Ketu Gochar : ज्योतिषशास्त्रामध्ये राहु आणि केतु हा अत्यंत महत्त्वाचा ग्रह मानला जातो. राहु केतुच्या राशी आणि नक्षत्र परिवर्तनामुळे व्यक्तीच्या जीवनावर परिणाम पडतो. पंचागनुसार पापी ग्रह केतु २० ऑक्टोबर २०२३ पासून कन्या राशीमध्ये विराजमान आहे आणि २०२४ मध्ये संपूर्ण वर्ष याच राशीमध्ये राहणार. २०२५ या वर्षी १८ मे रविवारी दुपारी ४ वाजून ३० मिनिटांनी सूर्याची राशी सिंहमध्ये प्रवेश करणार आहे. केतु सिंह राशीमध्ये प्रवेश केल्यानंतर काही राशींच्या जीवनात काही महत्त्वाचे बदल दिसून येईल. खूप काळापासून सुरू असलेल्या अडचणी दूर होतील आणि जीवनात भरपूर यश मिळेल. जाणून घेऊ या केतु राशी परिवर्तनामुळे कोणत्या राशींना याचा फायदा दिसून येणार आहे.

वृषभ राशी

केतु गोचर वृषभ राशीच्या लोकांसाठी फायदेशीर ठरू शकतो. या दरम्यान या लोकांच्या जीवनात अनेक सकारात्मक बदल दिसून येईल. या लोकांची आर्थिक स्थिती सुधारेल. धनसंपत्तीच्या वादापासून सुटका मिळेल. सुख संपत्तीमध्ये वृद्धी होईल. अध्यात्मिक योग निर्माण होणार. कौटुंबिक जीवनात आनंद दिसून येईल. नोकरी व्यवसायाच्या दृष्टीकोनातून यश मिळेल. धन लाभाच्या नवीन संधी मिळतील. विदेश यात्रेचा योग जुळून येईल.

हेही वाचा : Shani Chandra Grahan: तब्बल १८ वर्षानंतर भारतासह ‘या’ देशांमध्ये दिसणार शनी चंद्रग्रहण; आजच आहे योग, जाणून घ्या

सिंह राशी

केतु ग्रहाच्या शुभ प्रभाव सिंह राशीच्या लोकांना दिसून येईल. या दरम्यान या लोकांचे सर्व स्वप्ने पूर्ण होतील. ऊर्जा आणि आत्मविश्वासामध्ये वृद्धी होईल. मेहनतीचे फळ मिळेल. समाजात या लोकांची प्रशंसा केली जाईल. महत्त्वाच्या कामात यश मिळू शकते. जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रात प्रगती होईल. कामाच्या ठिकाणी मनाप्रमाणे गोष्टी घडतील. या लोकांच्या व्यक्तिमत्त्वाचा प्रभाव दिसून येईल. निर्णय घेण्याची क्षमता आणखी वाढेल. व्यावसायिक जीवनात तुमच्या नेतृत्व गुणामुळे नवीन ओळख मिळेल.

कुंभ राशी

केतुच्या राशी परिवर्तनामुळे कुंभ राशीमध्ये अनेक महत्त्वाचे बदल दिसून येईल. शत्रू अपयशी ठरतील. जमीन किंवा वाहन खरेदी करण्याचा योग जुळून येईल.जीवनात सुख समृद्धी आणि आनंद दिसून येईल. या लोकांना गृह क्लेशपासून मुक्ती मिळेल. नोकरीच्या ठिकाणी या राशीच्या लोकांची पदोन्नती होऊ शकते. यांना पैसा कमावण्याचे नवीन स्त्रोत मिळू शकतात. या काळात यांची आर्थिक वृद्धी होईल आणि कायदेशीर कामातून सुटका मिळेल. यांचा मानसिक तणाव दूर होईल. या दरम्यान या लोकांना जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रात यश मिळेल.

(टीप: वरील लेख प्राप्त माहितीवर आधारीत आहे)