Vivah Muhurat 2024 Hindu Panchang : नवीन वर्ष २०२४ सुरू व्हायला अवघे काही आठवडे शिल्लक आहेत. यात विवाह आणि इतर शुभ कार्यांसाठी फक्त १५ डिसेंबरपर्यंतचे शुभ मुहूर्त आहेत. यानंतर महिनाभर कोणतेही शुभ कार्य होणार नाही. कारण १६ डिसेंबर २०२४ पासून खरमास सुरू होत आहे जो १५ जानेवारी २०२४ ला समाप्त होईल. शास्त्रानुसार, खरमासात विवाह, पवित्र कार्य, नामकरण, मुंडन, घर प्रवेश, भूमीपूजन यांसारखी शुभ कार्य करत नाहीत. सूर्य धनु राशी सोडून मकर राशीत प्रवेश करतो, त्या दिवशी खरमास संपतो. खरमासाचा कालावधी एक महिन्याचा असेल, कारण सूर्य प्रत्येक राशीत एक महिना राहतो. जेव्हा सूर्य मकर राशीत असतो तेव्हा त्याला मकर संक्रांत म्हणतात. धार्मिक मान्यतेनुसार, मकर संक्रांतीच्या दिवसापासून खरमास संपणार असून नवीन वर्षात शुभ विवाहाचे शुभ मुहूर्त सुरू होणार आहेत.
हिंदू धर्मात विवाहासाठी शुभ मुहूर्त महत्वाचा असतो. नव वधू-वराची कुंडली पाहून लग्नाचा शुभ मुहूर्त काढला जातो. जर मुहूर्त न पाहता लग्न केले तर भविष्यात अडचणी येतात, अशी समज आहे. जे लोक नवीन वर्षात लग्न करण्याचा विचार करत आहेत, अशा लोकांनी नवीन शुभ मुहूर्ताबाबत जाणून घ्या.
नवीन वर्षात यंदा लग्नाचे खूप मुहूर्त आहेत. यावर्षी तब्बल सात महिने सनई चौघडे वाजणार आहेत. म्हणजेच २०२४ मध्ये मे, जून, ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर हे पाच महिने वगळता इतर सात महिन्यांत लग्नाचे मुहूर्त असणार आहेत.
१५ डिसेंबरपर्यंत लग्न होणार आहेत. यानंतर पुढील वर्षात २०२४ मध्ये सात महिन्यांत ५८ दिवस लग्नाचे मुहूर्त आहेत. मिथिला आणि बनारस पंचांगानुसार, जानेवारीमध्ये ९ दिवस, फेब्रुवारीमध्ये ११ दिवस, मार्चमध्ये १० दिवस, एप्रिलमध्ये ५ दिवस, जुलैमध्ये ६ दिवस, नोव्हेंबरमध्ये ११ दिवस आणि डिसेंबरमध्ये ६ दिवस हे लग्नासाठी शुभ मुहूर्त आहेत.
नववर्ष २०२४ मधील शुभ विवाह मुहूर्त
जानेवारी २०२४ शुभ विवाह मुहूर्त
जानेवारी – १६, १७, २०, २१, २२, २७, २८, ३०, ३१
फेब्रुवारी २०२४ शुभ विवाह मुहूर्त
फेब्रुवारी- ४, ६, ७, ८, १२, १३, १७, २४, २५, २६, २९
मार्च २०२४ शुभ विवाह मुहूर्त
मार्च – १, २, ३, ४, ५, ६, ७, १०, ११, १२
एप्रिल २०२४ शुभ विवाह मुहूर्त
एप्रिल – १८, १९, २०, २१, २२
जुलै २०२४ शुभ विवाह मुहूर्त
जुलै- ९, ११, १३, १४, १२, १५
नोव्हेंबर २०२४ शुभ विवाह मुहूर्त
नोव्हेंबर – १२, १३, १६, १७, १८, २२, २३, २५, २६, २८, २९
डिसेंबर २०२४ शुभ विवाह मुहूर्त
डिसेंबर – ४, ५, ९, १०, १४, १५
(वरील बातमी माहिती आणि गृहितके यांवर आधारित आहे.)