August Monthly Horoscope By Sonal Chitale: वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार, प्रत्येक ग्रह आपल्या भ्रमण कक्षेत साधारण ३० दिवसाच्या अंतराने काही अंशी हालचाल करत असतो. यानुसार प्रत्येक महिन्याला काही राशींसाठी सुखाचे तर काहींना कष्टाचे दिवस अनुभवावे लागू शकतात. उद्यापासून सुरु होणाऱ्या ऑगस्ट महिन्यात सुद्धा महत्त्वाच्या मानल्या चार ग्रहांचे राशी व नक्षत्र परिवर्तन होणार आहे. ज्योतिष अभ्यासकांच्या माहितीनुसार, शुक्र, मंगळ, सूर्य, बुध हे ग्रह मार्गी, उदय व अस्त होणार आहेत. या महिन्याभरात नेमक्या कोणत्या राशीला लक्ष्मीचा आशीर्वाद लाभू शकतो व कोणाला कष्ट सोसावे लागू शकतात याविषयी आपण प्रसिद्ध ज्योतिषतज्ञ सोनल चितळे यांच्याकडून जाणून घेणार आहोत.

ऑगस्ट महिन्यातील १२ राशींचे भविष्य

मेष रास (Aries Zodiac Horoscope)

मुलांसबंधी कामे मार्गी लागतील. कामातील उत्साह वाढेल. जोडीदाराच्या साथीने नवे नातेसंबंध जपाल. संभाव्य जोखीम पत्करूनच आर्थिक गुंतवणूक करावी. मोठी झेप नको. शिक्षणासाठी परदेशगमन योग येईल. त्यासाठीच्या कार्यालयीन आवश्यक गोष्टी वेळेवर पूर्ण होतील. अडचणी दूर करत पुढे जाल. पित्त होणे, पोट बिघडणे असे त्रास वरचेवर होण्याच्या शक्यता आहेत. सद्यस्थिती स्वीकारून पुढील निर्णय घ्यावेत. स्थावर मालमत्तेमध्ये गुंतवणूक करताना त्याचा भविष्यात किती लाभ होईल किंवा नाही याचा विचार आधीच करावा.

Kartik Month Rashifal
‘या’ ५ राशींची होणार चांदी; १३ दिवसांनंतर देवी लक्ष्मीसह भगवान विष्णूंची होणार कृपा, मिळणार बक्कळ पैसा
IND vs PAK Abhishek Sharma and Pakistani Bowler Fights Indian Batter Gives Death Stare After Fiery Send Off Watch Video
IND vs PAK: भारत-पाकिस्तान सामन्यात राडा, पाकिस्तानी गोलंदाजाने…
A day in the life of Samantha Ruth Prabhu
“रात्री ९.३० वाजता ध्यान करते अन् १० वाजता झोपते”, समंथा रुथ प्रभुच्या दिनचर्येबाबत काय म्हणाले तज्ज्ञ?
Sun Transit In Libra 2024
उद्यापासून सूर्याचा जबरदस्त प्रभाव; राशीपरिवर्तनाने ‘या’ तीन राशींच्या व्यक्तींवर होणार देवी लक्ष्मीची कृपा
Daily Horoscope 12th October 2024 Rashibhavishya in Marathi | dasara 2024
१२ ऑक्टोबर पंचांग: दसऱ्याला मीनसह ‘या’ राशींवर धन-सुखाची बरसात; प्रेमात यश तर नोकरी, व्यवसायातून मिळेल बक्कळ पैसा; वाचा तुमचे राशिभविष्य
11th October Rashi Bhavishya In marathi
११ ऑक्टोबर पंचांग: चारचौघात कौतुक ते प्रेम-मैत्रीची साथ, आज सिद्धिदात्री देवी १२ पैकी ‘या’ राशींना पावणार; वाचा तुम्ही आहात का नशीबवान?
6th october rashi bhavishya panchang in marathi
६ ऑक्टोबर पंचांग : अश्विन महिन्यातील विनायक चतुर्थी अन् देवी कुष्मांडाचा दिवस; आज १२ पैकी ‘या’ राशींवर होईल धन-संपत्तीचा वर्षाव
Shardiya Navratri 2024
Shardiya Navratri 2024 : नवरात्रीच्या नऊ दिवसांमध्ये ‘या’ गंभीर चुका टाळा अन् देवीचा आशीर्वाद मिळविण्यासाठी ‘या’ गोष्टी करा

वृषभ रास (Taurus Zodiac Horoscope)

चतुर्थ स्थानातील रवी , मंगळ घरासंबंधीत कामकाज गतिमान करतील. स्थावर मालमत्तेची कागदपत्रे विशेष लक्ष देऊन तयार करून घ्यावीत. स्थावर खरेदी- विक्रीच्या कामासाठी ग्रहबल पुरेसे नाही. अडचणींना तोंड द्यावे लागेल. दशम स्थानातील शनीमुळे वरिष्ठ वर्ग आणि कनिष्ठ वर्ग यातील दुवा साधला जाईल. मेहनतीला पर्याय नाही. तंत्रज्ञानाच्या अभ्यासक्रमात प्रगती कराल. मैत्रीचे नाते टिकवाल. उत्सर्जन संस्थेच्या तक्रारी वाढल्यास वैद्यकीय उपचार घ्यावे लागतील. लहान मोठे प्रवास कराल.

