Ketu Graha Transit Rashibhavishya: वैदिक ज्योतिष अभ्यासकांच्या माहितीनुसार केतू ग्रह हा नेहमीच वक्रस्थितीत भ्रमण करतो म्हणजेच केतूने सध्याचे स्थान सोडून दुसऱ्या राशीत गोचर केले तरी त्याचा प्रभाव पूर्व राशीतही कायम असतो. केतू ग्रह सध्या तूळ राशीत गोचर करत आहे तर तब्बल १८ महिन्यांनी कन्या राशीत गोचर करण्यासाठी केतू सज्ज झाला आहे. ज्योतिष शास्त्रानुसार केतू ज्या राशीत प्रभावी असतो त्या राशीच्या स्वामींप्रमाणेच राशीवर प्रभाव टाकत असतो. त्यामुळे आता कन्या राशीत केतूचे गोचर होताच काही राशींचे नशीब बदलण्याची चिन्हे आहेत. ज्योतिष अभ्यासकांच्या अंदाजानुसार तीन अशा राशी आहेत ज्यांना येत्या काळात अपार पैसे व मान-सन्मान लाभण्याची चिन्हे आहेत. या राशी कोणत्या हे जाणून घेऊया…
मायावी केतूचे गोचर, ‘या’ राशींना भाग्योदयाची संधी
वृषभ रास (Taurus Zodiac Horoscope)
केतू ग्रहाचे कन्या राशीत गोचर होणे हे वृषभ राशीसाठी लाभदायक सिद्ध होऊ शकते. गोचर होताच केतू ग्रह तुमच्या राशीच्या कुंडलीत पाचव्या स्थानी भ्रमण करणार आहे. त्यामुळे तुम्हाला अचानक धनलाभ होण्याची शक्यता आहे. मुख्यतः तुम्हाला आरोग्यरूपी धनसंपदा लाभू शकते. मानसिक तणावातून सुटका होऊ शकते. प्रेमाच्या नात्यात काही चढउतार येऊ शकतात पण समजुतीने व संयमाने परिस्थिती स्थिर राहू शकते. कुंडलीत संतती सुखाची चिन्हे आहेत. धनलाभासाठी तुमचे प्रयत्न यशस्वी होऊ शकतात. आर्थिक बळ लाभू शकते.
सिंह रास (Leo Zodiac Horoscope)
केतू ग्रहाचे राशी परिवर्तन सिंह राशीसाठी लाभदायक सिद्ध होऊ शकते. हे गोचर आपली राशीच्या कुंडलीत दुसऱ्या स्थानी प्रभावी असणार आहे. ठिकठिकाणहून अडकलेले धन पुन्हा प्राप्त होऊ शकते. आपल्या अनेक महत्त्वाकांक्षा पूर्ण होऊ शकतात. आपल्या नात्यांमध्ये सकारात्मक बदल दिसून येऊ शकतात ज्यामुळे तुमचे समाजातील स्थान भक्कम होऊ शकते. या कालावधीत तुमच्या वाणीच्या प्रभावाने अनेक नवीन ओळखी होऊ शकतात. कम्युनिकेशन, मार्केटिंग, मीडिया, कला या क्षेत्रातील मंडळींना प्रचंड मोठ्या प्रगतीच्या संधी लाभू शकतात.
हे ही वाचा<< १४० दिवस ‘या’ राशींवर बरसणार पैशांचा पाऊस? शनी महाराज १२ राशींच्या नशिबाला कशी देतील कलाटणी?
धनु रास (Sagittarius Zodiac Horoscope)
केतू ग्रहाचे गोचर धनु राशीसाठी सुद्धा लाभदायक ठरू शकते. केतुचे गोचर आपल्या राशीच्या गोचर कुंडलीत कर्म भावी सक्रिय असणार आहे. आपल्याला कामाच्या ठिकाणी यश प्राप्त होऊ शकते. यासाठी तुम्हाला सर्व स्तरातून मदत होऊ शकते. आपले करिअर उच्च स्थानी पोहोचू शकते. नोकरदार मंडळींना अधिक धनलाभ मिळवून देणारी नोकरीची नवी संधी प्राप्त होऊ शकते. कामाचा विस्तार वाढल्याने ताण वाढू शकतो मात्र तुम्हाला मिळणारा परतावा हा सुखद असू शकतो.
(टीप: वरील लेख हा प्राप्त माहितीवर आधारित आहे)