Shree Krishna Janmashtami 2023 Date, Time, Puja Vidhi : कृष्ण जन्माष्टमी हा सण भगवाण कृष्णाचा जन्मदिवस म्हणून साजरा केला जातो. त्याला कृष्णाष्टमी किंवा गोकुळाष्टमी या नावांनीही ओळखले जाते. भगवान कृष्णाच्या भक्तांसाठी जन्माष्टमीचा सण खूप महत्त्वपूर्ण असतो. हा सण कृष्ण पक्षाच्या अष्टमी दिवशी साजरा केला जातो. जन्माष्टमीचा सण देशातच नव्हे, तर संपूर्ण जगभरात उत्साहाने साजरा केला जातो.

हिंदू पौराणिक कथेनुसार या दिवशी शासक कृष्णाचा जन्म रोहिणी नक्षत्रात झाला होता. या वर्षी रोहिणी नक्षत्र आणि अष्टमी तिथी जन्माष्टमीच्या रात्री येत आहेत. त्यामुळे कृष्ण जन्माष्टमी ६ की ७ सप्टेंबरला साजरी होणार याबाबत भाविकांना शंका आहे. चला जाणून घेऊ या यंदा कृष्णजन्माष्टमीचा सण केव्हा साजरा होणार?

akshay kumar share update on phir hera pheri 3
‘हेरा फेरी ३’ची प्रतीक्षा संपली, अक्षय कुमारने दिली महत्त्वाची माहिती; म्हणाला, “पुढील वर्षी…”
Eknath Shinde on Ladki Bahin Yojana Sixth installment
महायुतीला सत्ता मिळाली, लाडक्या बहिणींना २१०० रुपये कधीपासून…
manoj jarange patil health update
“मी थोड्याच दिवसांचा पाहुणा, हे शरीर कधी जाईल…”, मनोज जरांगे पाटलांचं भावनिक विधान!
shani rash parivartan 2025 shani guru transit change luck of these zodiac
Shani Rashi Parivartan 2025: नववर्षात शनि-गुरु बदलणार चाल, ‘या’ राशीच्या लोकांच्या नशिबाचे दार उघडणार, नोकरीसह मिळणार पैसाच पैसा
Guru Nakshatra Gochar 2024
२८ नोव्हेंबरला गुरु बदलणार आपली चाल! ‘या’ राशीच्या लोकांच्या आयुष्यात येणार आनंद, मिळेल अपार धन
shani gochar 2025 | horoscope | astrology
नववर्ष २०२५ मध्ये ‘या’ तीन राशींचे फळफळणार नशीब; शनीच्या मीन राशीतील प्रवेशाने मिळणार बक्कळ पैसा अन् नोकरीत यश
ग्रहांचा राजा सूर्य करणार शनीच्या नक्षत्रामध्ये प्रवेश
१९ नोव्हेंबरला होऊ शकतो या राशींचा भाग्योदय! ग्रहांचा राजा सूर्य करणार शनीच्या नक्षत्रामध्ये प्रवेश, प्रत्येक कामात मिळणार यश

या दिवशी साजरी होणार कृष्ण जन्माष्टमी २०२३

कृष्ण जन्माष्टमीदिवशी लोक उपवास करतात आणि रात्री १२ वाजता भगवान कृष्णच्या जन्मानंतर प्रसाद खाऊन उपवास सोडतात. यंदा भाद्रपद महिन्याच्या कृष्ण पक्षाची अष्टमी तिथी ६ सप्टेंबर रोजी दुपारी ३ वाजून ३७ मिनिटांनी सुरू होणार आहे; जी ७ सप्टेंबर रोजी सायंकाळी ४ वाजून १४ मिनिटांनी समाप्त होईल.

शास्त्रानुसार श्रीकृष्ण जन्म रात्री १२ वाजता रोहिणी नक्षत्रामध्ये झाला होता. त्यानुसार गृहस्थ जीवन जगणारे भक्त ६ सप्टेंबर रोजी श्रीकृष्णाची जयंती साजरी करतील. मथुरेतही जन्माष्टमी ६ सप्टेंबरलाच साजरी केली जाणार आहे. या दिवशी रोहिणी नक्षत्राचा संयोगही असतो. दुसरीकडे वैष्णव पंथात श्रीकृष्णाच्या पूजेसाठी वेगळा कायदा आहे. त्यामुळे वैष्णव पंथात ७ सप्टेंबर रोजी जन्माष्टमीचा सण साजरा केला जाणार आहे.

हेही वाचा – कृष्ण जन्माष्टमीपासून गणेश चतुर्थीपर्यंत; येथे पाहा सप्टेंबरमधील महत्त्वाच्या सण-उत्सवांची संपूर्ण यादी

कृष्ण जन्माष्टमी २०२३ : पूजेचा मुहूर्त

श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या पूजेची वेळ रात्री ११.५७ वाजता सुरू होते. रात्री १२.४२ पर्यंत कृष्ण जयंती व पूजन होईल.

