Karnataka Election Results BJP Seats: कर्नाटकात काल (१० मे) मतदान प्रक्रिया पार पडली. तिथे ७२ टक्के मतदान झाले असून हे आतापर्यंतचं सर्वाधिक मतदान असल्याचं बोललं जातंय. मतदानानंतर एक्झिट पोलचेही अंदाज समोर आले आहेत. एक्झिट पोलनुसार काँग्रेसच्या बाजूने निकाल जाण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. मात्र, कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी आमचीच (भाजपाची) सत्ता सत्तेवर राहिल असा विश्वास व्यक्त केला आहे. अशातच आता निकालापूर्वी प्रसिद्ध ज्योतिषतज्ज्ञ उल्हास गुप्ते यांनी कर्नाटक निवडणुकांविषयी मोठी भविष्यवाणी केली आहे आहे. यानुसार नेमक्या कोणत्या कारणाने भाजपाला यश लाभण्याची शक्यता आहे पाहूया…
भारतीय जनता पक्षाच्या कुंडलीत कुंभ राशीतील होणारे शनिभ्रमण, मिथुन लग्नाच्या भाग्यस्थानातून सुरू असल्याने, संमिश्र फल देणारे आहे. कारण भाजपाच्या कुंडलीतील तृतीयस्थानात मंगळ-राहू-गुरू-शनी असे तगडे ग्रह असल्याने असे घडणार आहे. भाजपाच्या कुंडलीतील रवीवरून मीनेतील गुरूचे सध्या भ्रमण होत असल्याने, त्यांना ते शुभ आहे. २२ एप्रिलपासून झालेले मेष राशीतील गोचर गुरुभ्रमण राहू व हर्षल यावरून होणार असल्याने, भाजपासाठी ते चांगले आहे. प्लूटो हा मकर राशीत असून, अष्टमातून त्याचे भ्रमण होत असल्याने, अनेक नेत्यांनी स्वतःच्या प्रकृतीची काळजी घेणे क्रमप्राप्त ठरणार आहे. दिनांक १४ एप्रिलपासून रवी हा मेष राशीतून भ्रमण करत असल्याचे , रवीला शुभ व पाप ग्रहांचे साहचर्य मिळणार आहे. भाजपाचे मतदार नसलेले लोकही भाजपाचा विचार करू लागतील.
हे ही वाचा<< शनी-बुध कुणाला अनुकूल? भाजपा की काँग्रेसला? कर्नाटक निवडणुकीआधी प्रसिद्ध ज्योतिषतज्ज्ञांची मोठी भविष्यवाणी
२१ एप्रिलला बुध वक्री झाला असल्याने, त्यांचे विचार आणखी बळकट होऊ लागतील. मेष राशीतील बुधाचे भ्रमण भाजपाला संपूर्ण अनुकूल नाही, कारण भाजपाच्या मूळ कुंडलीतील चंद्राच्या षष्ठात बुध-राहू-हर्षल-गुरू हे ग्रह असल्याने त्यांचे बळ थोडे कमी राहील. दिनांक ६ एप्रिलला गोचर शुक्र वृषभ राशीत आला आहे परिणामी निवडणुकीच्या शेवटच्या टप्प्यात शुक्राचीही अनुकूलता मिळणार असल्याने, कर्नाटक निवडणुकीसाठी भाजपाचे पारडे जड राहणार आहे.
(टीप: वरील लेख हा प्राप्त माहितीवर आधारित आहे)