Perfect Couple Zodiac Matches Horoscope: लग्नाआधी कुंडली पाहण्याची आपल्याकडे पद्धत आहे पण कुंडलीतील हे गुण कसे जुळवले जातात हे माहितेय का? तुमचा जोडीदार तुमच्या राशीला व त्यानुसार ठरणाऱ्या तुमच्या स्वभावाला साजेसा आहे का याबद्दल तुम्हालाही कुतुहूल असेलच ना? चला तर मग आज आपण ज्योतिषशास्त्राच्या अनुसार कोणत्या राशी परफेक्ट जोडीदार ठरू शकतात हे जाणून घेऊयात…

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

‘या’ राशींचे लोक एकमेकांसाठी असू शकतात बेस्ट जोडीदार

मेष – कुंभ : मेष व कुंभ राशीच्या व्यक्ती या एकमेकांसाठी बेस्ट पार्टनर सिद्ध होऊ शकतात. याचे मुख्य कारण म्हणजे कुंभ राशीची मंडळी ही अत्यंत बुद्धिमान व नेहमीच वेगळा विचार करणारी म्हणून ओळखली जातात, तर मेष राशीच्या मंडळींचा उत्साह व ऊर्जा ही अधिक असते. त्यामुळे प्लॅन तयार करण्यात कुंभ व तो प्रत्यक्षात आणण्यासाठी मेष राशीची लोकं एकमेकांना मदत करू शकतात. दोघांची ऊर्जा नात्यातील प्रेम राखून ठेवू शकतो.

वृषभ- कर्क : वृषभ व कर्क या दोन्ही राशीची लोकं ही स्थैर्य व विश्वास या गोष्टींवर प्रचंड विश्वास ठेवणारी असतात. त्यामुळे दोघांनाही भावनांचे मूल्य जपून ठेवणे उत्तम जमते. यातही वृषभ रास ही अधिक तर्कशुद्ध असते तर कर्क रास ही अधिक भावनिक असते. यामुळे दोघांना एकमेकांचे गुण बॅलन्स ठेवता येतात. यामुळे प्रेमासह नात्यात समजूतदारपणाही पुरेपूर असतो.

मिथुन- तूळ: मिथुन रास ही प्रेमळ रास मानली जाते. शिवाय ही लोकं आवडत्या व्यक्तीसाठी सर्वकाही करायला तयार असतात. यामुळेश मिथुन राशीचा जोडीदार हा प्रत्यक्ष राशीसाठी स्वप्नवत असतो. पण मिथुन राशीच्या व्यक्तीला आनंदी करण्याची किंबहुना त्यांचे गुण व ऊर्जा मॅच करू शकेल अशी वैशिष्ट्य तूळ राशीत असतात. तूळ ही रास हळवी मानली जाते. त्यामुळे मिथुन व तूळ ही एकमेकांना पूरक असतात.

कन्या- मीन: मीन मीन ही जलतत्त्वाची राशी आहे. कलेची ओढ व प्रेमळ स्वभाव असणारी ही मंडळी जितकी भावविश्वात जगणारी असतात तेवढेच सतर्क असतात. मीन व कन्या या राशी उत्तम संसार करू शकतात मात्र मीनला शिस्त लावणारी रास हवी असते अन्यथा संसारात स्थैर्य राहात नाही.

हे ही वाचा<< अधिक श्रावणात लक्ष्मी नारायण राजयोग बनल्याने ३ राशींचे अच्छे दिन; प्रेम व पैशाची तिजोरी भरणार?

वृश्चिक- मिथुन: वृश्चिक अत्यंत हट्टी स्वभाव असणारी ही मंडळी आहेत मात्र यांच्या या स्वभावाचा निर्णय न घेऊ शकणाऱ्या जोडीदाराला फायदा होऊ शकतो. मिथुन रास वृश्चिकसाठी थोडी सोयीची पडते कारण या व्यक्तींचा स्वभाव लवचिक असतो.

(टीप:हा लेख प्राप्त माहितीवर आधारित आहे)