ज्योतिषशास्त्रानुसार सूर्य ग्रह मकर राशीत भ्रमण करत आहे. सूर्यदेव प्रत्येक राशीत महिनाभर राहतात. मकर राशीनंतर सूर्यदेव कुंभ राशीत प्रवेश करतील. मकर राशीतून कुंभ राशीत प्रवेश करतील तेव्हा सूर्याची कुंभ संक्रांती असेल. १३ फेब्रुवारी रोजी कुंभ राशीत सूर्याचे संक्रमण होत आहे. त्याच दिवशी कुंभ संक्रांती साजरी केली जाईल. यासोबतच त्रिपुष्कर योग आणि प्रीति योगही या दिवशी तयार होत आहेत. त्यामुळे या दिवसांचे महत्त्व अधिकच वाढले आहे. कुंभसंक्रांतीचा महिमा शास्त्रात वर्णिलेला आहे. पौराणिक मान्यतेनुसार पौर्णिमा, अमावस्या आणि एकादशी तिथीपेक्षा कुंभ संक्रांतीचे महत्त्व अधिक आहे. धार्मिक मान्यतेनुसार कुंभसंक्रांतीच्या दिवशी पवित्र नदीत स्नान करणाऱ्या भाविकांना मोक्ष प्राप्त होतो आणि पापांपासून मुक्ती मिळते. कुंभ संक्रांतीच्या दिवशी दानाचेही विशेष महत्त्व आहे. या दिवशी दान केल्याने अनेक पटींनी पुण्य प्राप्त होते असे म्हणतात.
Kumbh Sankranti 2022: शुभ मुहूर्त, पूजाविधी आणि कुंभ संक्रांती कधी आहे जाणून घ्या
ज्योतिषशास्त्रानुसार सूर्य ग्रह मकर राशीत भ्रमण करत आहे. सूर्यदेव प्रत्येक राशीत महिनाभर राहतात. मकर राशीनंतर सूर्यदेव कुंभ राशीत प्रवेश करतील.
Written by लोकसत्ता ऑनलाइन
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
First published on: 09-02-2022 at 11:22 IST
मराठीतील सर्व राशी वृत्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Kumbh sankranti 2022 know muhurt pooja vidhi rmt