कराल. खर्चावर नियंत्रण ठेऊन योग्य प्रकारे पैसा गुंतवल्यास लाभकारक ठरेल. अन्यथा अनेक वाटांनी पैसे खर्च होतील. नोकरी व्यवसायात आपल्या अनुभवाचे बोल इतरांच्याही उपयोगी पडतील. विवाहोत्सुक मंडळींना अनुकूल ग्रहमान आहे. १३ डिसेंबरला हर्षल वक्र गतीने अष्टमातील मेष राशीत प्रवेश करेल. अनाकलनीय, अनपेक्षित घटना घडतील. ताप, सर्दी, खोकला बळावेल.

एकंदरीत २०२४ हे वर्ष कन्या राशीला चांगले असेल. एप्रिलपर्यंत गुरुबल नसेल पण मे पासून उत्तम गुरुबल असल्याने महत्वाची अनेक कामे पूर्ण होतील. मे नंतरच्या काळात ज्या दाम्पत्याना संतान प्राप्तीची अपेक्षा इच्छाआहे त्यांचे प्रयत्न सफल होतील. कामाचा भार वाढल्याने ताणही वाढेल. आरोग्याच्या दृष्टीने स्वतःकडे दुर्लक्ष होऊ देऊ नका. २०२४ हे वर्ष आपल्यासाठी आनंदी आणि उत्साही असेल.

Story img Loader