भारतीय वास्तुशास्त्रामध्ये तुमच्या घरात, ऑफिसमध्ये किंवा आजूबाजूला असलेल्या वस्तूंना विशेष महत्त्व देण्यात आले आहे. वास्तुशास्त्रात अनेक झाडे आणि वनस्पतींना सकारात्मक ऊर्जेचे कारक मानले गेले आहे. त्याचबरोबर वास्तुशास्त्राप्रमाणे फेंगशुई शास्त्रामध्येही जीवनात सुख-समृद्धी टिकवून ठेवण्यासाठी अनेक उपाय सांगण्यात आले आहेत. फेंगशुईच्या अनेक गोष्टी घरात ठेवल्याने जीवनातील नकारात्मक उर्जेपासून मुक्ती मिळते. अशा स्थितीत फेंगशुईचा बांबू म्हणजेच बांबूचं रोप घरात ठेवणे खूप शुभ मानले जाते. चला तर मग जाणून घेऊया घरात बांबूचं रोप कुठे ठेवल्याने सुख-समृद्धी येते.
आणखी वाचा : तुकाराम महाराजांची बायको खरंच खूप कजाग होती का? मुलीचा विचित्र प्रश्न ऐकता किरण माने, म्हणाले…
बांबूचं रोप कुठे ठेवायचे
फेंगशुई शास्त्रानुसार, बांबूचं रोप घरामध्ये अशा ठिकाणी ठेवा जेथे घरातील सर्व लोक एकत्र बसतात. याचा अर्थ तुम्ही कॉमन हॉल किंवा ड्रॉइनिंग रूममध्येही ठेवू शकता. बांबूचं रोपं पूर्व पूर्व दिशेला ठेवावे.
आणखी वाचा : “अचानक कोणी तरी कारची खिडकी ठोठावली अन्…”, बिग बींना ‘या’ बॉलिवूड कलाकाराने दिला सुखद धक्का
सुखी वैवाहिक जीवनासाठी
जर पती-पत्नीमध्ये एखाद्या गोष्टीवरून वाद होत असेल आणि प्रेम संपुष्टात येत असेल, तर बांबूच्या रोपाची देठ लाल रिबन बांधून काचेच्या भांड्यात ठेवा शुभ मानले जाते. पण हे देठ सुकणार नाही याची काळजी घ्या. सर झाडं सुकलं तर ते काढून टाका आणि दुसरं रोप लावा. हे रोप जर नीट असेल तर कुटुंब आनंदी आणि शांत राहते आणि पती-पत्नीमध्ये सामंजस्य वाढते.
आणखी वाचा : राज ठाकरेंबद्दलचं ‘ते’ वाक्य गायब का झालं?; ‘धर्मवीर’मधील सीन शेअर करत अमेय खोपकरांनी सांगितली ‘राज’ की बात
आर्थिक समृद्धीसाठी
जर तुम्हाला जीवनात पैशाची कमतरता भासत असेल तर बांबूचं रोप घरामध्ये पूर्व किंवा दक्षिण दिशेला ठेवणे शुभ असते. असे मानले जाते की यामुळे आर्थिक स्थिती चांगली राहते आणि जीवनात संपत्ती मिळण्याची शक्यता असते.
आणखी वाचा : “मी एक स्त्री आहे पार्सल नाही…”, प्रेग्नेंसी न्यूजवर संतापली आलिया भट्ट
मुलांच्या प्रगतीसाठी
मुलांची एकाग्रता वाढवण्यासाठी आणि अभ्यासात यश मिळवण्यासाठी मुलांच्या खोलीत बांबूची चार छोटी रोपं लावणे फायदेशीर मानले जाते.
आणखी वाचा : राशीनुसार ‘या’ दिवशी शेअर्सची खरेदी आणि विक्री केली तर होईल चांगला नफा
(येथे दिलेली माहिती सामान्य गृहीतके आणि माहितीवर आधारित आहे.)