मिथुन रास (Gemini Zodiac Horoscope)

तृतीय स्थानातील रवी, मंगळ, बुध आपल्यात आत्मविश्वास निर्माण करेल. परंतु त्याला मर्यादा ओलांडू देऊ नका. आर्थिक नियोजनाबाबत सतर्क राहावे. विद्यार्थ्यांना गुरुजनांचा पाठींबा ,आधार मिळाला तर उत्तम कामगिरी पार पडेल. नोकरी व्यवसायात आवश्यक तेथेच आपली ऊर्जा, वेळ आणि ज्ञान उपयोगात आणा. कौटुंबिक प्रश्न सोडवताना व्यवहारीपणा बाजूला ठेवा. सामंजस्याने घ्यावे. जोडीदाराच्या साथीने महत्वाचे निर्णय घ्याल. पोटाचे विकार बळावतील. औषधोपचार घ्यावा लागेल.

कर्क रास (Cancer Zodiac Horoscope)

धनलाभ, यश ,कीर्ती मिळण्याची चांगली संधी उपलब्ध होईल. आपल्या कामातून आपली योग्यता सर्वांना दाखवाल. विरोधकांना चीत कराल. हिमतीने पुढे व्हावे. ग्रहबल चांगले आहे. नोकरी व्यवसायात प्रगती कराल. सावधगिरी बाळगावी. ‘आपण सरळ तर जग सरळ’ असे दिवस राहिलेले नाहीत. विद्यार्थी वर्गाला भाषण, सादरीकरण यात उत्तम यश मिळेल. आधीपासून केलेली तयारी नक्कीच उपयोगी पडेल. नेटाने पुढे जावे. जोडीदार त्याच्या क्षेत्रात मोलाची कामगिरी करेल. आरोग्य चांगले राहील.

सिंह रास (Leo Zodiac Horoscope)

रवी, गुरुची भक्कम पाठबळ मिळाल्याने अडचणींवर आत्मविश्वासाने मात कराल. धनलाभ आणि मानसन्मान मिळवाल. आपल्या स्पष्ट वक्तव्याने गैरसमज दूर कराल. नुकसान टळेल. नोकरी व्यवसायात सुवर्णसंधी मिळेल. मेहनतीला पर्याय नाही. आडमार्गाचा अवलंब नको. राजासाठी राजमार्गच योग्य आहे. संतती प्राप्तीसाठी केलेले प्रयत्न फळास येतील. जोडीदाराला अतिरिक्त कामाचा बोजा उचलावा लागेल. मुलांची उन्नती मनाला सुखावेल. मान, मणका आणि बरगड्या यांचे आरोग्य सांभाळावे.

कन्या रास (Virgo Zodiac Horoscope)

व्ययस्थानातील रवी, मंगळ, बुध यांच्या भ्रमणामुळे आत्मविश्वासाची सकारात्मक सीमारेषा ओलांडाल. पोकळ डौल बिनकामाचा असतो हे लवकरच लक्षात येईल. नोकरी व्यवसायात प्रगती करण्यासाठी धोपट मार्ग स्वीकारावा. आडमार्गाने जाल तर अडखळून पडाल. विद्यार्थी वर्गाने स्पर्धा परीक्षांचे तंत्र आत्मसात करणे आवश्यक आहे. गुंतवणूकदारांनी थोडे सबुरीने घ्यावे. जोडीदाराच्या साथीने चर्चेअंतीच कुटुंबातील महत्वाचे निर्णय पक्के करावेत. ताप, खोकला, साथीजन्य आजार बळावतील.

तूळ रास (Libra Zodiac Horoscope)

लाभ स्थानातील रवी मंगळाचे भ्रमण आपल्याला विशेष लाभ मिळवून देईल. आपल्या योजना यशस्वी होतील. नोकरी व्यवसायातील रखडलेली कामे मोठ्या हिमतीने मार्गी लावाल. कामाची दखल घेतली जाईल. जोडीदाराच्या साथीने कौटुंबिक बाबी अलगद सोडवाल. विद्यार्थी वर्गाच्या सातत्यपूर्ण अभ्यासामुळे यश मिळेल. आळस झटकावा. विवाहोत्सुक मंडळींना मनाजोगता जोडीदार मिळेल. पायाला जखम झाल्यास त्यात पू होऊन ती चिखळण्याची शक्यता आहे.

