Lakshmi Narayan Rajyog: ज्योतिष शास्त्रानुसार ग्रह वेळोवेळी राशी व नक्षत्र परिवर्तन करताच त्याचा थेट प्रभाव हा मानवी जीवनावर दिसून येत असतो. या ग्रहांच्या हालचाली जेव्हा प्रत्येक राशीच्या कुंडलीत विशिष्ट स्थानी होऊ लागतात तेव्हा अनेक शुभ- अशुभ योग सुद्धा तयार होत असतात. यापैकी सर्वात भाग्यवर्धक व शुभ मानला जाणारा योग म्हणजे लक्ष्मी नारायण राजयोग. २०२३ मधील पहिला वाहिला लक्ष्मी नारायण राजयोग हा फेब्रुवारी महिन्याच्या सुरुवातीला तयार होत आहे. यावेळेस शुक्र व बुध ग्रहाच्या युतीने हा योग कुंभ राशीत तयार होत आहे. विशेष म्हणजे ३० वर्षांनी पहिल्यांदाच कुंभ राशीत शनिदेव स्थित आहेत अशावेळी हा राजयोग तयार होणे हे काही राशींसाठी अत्यंत लाभदायक ठरू शकते.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

ज्योतिषीय अभ्यासकांच्या माहितीनुसार कुंभ राशीत लक्ष्मी नारायण राजयोग तयार होताच ३ राशींच्या भाग्यास कलाटणी मिळण्याचे योग आहेत. म्हणजेच या ३ राशी धनलाभ मिळवून श्रीमंत होऊ शकतात पण त्यासह त्यांना प्रचंड प्रतिष्ठा, मान व प्रेम लाभू शकते. या भाग्यवान राशी कोणत्या हे जाणून घेऊयात..

सिंह राशी (Leo Zodiac)

सिंह राशीसाठी लक्ष्मी नारायण राजयोग हा शुभ व लाभदायक सिद्ध होऊ शकतो. आपल्या राशीच्या कुंडलीत सप्तम स्थानी हा राजयोग तयार होत आहे. हे स्थान वैवाहिक जीवन व पार्टनरशिपशी संबंधीचे आहेत. येत्या दिवसांमध्ये जोडीदारासह नात्यात गोडवा वाढू शकतो. तुम्हाला सुख, दुःख व पैसे हे पार्टनरशिपमध्ये वाटून घेणे अत्यंत फायदेशीर ठरू शकते. येत्या काळात नोकरदार मंडळींना कामाच्या ठिकाणी प्रमोशनसह पगारवाढ मिळण्याची शक्यता आहे. अविवाहित ,मंडळींना जोडीदार लाभू शकतो आणि हा जोडीदाराचं आपल्या धनलाभाचे कारणही ठरू शकतो.

मिथुन राशी (Gemini Zodiac)

मिथुन राशीच्या मंडळींसाठी लक्ष्मी नारायण राजयोग हा अच्छे दिन घेऊन येऊ शकतो. आपल्या राशीच्या कुंडलीत हा राजयोग नवव्या स्थानी तयार होत आहे. हे स्थान भाग्योदय व परदेश यात्रेचे मानले जाते. येणारा काळ हा नोकरदार मंडळींसाठी लाभदायक ठरू शकतो. आपल्याला नवीन जॉबची ऑफर येण्याची शक्यता आहे. आपल्या प्रलंबित कामांना दिशा व वेग मिळू शकते. तुम्हाला सुरु केलेल्या प्रत्येक कामात यश मिळू शकते. जी मंडळी सरकारी नोकरीची तयारी करत आहेत त्यांना येत्या काळात प्रयत्नांना यश मिळू शकते.

हे ही वाचा<< २१ एप्रिलला शनि व गुरू एकत्र येताच ‘या’ ४ राशी होतील श्रीमंत? तन मन धन ‘असे’ होऊ शकते समृद्ध

वृश्चिक राशी (Scorpio Zodiac)

लक्ष्मी नारायण राजयोग वृश्चिक राशीला लाभदायक ठरू शकतो. ग्रह गोचर होऊन आपल्या कुंडलीत चतुर्थ स्थानी हा राजयोग तयार होत आहे. हे स्थान भौतिक सुख व आईचे स्थान मानले जाते. येत्या काळात तुम्हाला भौतुक सुखाची प्राप्ती होऊ शकते तसेच आईसह नात्यात सुधारणा होऊ शकते. येत्या काळात आपल्याला प्रॉपर्टी किंवा वाहन खरेदीचे योग आहेत. तसेच ज्यांचे काम रिअल इस्टेटशी संबंधित आहे त्यांना पूर्ण वर्ष लाभदायक सिद्ध होऊ शकते.

(टीप: वरील लेख हा गृहीतके व प्राप्त माहितीवर आधारित आहे)

मराठीतील सर्व राशी वृत्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Lakshmi narayan rajyog will make these zodiac sign rich after 30 years shani venus mercury will give more money astrology svs