श्रीकृष्ण जन्माष्टमी २०२३ मध्ये दोन अत्यंत शुभ योगांवर येत आहे. या वर्षी कृष्ण जन्माष्टमीला रवी योग आणि सर्वार्थ सिद्धी योग तयार होत आहेत. सर्वार्थ सिद्धी योग; जो जन्माष्टमीला संपूर्ण दिवस राहणार आहे. हा एक आशादायक दिवस आहे; ज्या दिवशी प्रत्येक कृष्णप्रेमी श्रीकृष्णाच्या भक्तिरसाने तृप्त होतो.

असे मानले जाते की, या योगामध्ये केलेले सर्व कार्ये भक्तांना भरपूर आशीर्वाद देऊन जातात. रवी योग सकाळी ०६.०१ वाजता सुरू होईल आणि दुसर्‍या दिवशी दिवसाच्या सुरुवातीस ०९.२० पर्यंत राहील.

कृष्ण जन्माष्टमी २०२३: उपवासाची वेळ

जन्माष्टमीचा उपवास सहसा श्रीकृष्णाच्या जन्मानंतर केला जातो. भाविकांना सकाळी १२.४२ नंतर जन्माष्टमी सोहळ्यानंतर उपवास सोडता येईल. जर सूर्योदयानंतरच्या दिवशी जन्माष्टमी पाळली गेली, तर भक्त ७ सप्टेंबर रोजी सकाळी ६.०२ वाजता उत्सव सुरू करू शकतात.

जन्माष्टमीनंतर दुसऱ्या दिवशी सकाळी दहीहंडी साजरी केली जाते. यंदाचा दहीहंडी सोहळा गुरुवार,७ सप्टेंबर रोजी होणार आहे.

हेही वाचा – दैनिक राशीभविष्य १ सप्टेंबर २०२३: महिन्याचा पहिलाच दिवस ‘या’ राशींसाठी ठरणार लाभदायक

कृष्ण जन्माष्टमी २०२३ : व्रत आणि पूजा पद्धत

जन्माष्टमीच्या व्रताची सुरुवात अष्टमीच्या उपवासाने सुरू होते. या दिवशी श्रीकृष्णाच्या बालस्वरूपाची पूजा केली जाते. रात्री १२.४३ नंतर जन्मोत्सवानंतर व्रत पूर्ण होते. या व्रताच्या एक दिवस आधी म्हणजेच सप्तमीच्या दिवशी हलके व सात्त्विक भोजन करावे. व्रताच्या दिवशी सकाळी स्नान करून सर्व देवतांना नमस्कार करून भक्तांनी पूर्व किंवा उत्तर दिशेला तोंड करून बसावे.

हातात पाणी, फळे व फुले घेऊन उपवासाचे व्रत करावे आणि दुपारी काळ्या तिळाचे पाणी शिंपडून माता देवकीसाठी प्रसूतिगृह बनवू शकता. आता या प्रसूतिगृहात एका सुंदर पलंगाची व्यवस्था करून, त्यावर शुभ कलश ठेवा.

या दिवशी भगवान श्रीकृष्णासोबत माता देवकीच्या मूर्तीचीही प्रतिष्ठापना करावी. देवकी, वासुदेव, बलदेव, नंद, यशोदा व लक्ष्मी यांची नावे घेऊन त्यांची यथायोग्य पूजा करावी. हे व्रत रात्री १२ वाजल्यानंतरच सोडले जाते. या व्रतामध्ये धान्य वापरले जात नाही. फलाहारसह तुम्ही मावा बर्फी आणि शिंगाड्याच्या पिठाचा शिरा खाऊ शकता.

हेही वाचा – दहीहंडी, गणेशोत्सवचा महिना, १२ राशींपैकी कोणासाठी ठरेल गोड? ३० सप्टेंबरपर्यंतचं तुमच्या राशीचे भविष्य वाचा

कृष्ण जन्माष्टमी २०२३ : महत्त्व

हिंदू पौराणिक कथांमध्ये कृष्ण जन्माष्टमीला विशेष महत्त्व आहे. या दिवशी भगवान कृष्णाच्या जन्माचे स्मरण केले जाते; ज्याला दैवी आनंद आणि प्रेमाचा अवतार मानले जाते. हा उत्सव जगासाठी कृष्णाच्या जन्मदिवसाचा केवळ उत्सव नाही; तर त्याची शिकवण आणि त्याने दर्शविलेल्या गुणांचे प्रतीक आहे. महाकाव्य महाभारत आणि विविध ग्रंथांमध्ये चित्रित केल्याप्रमाणे भगवान कृष्णाचे जीवन आणि कथा अनेकांना प्रेरित करत राहतात.