Lakshmi Narayan Rajyog: वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार, अनेकदा गोचर करताना काही ग्रह एकत्र आल्याने यातून शुभ युती तयार होते व त्याचा प्रभाव एखाद्या राज्योगाच्या स्वरूपात दिसून येतो. येत्या काही महिन्यांमध्ये बुध व शुक्राची युती कायम राहणार आहे ज्यातून चंद्राच्या राशीत लक्ष्मी नारायण राजयोग तयार होत आहे. ज्योतिष अभ्यासकांच्या माहितीनुसार बुध देव हा बुद्धी व धनसंपत्तीचा कारक मानला जातो तर शुक्रदेव हे प्रेम व वैभवाचे प्रतीक मानले जातात. या दोन्ही ग्रहांच्या युतीने लक्ष्मी नारायण राजयोग तयार झाल्याने आता येत्या काळात प्रभावी राशींना लक्ष्मी सह सरस्वरतीचा सुद्धा कृपाशिर्वाद लाभू शकतो. या तीन नशीबवान राशी कोणत्या व त्यांना कोणत्या रूपात श्रीमंती लाभू शकते हे पाहूया..
लक्ष्मी नारायण राजयोग बनल्याने ‘या’ तीन राशींना मिळेल बक्कळ धनलाभ?
मेष रास (Aries Zodiac Horoscope)
आपल्या राशीच्या गोचर कुंडलीत लक्ष्मी नारायण राजयोग हा चतुर्थ स्थानी तयार होत आहे यामुळे येत्या काळात आपल्या नशिबात सुखाची चिन्हे आहेत. शकते. कामाच्या ठिकाणी तुमचा सन्मान होऊ शकतो ज्यातून पगारवाढीला सुद्धा हातभार लाभू शकतो. नोकरदार मंडळींना थेट पैशाच्या रूपात किंवा अप्रत्यक्षपणे तुमचा खर्च वाचवू शकतील अशा संधी लाभू शकतात. जमीन, रिअल इस्टेट व राजकारण या क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या मंडळींना लक्ष्मी नारायण राजयोग अत्यंत शुभ सिद्ध होऊ शकतो. शेअर बाजारात गुंतवणुकीवर भर द्यायला हरकत नाही.
तूळ रास (Libra Zodiac Horoscope)
लक्ष्मी नारायण राजयोग तुमच्या राशीच्या गोचर कुंडलीत कर्म स्थानी तयार होत आहे. आपल्या कामाच्या माध्यमातूनच प्रचंड यश लाभू शकते. तुम्ही केलेली मेहनत व कष्ट नावारूपाला येऊ शकतात. नोकरीत बदलाचे सुद्धा संकेत आहेत ज्यामुळे तुमची आर्थिक स्थिती आणखी बळकट होऊ शकते. तुमची नव्या व्यक्तींशी ओळख होऊ शकते ज्याचा फायदा तुम्हाला येत्या काळात होऊ शकतो. व्यवसायातून प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष धनलाभ होऊ शकतो. नवीन ऑर्डर्स मिळू शकतात. कौटुंबिक सुख लाभू शकते.
मकर रास (Capricorn Zodiac Horoscope)
तुमच्यासाठी लक्ष्मी नारायण राजयोग शुभ सिद्ध होऊ शकतो कारण हा योग्य तुमच्या राशीच्या गोचर कुंडलीत सप्तम स्थानी तयार होणार आहे. आपल्या वैवाहिक आयुष्यात गोडवा येऊ शकतो. अविवाहित मंडळींना लग्नासाठी प्रस्ताव येऊ शकतो. नवीन व्यवसाय किंवा गुंतवणुकीचा विचार करत असाल तर एक पाऊल पुढे जाण्यासाठी हा सर्वात उपयुक्त कालावधी ठरू शकतो. येत्या काही महिन्यात आपल्याला व्याव्क्तीमत्वांत खुओ बदल अनुभवता येऊ शकतात विशेषतः तुमचा आत्मविश्वास खूप वाढू शकतो.
(टीप: वरील लेख हा प्राप्त माहितीवर आधारित आहे)