Lakshmi Yog: ज्योतिष शास्त्रानुसार ग्रह वेळोवेळी राशी व नक्षत्र बदलतात त्याचा थेट परिणाम मानवी जीवनावर झालेला दिसून येतो. या ग्रहांच्या हालचाली जेव्हा प्रत्येक राशीच्या कुंडलीत विशिष्ट स्थानी होऊ लागतात तेव्हा अनेक शुभ- अशुभ योग तयार होत असतात. यापैकी सर्वात शुभ मानला जाणारा योग म्हणजे लक्ष्मी नारायण राजयोग. २०२३ मधील फेब्रुवारी महिन्यात पहिला लक्ष्मी नारायण राजयोग तयार होत आहे. सध्या मंगळ ग्रह आणि चंद्र एकाच राशीत बसले आहेत. मंगळ आणि चंद्र एकाच राशीत आल्याने लक्ष्मी योग तयार होत आहे. जोपर्यंत चंद्र वृषभ राशीत विराजमान राहील, तोपर्यंत लक्ष्मी नारायण योग जुळून येईल. लक्ष्मी योग तयार झाल्याने काही राशींना याचा चांगला फायदा होईल. जाणून घेऊया या भाग्यशाली राशींबद्दल..

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

सिंह राशी

‘लक्ष्मी योग’ तुमच्यासाठी शुभ सिद्ध होऊ शकतो. यावेळी तुम्ही एखादी मालमत्ता किंवा वाहन खरेदी करू शकता. तसेच कोणत्याही नवीन कामाची सुरुवात करू शकता. तुम्हाला या काळात तुमच्या आई व कुटुंबीयांचे सहकार्य मिळेल. यावेळी तुम्हाला अचानक धनलाभ देखील होण्याची शक्यता आहे. जर तुम्ही नोकरी करत असाल तर यावेळी तुम्हाला पदोन्नती होण्याची शक्यता दिसत आहे. यावेळी तुम्ही लांबचा प्रवास देखील करू शकता.

कुंभ राशी

‘लक्ष्मी योग’ तुमच्यासाठी फायदेशीर ठरू शकतो. यावेळी तुम्हाला अनपेक्षित लाभ मिळू शकतो. या काळात तुमच्या घरात सुख समृद्धी नांदेल. तसंच जर तुम्ही नोकरी करत असाल तर तुम्हाला चांगली पगार वाढ होऊ शकते. या काळात तुम्हाला तुमच्या कुटुंबीयाची चांगली साथ लाभेल यामुळे अनेक रखडलेली कामे मार्गी लागतील.

( हे ही वाचा: महाशिवरात्रीनंतर ‘या’ राशी होणार श्रीमंत? शुक्राच्या प्रवेशाने मिळणार प्रचंड धनलाभाची संधी)

मकर राशी

‘लक्ष्मी योग’ घडल्याने तुमचे चांगले दिवस सुरू होऊ शकतात. या काळात तुमचा समाजात मान-सन्मान वाढेल. तसंच तुमच्या मनातील सर्व इच्छा पूर्ण होतील. स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी हा काळ खूप शुभ असेल. तसंच तुम्हाला या काळात अचानक धनलाभ होण्याची शक्यता दिसत आहे. यामुळे तुमची आर्थिक स्थिती ही सुधारेल. तसेच जर तुम्ही नोकरी करत असाल तर तुम्हाला वरिष्ठांची चांगली साथ मिळेल.

धनु राशी

‘लक्ष्मी योग’ तुमच्यासाठी शुभ सिद्ध होऊ शकतो. या काळात तुम्हाला कुटुंबीयांची चांगली साथ मिळेल. आरोग्याच्या आणि करिअरच्या दृष्टीने हा काळ तुमच्यासाठी अतिशय शुभ आहे. नोकरदार लोकांना नोकरीच्या नवीन संधी मिळतील. तसंच तुम्हाला या काळात रखडलेले पैसे परत मिळण्याची शक्यता आहे. तसेच यावेळी तुम्हाला जोडीदाराची चांगली साथ मिळेल यामुळे अनेक प्रश्न मार्गी लागतील.

मराठीतील सर्व राशी वृत्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Lakshami yog 2023 made in taurus these zodiac sign can get huge amount of money gps