Ketu Gochar 2024 : ज्योतिषशास्त्रानुसार केतु हा मायावी ग्रह मानला जातो. हा ग्रह नेहमी उलट चाल चालतो आणि प्रत्येक राशीमध्ये १८ महिन्यांपर्यंत राहतो. पंचागनुसार, १० नोव्हेंबरच्या रात्री ११ वाजून ३२ मिनिटांनी केतुने सूर्याचे नक्षत्र उत्तरा फाल्गुनीमध्ये प्रवेश केला आहे.

सूर्य आणि केतु यांच्यामध्ये शत्रुत्वाचे नाते आहे त्यामुळे या दरम्यान काही राशींच्या अडचणी वाढू शकतात पण काही राशींना या गोचर दरम्यान लाभ मिळू शकतो. या राशींच्या लोकांना नोकरीमध्ये यश मिळू शकते. या लोकांची करिअरमध्ये प्रगती होऊ शकते तसेच अचानक या लोकांना धनलाभ मिळू शकतो. जाणून घेऊ या, त्या नशीबवान राशी कोणत्या आहेत.

11th November November Horoscope In Marathi
११ नोव्हेंबर पंचांग: इच्छापूर्ती, मेहनतीला यश ते व्यापारात फायदा; तुमच्या आठवड्याची सुरुवात कशी होणार? वाचा तुमचे राशिभविष्य
16 November Aries To Pisces Horoscope Today in Marathi
१६ नोव्हेंबर पंचांग: कृतिका नक्षत्रात मेषला शुभ दिवस,…
Crime against MNS candidate in Nashik East Constituency
नाशिक पूर्व मतदार संघातील मनसे उमेदवाराविरुध्द गुन्हा, पक्ष सचिवाच्या घरात लूट
Vivah muhurat 2025 Marriage Dates in 2025 Hindu Panchang
Vivah Muhurat 2025 : नवीन वर्ष २०२५ मध्ये विवाहासाठी किती शुभ मुहूर्त, पाहा जानेवारी ते डिसेंबरपर्यंतच्या तारखांची यादी
Numerology number 8
Numerology : ‘या’ तारखेला जन्मलेल्या लोकांवर असते शनीची कृपादृष्टी, मान-सन्मानासह कमावतात प्रचंड संपत्ती; भाग्यापेक्षा असतो कर्मावर विश्वास
life insurance fraud pune marathi news
पुणे: आयुर्विमा पॉलिसीच्या नावाखाली तरुणीची १३ लाखांची फसवणूक
Gold Silver Price Today 10th November 2024 in Marathi
Gold-Silver Price: ग्राहकांसाठी आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; खरेदीपूर्वी जाणून घ्या तुमच्या शहरातील दर
ketu nakshatra parivartan 2024
आजपासून ‘या’ ३ राशींची चांदी; केतूच्या नक्षत्र परिवर्तनाने कमावणार भरपूर पैसा आणि मानसन्मान

वृषभ राशी (Vrishabh Rashi)

वृषभ राशीच्या लोकांसाठी हा गोचर अत्यंत फायद्याचा ठरणार आहे. या दरम्यान हे लोक अतिशय आनंदी दिसून येईल. या लोकांना करिअरमध्ये खूप प्रगती दिसून येईल. तसेच हे लोक कर्जमुक्त होतील. या राशीच्या विद्यार्थ्यांना यश प्राप्त होऊ शकते. घरात धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन केले जाऊ शकते. कुटुंबातील लोकांबरोबर आनंदाचे क्षण जगू शकणार. या लोकांना नोकरीच्या ठिकाणी सहकाऱ्यांची मदत मिळेन. यांचे आरोग्य उत्तम राहीन. कामाशी संबंधित प्रवासाचे योग जुळून येतील. या लोकांसाठी हा प्रवास लाभदायक ठरू शकतो.

हेही वाचा : Viral Video : ही चाल तुरुतुरु…! रस्ता ओलांडणाऱ्या श्वानाच्या पिल्लांना पाहून नेटकरी पडले प्रेमात; म्हणाले, “फक्त अशी साथ…”

सिंह राशी (Singh Rashi)

सिंह राशीच्या लोकांसाठी केतु गोचर अत्यंत शुभ ठरणार आहे. या दरम्यान या लोकांना त्यांच्या कामात यश प्राप्त होईल. हे लोक त्यांचे ध्येय पूर्ण करण्यासाठी मेहनत घेतील. कुटुंबाबरोबर चांगला वेळ घालवण्याची संधी मिळेन. बहीण भावाबरोबर मनातील गोष्टी करू शकणार. नवीन लोक भेटतील ज्यामुळे यांना भविष्यात फायदा होईल. नोकरी करणाऱ्या लोकांना वरिष्ठांचे सहकार्य लाभेन. मंगलकार्यात जाण्याचे योग जुळून येईल.

हेही वाचा : सरपंचाचं लफडं बायकोनं पकडलं; नवऱ्याबरोबर कारमधून फिरणाऱ्या गर्लफ्रेंडची केली अशी अवस्था की…; VIDEO झाला व्हायरल

कुंभ राशी (Kumbh Rashi)

कुंभ राशीच्या लोकांसाठी हा गोचर अत्यंत लाभदायक ठरणार आहे. या दरम्यान या लोकांचे अडकलेले कामे पूर्ण होतील. तसेच आरोग्य सुद्धा उत्तम राहीन. विद्यार्थ्यांना अभ्यासात यश मिळेन. नोकरी किंवा व्यवसाय करणाऱ्या लोकांना फायदा होईल. आपल्या कामाविषयी हे लोक जागरूक असणार. जर या लोकांच्या नात्यात कोणत्याही प्रकारचे वाद विवाद सुरू असतील तर हे लोक संवादाच्या माध्यमातून वाद संपवू शकतात. या दरम्यान या लोकांचे नाते आणखी दृढ होईन.

(टीप: वरील लेख प्राप्त माहितीवर आधारीत आहे)