16th October Rashi Bhavishya & Panchang : आज १६ ऑक्टोबर २०२४ रोजी अश्विन महिन्याच्या शुक्ल पक्षाची चतुर्दशी तिथी आहे. चतुर्दशी तिथी रात्री ८ वाजून ४१ मिनिटांपर्यंत राहील. बुधवारी ध्रुव योग सकाळी १० वाजून ०९ मिनिटांपर्यंत जागृत असेल. तसेच उत्तरा भाद्रपद नक्षत्र संध्याकाळी ७ वाजून १८ मिनिटांपर्यंत राहील. आज राहू काळ १२ वाजल्यापासून सुरु होईल ते १ वाजून ३० मिनिटांपर्यंत असेल. तर याशिवाय आज शरद पौर्णिमा म्हणजेच कोजागिरी पौर्णिमा आहे. शारद पौर्णिमेचे विशेष महत्त्व शास्त्रात सांगण्यात आले आहे. कारण या दिवशी चंद्र त्याच्या १६ चरणांमध्ये राहतो. तर आज १२ राशींचा दिवस कसा जाईल हे आपण जाणून घेऊ या…

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

१६ ऑक्टोबर पंचांग व राशिभविष्य :

मेष:- प्रयत्नांची कास सोडू नये. मिळकत व खर्च यांचे संतुलन ठेवावे. आपली स्वप्ने पूर्णत्वास जातील. रोजगाराच्या क्षेत्रात यश मिळेल. मिळालेल्या वेळेचा सदुपयोग करावा.

वृषभ:- लहान प्रवास संभवतात. जमिनीच्या कामातून लाभ होईल. मनातील नकारात्मक विचार काढून टाका. कष्टाशिवाय काही हाती लागणार नाही. यात्रा सुखकर होईल.

मिथुन:- प्रलंबित कामे मार्गी लागतील. शेजार्‍यांचे सहकार्य मिळेल. दिवस उत्तम फलदायी असेल. आर्थिक बाबतीचे प्रयत्न यश देतील. तज्ज्ञ व्यक्तींची भेट होईल.

कर्क:- आहारावर नियंत्रण ठेवावे. मुलांकडून चांगल्या बातम्या मिळतील. वरिष्ठांना नाराज करू नका. अनोळखी व्यक्तीवर विश्वास ठेऊ नका. वाणीत माधुर्य जपावे.

सिंह:- कामातील समस्या दूर कराव्या लागतील. प्रवासात काळजी घ्यावी. हातापायांना इजा संभवते. वैचारिक स्थिरता ठेवावी. आपले छंद जोपासावेत.

कन्या:- विरोधकांच्या करवायला कमी होतील. कुटुंबातील सदस्यांचे सहकार्य लाभेल. व्यवसायात मान वाढेल. मनाप्रमाणे गोष्टी घडतील. संपर्कातील लोकांशी जवळीक वाढेल.

तूळ:- धनलाभाचे योग संभवतात. नवीन काम सुरू करू शकता. धार्मिक ग्रंथांचे वाचन कराल. एखादी मौल्यवान वस्तु मिळेल. विरोधक पराभूत होतील.

वृश्चिक:- व्यावसायिक योजनांना बळ मिळेल. कामाच्या ठिकाणी वातावरण अनुकूल असेल. कामाचा ताण जाणवेल. उगाच चिडचिड करू नये. जोखमीचे पाऊल उचलताना सारासार विचार करावा.

धनू:- स्पर्धेत यश मिळेल. भावंडांचे सहकार्य मोलाचे ठरेल. आध्यात्मिक आवड वाढीस लागेल. हातातल्या कामाचा कंटाळा करू नका. मौल्यवान वस्तूंचे जतन करा.

मकर:- आर्थिक व्यवहारात सावधानता बाळगा. समस्यांचे निराकरण होईल. वैवाहिक जीवन सुखमय होईल. आरोग्याची काळजी घ्यावी. कोणावरही अति विश्वास दाखवू नका.

कुंभ:- मुलांच्या जबाबदार्‍या पार पाडाल. पैशाच्या बाबतीतले प्रयत्न यश देतील. थोडीशी धावपळ करावी लागेल. देवावरील श्रद्धा वाढेल. जोडीदाराच्या मदतीने अडकलेल्या गोष्टी पुढे सरकतील.

मीन:- गृहोपयोगी वस्तूंची खरेदी कराल. बोलताना शब्द जपून वापरा. मानसिक शांतता लाभेल. प्रवास लाभदायक ठरतील. मिळकतीचे नवीन स्त्रोत सापडतील.

ज्योतिषी विद्याधर करंदीकर

मराठीतील सर्व राशी वृत्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Kojagiri purnima vishesh rashi bhavishya on 16th october bless you with lots off money read horoscope in marathi asp
Show comments