Ketu Mangal Yuti 2025 : केतू हा पापी अन् छाया ग्रह मानला जातो. ज्योतिषशास्त्रात त्याचा मोठा प्रभाव आहे. केतू एका विशिष्ट कालावधीनंतर म्हणजे सुमारे १८ महिन्यांनंतर राशिबदल करतो. अशा प्रकारे त्याला एक राशिचक्र पूर्ण करण्यासाठी सुमारे १८ वर्षांचा कालावधी लागतो. सध्या केतू कन्या राशीत स्थित आहे; परंतु मे महिन्यात तो राशिबदल करून, सिंह राशीत प्रवेश करेल. त्याच वेळी ग्रहांचा सेनापती मंगळदेखील जूनमध्ये आपली राशी बदलून सिंह राशीत प्रवेश करील. सिंह राशीत या दोन्ही ग्रहांच्या संयोगाने अंगारक योग निर्माण होईल. हा योग सर्वांत विनाशकारी योग असल्याचे म्हटले जाते. या योगाचा १२ राशींवर प्रत्यक्ष-अप्रत्यक्षरीत्या परिणाम झाल्याचे दिसून येईल. मंगळ आणि केतूच्या युतीमुळे कोणत्या राशींवर सर्वांत जास्त परिणाम होईल ते जाणून घेऊ…

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

द्रिक पंचांगानुसार, पापी ग्रह केतू १८ मे २०२५ रोजी दुपारी ४ वाजून ३० मिनिटांनी सिंह राशीत प्रवेश करील. त्याच वेळी ग्रहांचा सेनापती मंगळ ७ जून रोजी पहाटे २ वाजून २८ मिनिटांनी सिंह राशीत प्रवेश करील. अशा प्रकारे दोन्ही ग्रह सिंह राशीत एकत्र येतील, ज्यामुळे अंगारक योग निर्माण होईल. हा योग तीन राशींसाठी फलदायी असणार आहे.

मिथुन राशी

मिथुन राशीच्या लोकांसाठी, केतू-मंगळाची युती फायदेशीर ठरू शकते. तुमचा कल अध्यात्माकडे जास्त असू शकतो. त्यासह समाजात तुमचा आदर, सन्मान वेगाने वाढू शकतो. तुम्ही तुमचे ध्येय साध्य करण्यात यश मिळवू शकता. तुम्ही आत्मपरीक्षण कराल, ज्यामुळे तुम्ही स्वतःबद्दल अनेक नवीन गोष्टी जाणून घेऊ शकाल. तुम्हाला भौतिक सुखे मिळू शकतात.

सिंह राशी

सिंह राशीत मंगळ आणि केतूची युती होत असल्याने याच राशीच्या लोकांना उच्च शिक्षण मिळविण्यात यश मिळू शकते. तुम्ही धार्मिक कार्यक्रमांमध्ये सक्रियपणे सहभागी होऊ शकता. या काळात स्वतःबद्दल तुम्ही बऱ्याच काही गोष्टी जाणून घेऊ शकता. सरकारी नोकरीची तयारी करणाऱ्या लोकांना फायदा मिळू शकतो. तुम्ही धार्मिक कार्यात सहभागी होऊ शकता. जीवनात शांती येऊ शकते. पण, घाईघाईत कोणताही निर्णय घेऊ नका. त्यामुळे भविष्यात अनेक समस्या उद्भवू शकतात.

धनु राशी

धनू राशीच्या लोकांसाठी अंगारक योग खूप शुभ सिद्ध होऊ शकतो. या राशीचे लोक प्रत्येक क्षेत्रात अपार यश मिळवू शकतात. या राशीचे लोक अनेक धार्मिक कार्यांत सहभागी होऊ शकतात. तुम्ही लांब तीर्थयात्रेला जाऊ शकता. त्यासह तुमचे लक्ष साधना, ध्यान व प्राणायाम यांवर अधिक असेल. जीवनात आनंद येऊ शकतो. तुमच्या कामाच्या ठिकाणाहून तुमची बदली होऊ शकते किंवा तुम्हाला दुसऱ्या ठिकाणी नोकरीची ऑफर मिळू शकते. या काळात तुम्हाला कुटुंबातील सदस्यांकडून पूर्ण सहकार्य मिळू शकेल. मुलांच्या बाजूने अधिक परिणाम दिसून येतो.