वृश्चिक रास (Scorpio Zodiac Horoscope)

जे काम मनात योजाल, ते पूर्णत्वास न्याल. नोकरी व्यवसायाच्या दृष्टीने अतिशय चांगले ग्रहमान आहेत. ‘तू पुढे हो, आम्ही पाठीशी आहोत’ असे म्हणणारी ‘सपोर्ट सिस्टीम’ आपली हिंमत वाढवेल. विद्यार्थी वर्गाला कला- तंत्रज्ञान या क्षेत्रात अपेक्षित यश मिळेल. स्पर्धात्मक परीक्षेची जोरदार तयारी करा. जोडीदार त्याच्या कार्यात व्यस्त असेल. कौटुंबिक जबाबदाऱ्या वाटून घ्याव्यात. कामानिमित्त प्रवास कराल. पित्तविकाराने छातीत जळजळ, डोकेदुखी, अपचन असे त्रास दुर्लक्षित करू नका.

धनु रास (Dhanu Zodiac Horoscope)

सामाजिक कार्यात मन रमेल. परदेशासंबंधीत , उच्च शिक्षणासंबंधीत कामे वेग घेतील. विद्यार्थी वर्गाच्या प्रश्नांना उत्तरे सापडतील. मनाजोगते शिक्षण घ्याल. नोकरी व्यवसायात धैर्य कामी येईल. अनोळखी व्यक्तींच्या माध्यमातून मोठया कामांना हात घालू नका. फसगत होण्याची शक्यता भासते. मध्यस्थी ओळखीचा असावा. जोडीदार आपल्या परिश्रमाने यशाचे शिखर गाठेल. गुंतवणूकदारांसाठी या महिन्यात अधिक जोखीम आहे. सावधतेने पैसे गुंतवावे. आरोग्याच्या तक्रारी दुर्लक्षित करू नका.

मकर रास (Capricorn Zodiac Horoscope)

स्थावर मालमत्तेसंबंधित कागदपत्रे, कोर्टाची कामे हळूहळू मार्गी लागतील. कायदेशीर पद्धतीने पाठपुरावा केलात तरच लाभदायक ठरेल. नोकरीतील कामात अडथळे येतील. अनावश्यक प्रश्न भेडसावतील. व्यवसायातील आर्थिक गुंतवणूक कामाची व्याप्ती वाढवेल. शनी गुरूच्या साथीने विद्यार्थी वर्गाला भरघोस यश मिळेल. जोडीदाराची मेहनत कुटुंबातील प्रश्न सोडवण्यासाठी उपयोगी पडेल. मज्जासंस्थेवर अतिरिक्त ताण येईल.

कुंभ रास (Aquarius Zodiac Horoscope)

कौटुंबिक प्रश्न सोडवताना बौद्धिक पातळीवरून बघू नका. त्यासाठी भावनिक दृष्टिकोनच उपयोगी पडेल.सगळ्या गोष्टी तर्काच्या चाकोरीत बसणाऱ्या नसतात हे लक्षात घ्यावे. आर्थिक गुंतवणूक लाभकारक ठरेल.विद्यार्थी वर्गाने अभ्यासासोबत तब्येतीची काळजी घ्यावी. अभ्यासाचा ताण कमी करण्यासाठी मित्रमंडळींच्या भेटीगाठी घ्याव्यात. नोकरीनिमित्त प्रवास कराल. व्यवसायात भरघोस यश मिळेल. जोडीदारासह मनमोकळे संबंध राहतील.

हे ही वाचा<< ‘S’ अक्षरावरून नाव असणाऱ्या लोकांचा स्वभाव कसा असतो? कुंडलीत कसा व कधी असतो धनयोग

मीन रास (Pisces Zodiac Horoscope)

आर्थिक स्थिती वर खाली होण्याची चिन्हे दिसतील. गुंतवणूकदारांनी योग्य ती खबरदारी घ्यावी. नोकरी व्यवसायातील कामकाज लांबणीवर पडेल. डोकं शांत ठेवून निर्णय घेणे आवश्यक ठरेल. घाईघाईने कोणताच विचार अमलात आणू नये. विद्यार्थी वर्गाला प्रचंड मेहनत घ्यावी लागेल. शुक्राचे भ्रमण भुलवणारे असेल. खोट्याच्या मागे लागू नका. नुकसान होईल. जोडीदाराला त्याच्या कामात यश, कीर्ती मिळेल. संततीसाठी वैदयकीय उपचार घ्यावेत. पित्त, डोकेदुखीचा त्रास संभवतो.

(टीप: वरील लेख हा प्राप्त माहितीवर आधारित आहे )