Sharad Purnima 2024 Date And Time : शारद पौर्णिमेचे विशेष महत्त्व शास्त्रात सांगण्यात आले आहे. कारण या दिवशी चंद्र त्याच्या १६ चरणांमध्ये राहतो. वैदिक दिनदर्शिकेनुसार दरवर्षी आश्विन महिन्यातील शुक्ल पक्षातील चतुर्दशीला शरद पौर्णिमेचा उपवास केला जातो. या दिवशी माता लक्ष्मी आणि भगवान विष्णूची पूजा केली जाते. यंदा शरद पौर्णिमा १६ ऑक्टोबरला साजरी होणार आहे.१६ ऑक्टोबर रोजी शरद पौर्णिमा म्हणजेच कोजागिरी पोर्णिमा हा सण साजरी केली जाणार आहे. या दिवशी रवि योगही तयार होत असल्याने या दिवसाचे महत्त्व अधिकच वाढले आहे. पूजेची तारीख आणि शुभ वेळ जाणून घेऊया…

शरद पौर्णिमेच्या दिवशी चंद्राच्या किरणांतून अमृतवृष्टी होते, असे मानले जाते. त्यामुळे या दिवशी चंद्रप्रकाशात मसाला दुध तयार करण्याची पंरपरा आहे. “या वर्षी शरद पौर्णिमा ४ राशींसाठी अतिशय शुभ आहे.

शरद पौर्णिमा 2024 तिथी आणि शुभ मुहूर्त (Sharad Purnima 2024 Tithi and Auspicious Time)

ज्योतिषीय दिनदर्शिकेनुसार, अश्विन महिन्याची पौर्णिमा १६ ऑक्टोबर रोजी रात्री ०८:४१ वाजता सुरू होईल. तसेच, ती दुसऱ्या दिवशी म्हणजेच १७ ऑक्टोबर रोजी दुपारी ०४:५३ वाजता संपेल. अशा परिस्थितीत १६ ऑक्टोबर रोजी शरद पौर्णिमा हा सण साजरा केला जाणार आहे. या दिवशी संध्याकाळी ०५:०४ वाजता चंद्रोदय होईल.

हेही वाचा – Weekly Horoscope : मेष ते मीन राशीच्या लोकांसाठी कसा जाईल हा आठवडा? जाणून घ्या साप्ताहिक राशीभविष्य

मेष – कुठेतरी अडकलेला पैसा परत मिळू शकेल. जुन्या गुंतवणुकेतून तुम्हाला फायदा होऊ शकतो. कामाच्या ठिकाणी तुमच्या कामाची प्रशंसा होईल. नवीन काम सुरू करण्यासाठीही वेळ उत्तम आहे. कुटुंबात आनंदाचे वातावरण राहील. मुलाच्या प्रगतीने मन प्रसन्न राहील.

सिंह – व्यवसायात तुम्हाला मोठा फायदा होऊ शकतो. कुटुंब आणि समाजात तुमचा मान-सन्मान वाढेल.

तूळ – तुम्हाला तुमच्या आवडीचे काम मिळू शकते. रखडलेली कामे लवकर पूर्ण होतील. देवी लक्ष्मीच्या आशीर्वादामुळे तुम्हाला संपत्ती मिळेल.
ऑफिसमध्ये तुम्हाला मोठी जबाबदारी मिळू शकते. तुमच्यावर काही कर्ज असेल तर तेही फेडता येईल.

कुंभ – नवीन वाहन किंवा मालमत्ता खरेदी करण्याची शक्यता आहे. बँक बॅलन्स वाढतच राहील. मित्र आणि नातेवाईकांकडून काही चांगली बातमी मिळू शकते.

हेही वाचा – कोजागिरी पोर्णिमेनंतर सुर्य देव बदलणार आपली चाल, ‘या’ राशीच्या लोकांना मिळणार अपार पैसा आणि पद-प्रतिष्ठा

रवियोग होत आहे

शरद पौर्णिमेच्या दिवशी रवि यो तयार होत आहे. हा योग सकाळी०६:२३ ते रात्री ०७:१८ पर्यंत राहील. हा योग ज्योतिषशास्त्रात अतिशय शुभ मानला जातो.