Ketu Gochar 2025 In Marathi : क्रूर व पापी ग्रह राहु आणि केतु नेहमी उलट चाल चालतात. राहु आणि केतु दिड वर्षांनी गोचर करतात. या वर्षी १८ मे रोजी राहु आणि केतु गोचर करणार आहे. केतु गोचर करून सिंह राशीमध्ये प्रवेश करणार आहे आणि ३ राशींचे नशीब बदलणार आहे.
केतु गोचर करून ग्रहांचे राजा सूर्याची राशी सिंह मध्ये प्रवेश करणार. केतुचा सिंह राशीमध्ये गोचर सर्व बारा राशींच्या लोकांसाठी फायद्याचे ठरू शकते. या सर्व राशींच्या जीवनावर शुभ व अशुभ परिणाम दिसून येईल.

ज्योतिषशास्त्रानुसार १२ राशींमध्ये ३ राशी अशा आहेत, ज्यांना केतु गोचर श्रीमंत बनवू शकतात. या लोकांना अप्रत्यक्षपणे धनलाभ होऊ शकतो. या लोकांची प्रगती होऊ शकते ज्याविषयी त्यांनी कधी कल्पनाही केली नसेल. दीड वर्षापर्यंत या लोकांना फायदा होईल.

वृषभ राशी (Vrishabh Rashi)

वृषभ राशीच्या लोकांसाठी मे २०२५ महिन्यात होणारे केतु गोचर सकारात्मक ठरू शकते. या लोकांना धन संपत्ती, नवीन गाडी मिळू शकते. जीवनात सुख सुविधा मिळू शकतात. करिअरमध्ये मोठे यश मिळू शकते. नात्यामध्ये गोडवा दिसून येईल. या लोकांना पैशाची कमतरता भासणार नाही. या लोकांना प्रत्येक कामात यश मिळेल. कामाच्या ठिकाणी यांची प्रगती होऊ शकते. पगार वाढू शकतो आणि पदोन्नती होऊ शकते. वरिष्ठांचे सहकार्य लाभेन.

तुळ राशी (Tula Rashi)

तुळ राशीच्या लोकांसाठी केतु ग्रहाचे गोचर फायद्याचे ठरू शकते. या लोकांच्या इनकममध्ये सुधारणा दिसून येईल. या लोकांना सरकारी योजनांमध्ये तसेच गुंतवणूकीत लाभ मिळू शकतो. या लोकांना प्रमोशन मिळू शकते. अडकलेले कामे पूर्ण होतील. समाजात मान सन्मान मिळेल. हा काळ तुळ राशीच्या लोकांसाठी अत्यंत फायद्याचा ठरू शकतो. हे लोक मेहनतीच्या जोरावर यश मिळवतील.

कर्क राशी (Kark Rashi)

केतु ग्रहाचे राशी परिवर्तन कर्क राशीच्या लोकांसाठी फायद्याचे ठरू शकते. या लोकांना अपार संपत्ती धन पैसा मिळू शकतो. दिड वर्षांमध्ये या लोकांना सतत आकस्मिक धनलाभ होऊ शकतो. करिअरमध्ये या लोकांना नवी ओळख मिळेल. जीवनात सकारात्मकता दिसून येईल. या लोकांच्या सर्व इच्छा पूर्ण होईल. व्यवसायात या लोकांना लाभ मिळू शकतो. या लोकांना त्यांच्या मेहनतीचे फळ मिळेल. सर्व स्तरातून या लोकांचे कौतुक केले जाईल.

(टीप: वरील लेख प्राप्त माहितीवर आधारीत आहे)