Krushna Janmashtami 2023 Astrology: वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार यंदाचे गोकुळाष्टमी पर्व हे अत्यंत शुभ योगांमुळे खास ठरणार आहे. आजच्या दिवशी चंद्रमा वृषभ राशीत संचार करत आहेत तर रोहिणी नक्षत्रात हर्ष योग तयार झाला आहे. याशिवाय रवी योग, सर्वार्थ सिद्धी योग यामुळे कृष्ण जन्माष्टमीचा दिवस आणखी खास ठरणार आहे. आजच्या ग्रहस्थितीनुसार चार राशींना आजपासून धनलाभाचे योग दिसून येत आहेत. या मंडळींना नशिबाची तगडी साथ लाभणार असून आयुष्यात सुख- समृद्धी अनुभवता येऊ शकते. नेमकं कोणत्या माध्यमातून आणि कोणत्या राशींना आज धनलाभ होऊ शकतो हे जाणून घेऊया..
मेष रास (Aries Rashi Horoscope Today)
ज्योतिषशास्त्रानुसार आजची कृष्ण जन्माष्टमी ही मेष राशीसाठी अत्यंत शुभ ठरू शकते. या काळात रोहिणी नक्षत्राच्या शुभ प्रभावामुळे साहस व पराक्रम वाढू शकतो. आर्थिक बाबींमध्ये यश हाती लागू शकते. तुम्हाला कठोर मेहनत घ्यावी लागू शकते पण त्याचे फळ सुद्धा तितकेच गोड आणि लाभदायक सिद्ध होऊ शकते. नोकरदार मंडळींना व व्यावसायिकांना नवीन संपर्क जोडता येतील ज्यामुळे तुमचे समाजातील स्थान व मान दोन्ही वाढू शकते. कुटुंबासह प्रवासाचे योग तुमच्या भाग्यात दिसत आहेत.
वृषभ रास (Taurus Rashi Horoscope Today)
वृषभ राशीसाठी आजपासून पुढील एक महिना हा मौज- मजा- मस्तीचा असणार आहे, अत्यंत हसऱ्या- खेळत्या वातावरणात आपण राहू शकता ज्यामुळे तुमचे मानसिक आरोग्य सुधारेल. सर्वार्थ सिद्धी योगामुळे तुम्हाला तुमचेच अडकून राहिलेले धन प्राप्त होईल. तुम्हाला संतती सुख मिळण्याचे योग आहेत. मनावरचे एखादे मोठे ओझे हलके होऊ शकते. नोकरीत तुम्हाला तुमच्या संपर्काच्या जोरावर प्रगतीची संधी मिळू शकते. भौतिक सुख- सुविधा वाढू शकतात.
सिंह रास (Leo Rashi Horoscope Today)
६ सप्टेंबर पासून सिंह राशीसाठी आरोग्याच्या दृष्टीने लाभाचा कालावधी आहे. तुम्ही पुढील महिन्याभरात तुमच्या व्यक्तिमत्वासह आर्थिक परिस्थितीत सुद्धा काही महत्वपूर्ण बदल जाणवू शकतात. तुम्हाला संतुष्ट वाटेल अशी एखादी घटना घडू शकते. तुमच्या राशीच्या नशिबात परदेश वारीचा सुद्धा योग दिसून येत आहे. व्यवसायाच्या निमित्ताने केलेल्या एखाद्या प्रवासात तुम्हाला नवीन लोकांनाही जोडले जाण्याची संधी मिळू शकते. तुमच्या आई वडिलांचे आरोग्य सुद्धा सुधारल्याने अनेक महत्त्वपूर्ण निर्णय घेणे शक्य होईल.
धनु रास (Sagittarius Rashi Horoscope Today)
कृष्ण जन्माष्टमीचे दुर्लभ राजयोग हे धनु राशीसाठी आयुष्यात पुढे जाण्याची संधी घेऊन येत आहेत. तुम्हला गुंतवणुकीवर अधिकाधिक भर द्यायला हवा जेणेकरून तुम्ही कामाच्या बाबत वेगवेगळे प्रयोग करून पाहायला मुक्त होऊ शकता. परदेशी नोकरीची संधी नशिबात दिसत आहे. तुमच्या अर्धवट राहिलेल्या कामांना वेग मिळेल जेणेकरून तुम्ही एखाद्या मोठ्या यशाला गवसणी घालू शकता. भागीदारीच्या कामामध्ये नशिबात यश दिसून येत आहरेत. धनलाभाची चिन्हे आहेत.
(टीप: वरील लेख हा प्राप्त माहितीवर आधारित आहे)