Guru Pushya Yog Zodiac Signs: ज्योतिषशास्त्रात नक्षत्रांना विशेष महत्त्व आहे. ज्योतिष अभ्यासकांच्या माहितीनुसार गुरु पुष्य नक्षत्रातील राजयोग हे सर्वात शुभ मानले जातात. येत्या काही दिवसात गुरु पुष्य नक्षत्रात चार राजयोग जुळून येत आहेत. यामध्ये वृद्धी योग, सर्वार्थ सिद्धी योग, अमृत सिद्धी योग, रवी योग या राजयोगांचा समावेश आहे. हे चारही योग २५ मे ला म्हणजेच गुरुवारी जुळून आलेले आहेत. गुरु पुष्य योग बनत असतानाच गुरुदेव हे पाहू राशींसाठी अत्यंत शुभ ठिकाणी स्थिर झाले आहेत. यामुळे येत्या काळात काही राशींना लाभदायक असा सुवर्णकाळ अनुभवता येऊ शकतो. असं म्हणतात या काळात सुरु केलेल्या कोणत्याही कार्याला यश प्राप्त होण्यासाठी स्वतः लक्ष्मी व विष्णूची कृपा लाभू शकते. चला तर मग पाहुयात या महिन्यातील एकमेव दुर्मिळ योगाला कोणत्या राशीचे भाग्य उजळणार…
कधी आहे गुरुपुष्यमृत योग?
ज्योतिष शास्त्रानुसार गुरु पुष्य नक्षत्र योग हा २५ मे २०२३ ला जुळून येत आहे. या दिवशी सूर्योदयापासून ते संध्याकाळी ५ वरून ५४ मिनिटांपर्यंत हा राजयोग कायम असणार आहे. कोणत्या शुभ कार्यासाठी हा योग अत्यंत लाभदायक ठरू शकतो. तसेच तुम्हाला एखाद्या नव्या गुंतवणुकीची किंवा खरेदीची संधी लाभत असल्यास गमावू नये.
२५ मे पासून ‘या’ राशी होणार मालामाल?
मेष (Aries Zodiac)
मेष या मंगळाच्या राशीत गुरू-राहू-हर्षल यांचा एकूण सहवास कौटुंबिक सौख्याला त्रासदायक ठरला तरी गुरूची सप्तम स्थानावरील दृष्टी आकाशतत्त्वाच्या नियमाप्रमाणे व्यापक राहील. गैरसमज, वादविवाद फारसे विकोपाला जाणार नाहीत तर व्ययातील मीनेचा नेपच्यून चतुर्थस्थानावर आपली नवपंचम दृष्टी कायम शुभदायक ठेवील. भाग्येश गुरू लग्नी आहे. राहू जरी सोबत असला तरी गुरू आपल्या उद्योगधंद्यात, नोकरीत मदतीचा ठरेल. नोकरीत नवा बदल, नव्या योजना नकोत. २८ नोव्हेंबरनंतर मात्र त्याचा जरूर विचार करा. त्यात आपल्याला यश लाभेल.
कर्क (Cancer Zodiac)
कर्क ही जलरास तशी हळवी, भावविवश होणारी. या राशीचा स्वामी चंद्र. चंद्र-गुरू एकमेकांचे उत्तम मित्र. त्यामुळे प्रत्येकाच्या आयुष्यात चंद्राच्या पाठीमागे खऱ्या दिलदार बुद्धीचा गुरू सदैव मागे उभा असतो. विशेषत: चंद्र-गुरू युतीची माणसे विद्यादान, बौद्धिक क्षेत्रात खूप महत्त्वाच्या पदावर असतात. दशमातील गुरू आनंदी, सांसारिक सुख भोगणारा उच्च मनोवृत्तीचा असतो. विशेष म्हणजे मेष राशीतील गुरू राजकारण, सामाजिक क्षेत्रात उद्योगधंद्यात आपले कर्तृत्व उत्तमरीतीने दाखवून देतो. गुरूचे नवमस्थानातील आगमन खूपच आनंददायी ठरेल.
हे ही वाचा<< जन्मतारखेनुसार स्वभाव व धनलाभाचा शुभ काळ कसा ठरतो? ज्योतिषतज्ज्ञांनुसार तुमच्या मूलांकाचे भविष्य काय?
कन्या (Virgo Zodiac)
अष्टमात हर्षल-गुरू-राहू त्यामुळे स्वभावातील एकसूत्रता हरवल्यासारखी जाणवेल. कन्या ही बुधाची बौद्धिक राशी पण या ग्रहाच्या फेऱ्यात आपले अस्तित्व हरवल्यासारखे होते. उद्योगधंद्यात, नोकरीत, भागीदारीत, हळवेपणा आणि भावनिक गुंतवणूक वाढेल. त्यातून महत्त्वाचे निर्णय घेणे कठीण होईल. पण अशा वेळी षष्ठातील शनी या विरोधी विचारांना थांबवील. हे आलेले छोटे वादळ वळवाच्या पावसासारखे हवेत विरून जाईल. अष्टमात गुरू कौटुंबिक सुखात लहानसहान गैरसमज, नातेवाईकांचे रुसणे यावर शांत राहणे हा एकमेव रामबाण उपाय ठरेल. न विचारता आपले मतप्रदर्शन करणे टाळावे. आपल्या पाठीमागे होणाऱ्या चर्चांना फार किंमत देऊ नका. कालांतराने हे वातावरण सहज निवळेल
(टीप: वरील लेख हा प्राप्त माहितीवर आधारित आहे)